फोटो सौजन्य - IndianPremierLeague सोशल मिडिया
मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकता नाईट राइडर्स यांच्यामध्ये काल सामना पार पडला, या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाने 14 वर्ष जुनी परंपरा मोडली आणि त्याचा पहिला सामना जिंकून पहिला विजय नावावर केला आहे. कालच्या सामन्यामध्ये हार्दिक पांड्या आणि अजिंक्य रहाणे हे दोन्ही कर्णधार जेव्हा नाणेफेकीसाठी आले होते यावेळी एक अशी घटना झाली त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या संघावर आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
सामन्याच्या अर्ध्या तासाआधी जेव्हा संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी येतात आले तेव्हा यजमान कर्णधार नाणे उडवतो आणि त्यानंतर कॅमेरामॅन नाणेफेक उडवल्यानंतर त्यावर झूम करतो. पण कालच्या सामन्यामध्ये असे काही झाले नाही. कालच्या सामन्यामध्ये जेव्हा हार्दिक पांड्याने नाणेफेक उडवले त्यानंतर नाणेफेक दाखवण्यात आले नाही, यावेळी कॅमेरा दुसरीकडे फिरवला. त्यामुळे क्रिकेट चाहते हे पाहून सोशल मिडियावर राग व्यक्त करत आहेत. कालच्या सामन्यामध्ये झालेल्या या घटनेमुळे मुंबई इंडियन्सच्या संघावर मॅच फिक्सिंगचा आरोप केला जात आहे.
🚨 Toss 🚨@mipaltan have won the toss and elected to bowl first against @KKRiders in Match 2⃣ Updates ▶️ https://t.co/JmJcgsoHQ7#TATAIPL | #KhelBindaas | #MIvKKR pic.twitter.com/GgI4BwiTd7 — IndianPremierLeague (@IPL) March 29, 2026
आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सची सुरुवात नेहमीच संथ राहिली आहे, पण याच काळात त्यांनी पाच विजेतेपदे पटकावली आहेत. संघाने आपला शेवटचा पहिला आयपीएल सामना एप्रिल २०१२ मध्ये जिंकला होता, ज्यात त्यांनी चेन्नई सुपर किंग्सला आठ गडी राखून पराभूत केले होते. २०१३ ते २०२० दरम्यान संघाने पाच विजेतेपदे जिंकली, पण पहिल्या सामन्यातील त्यांच्या पराभवाची मालिका पुढेही चालू राहिली.
KKR चा ‘अजिंक्य’ रथ गोलंदाजांनी रोखला?14 वर्षांचा रेकॉर्ड मोडण्यासाठी MI पलटणला 221 धावांची गरज
रोहित शर्मा (७८) आणि रायन रिकेल्टन (८१) यांनी अर्धशतके झळकावत पहिल्या विकेटसाठी १४८ धावांची भागीदारी केली, ज्यामुळे मुंबई इंडियन्सने स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात केकेआरला सहा गडी राखून पराभूत करून आपल्या सलग १३ हंगामांतील पराभवांची मालिका संपवली. “हंगामातील पहिला सामना जिंकण्यासाठी खूप वाट पाहावी लागली. जेव्हा जेव्हा आम्ही मैदानावर उतरलो, तेव्हा हंगामाची दमदार सुरुवात करण्याचेच आमचे ध्येय होते. आम्ही तसे करू शकलो याचा संपूर्ण संघ खूप आनंदी आहे,” असे पांड्या सामन्यानंतरच्या सादरीकरण समारंभात म्हणाला.
रायन रिकल्टन आणि क्विंटन डी कॉक यांच्यापैकी निवड करण्याबद्दल तो म्हणाला, “रायनने गेल्या वर्षी आमच्यासाठी खूप चांगली कामगिरी केली. आणि क्विनी एक उत्तम माणूस आहे. आम्ही एकाच खेळाडूला पाठिंबा देत आहोत आणि संघात सातत्य राखू इच्छितो, हे त्याला समजले होते. तो दृष्टिकोन यशस्वी ठरला. जेव्हा जेव्हा मी रोहितला काही विशिष्ट फटके खेळताना पाहतो, तेव्हा प्रत्येकजण थक्क होतो. त्याची फलंदाजी केवळ उत्कृष्ट नाही, तर ती जबरदस्त आहे.”






