फोटो सौजन्य - Mumbai Indians
Update on Bumrah’s IPL 2025 comeback : मुंबई इंडियन्सच्या संघासाठी आयपीएल २०२५ ची सुरुवात फार काही खास राहिली नाही. पहिल्या सामन्यांमध्ये मुंबईला चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने पराभूत केले त्यानंतर अहमदाबाद नरेंद्र मोदी स्टेडियमवर मुंबईला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या पहिल्या सामन्यांमध्ये अनुपस्थित होता तर जसप्रीत बुमराह मागील बऱ्याच महिन्यांपासून मैदानापासून दुखापतीमुळे बाहेर आहे. जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनाबाबत एक मोठी अपडेट आली आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या मते, बुमराह वेगाने बरा होत आहे आणि तो लवकरात लवकर आयपीएल २०२५ मध्ये दिसू शकतो. तथापि, बुमराह पुढील दोन सामन्यांसाठी अद्याप उपलब्ध असणार नाही असे सांगण्यात आले आहे.
ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेदरम्यान बुमराहला दुखापत झाली होती, त्यानंतर तो मैदानावर दिसला नाही. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत खेळलेल्या ३ सामन्यांमध्ये फक्त एकाच विजयाची चव चाखली आहे. मुंबई इंडियन्सचा संघ सध्या पॉईंट टेबलवर २ गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. आजच्या सामन्यात जर लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध मुंबईच्या संघाने विजय मिळवल्यास संघ टॉप ५ मध्ये स्थान मिळवेल. तर मोठ्या संख्येने विजय मिळवल्यास टॉप ४ मध्ये देखील जाण्याची संघाला संधी आहे.
🚨 JASPRIT BUMRAH IS GETTING CLOSER TO RETURN IN THIS IPL 2025 🚨
– But Bumrah is set to miss Mumbai Indians’ next two matches..!!! (ESPNcricinfo). pic.twitter.com/IxZbEvxPbR
— Tanuj (@ImTanujSingh) April 4, 2025
मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह खूप वेगाने बरा होत आहे आणि तो लवकरच आयपीएल २०२५ मध्ये चमक दाखवताना दिसू शकतो. ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावस्कर मालिकेतील शेवटच्या कसोटी सामन्यात बुमराहला दुखापत झाली होती, त्यानंतर तो मैदानापासून दूर आहे. तथापि, बुमराह किमान पुढील दोन सामन्यांमध्ये खेळताना दिसणार नाही. बुमराह लवकरच अंतिम फिटनेस चाचणीला सामोरे जाणार आहे. जर जस्सी तंदुरुस्त झाला तर मुंबई इंडियन्ससाठी ते दिलासादायक ठरेल.
LSG VS MI : लखनऊसमोर नेहमीच फिकी पडली मुंबई? वाचा हेड टू हेड रेकॉर्ड, कोण मारणार बाजी?
आयपीएल २०२५ मध्ये मुंबई इंडियन्सची कामगिरी आतापर्यंत काही खास राहिलेली नाही. एमआयने स्पर्धेची सुरुवात सलग दोन पराभवांनी केली. पहिल्या सामन्यात मुंबईला चेन्नई सुपर किंग्जकडून पराभव पत्करावा लागला. तर, दुसऱ्या सामन्यात गुजरात टायटन्सने एमआयचा ३६ धावांनी पराभव केला. तथापि, शेवटच्या सामन्यात, मुंबईने केकेआरविरुद्ध विजयाची चव चाखली आणि संघाने हा सामना ८ विकेट्सने जिंकला. पाच वेळा विजेत्या एमआयसाठी शेवटच्या सामन्यात, तरुण गोलंदाज अश्विनी कुमारने २४ धावांत चार बळी घेत कहर केला. फलंदाजी करताना रायन रिकेलटनने ४१ चेंडूत ६२ धावांची तुफानी खेळी केली. पुढील सामन्यात, एमआयचा सामना एकाना स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्सशी होईल.