फोटो सौजन्य - X
Lucknow Super Giants vs Mumbai Indians head to head record : लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये आज आयपीएल २०२५ चा १६ वा सामना रंगणार आहे. यामध्ये मुंबई इंडियन्स संघ हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात खेळणार आहेत, तर लखनौ सुपर जॉइंट्सचा संघ रिषभ पंतच्या नेतृत्वात मैदानात उतरणार आहे. आजचा हा सामना लखनऊच्या एकाना स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. आजच्या सामन्याकडे दोन्ही संघांच्या नजरा असणार आहेत. मागील सामन्याबद्दल बोलायचं झालं तर कोलकत्ता नाईट रायडर्सचा पराभव करून मुंबईच्या संघाने आयपीएल २०२५ चा पहिला विजय मिळवला होता तर पंजाब किंग्स विरुद्ध लखनऊला पराभवाचा सामना करावा लागला होता.
त्यामुळे आजच्या सामन्यावर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. आयपीएल २०२५ मध्ये दोन्ही संघांची ही पहिलीच लढत असणार आहे. परंतु आत्तापर्यंत या रंगतदार लीगमध्ये दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यांमध्ये लखनऊचे मुंबईवर वर्चस्व पाहायला मिळाले आहे. लखनऊच्या चाहत्यांना आशा आहे की संघ आज मुंबई इंडियन्स विरुद्ध विक्रमामध्ये आणखी सुधारणा करेल. दोन्ही संघाचा गुणतालिकेबद्दल बोलायचे झाले तर मुंबईच्या संघाने केकेआर विरुद्ध जिंकलेल्या सामन्यानंतर टॉप चार मध्ये स्थान मिळवण्याचा प्रयत्न करेल.
LSG have a terrific record against five-time champions Mumbai Indians in their IPL meetings 🔥🔝
They have also won both encounters at the Ekana Stadium. Can MI turn the tables this time? 💙👀#IPL2025 #LSGvMI #RishabhPant #HardikPandya #Sportskeeda pic.twitter.com/oMf8IHIRmb
— Sportskeeda (@Sportskeeda) April 4, 2025
मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यामध्ये आतापर्यंत ६ सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये लखनऊच्या संघाने मुंबई इंडियन्स विरुद्ध पाच सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे तर मुंबईच्या संघाने लखनऊ विरुद्ध एकमेव सामना जिंकला आहे. मागील तीन सामन्यांमध्ये लखनऊच्या संघाने मुंबईचा सलग तीन वेळा पराभव केला आहे.
MI Vs LSG: आज मुंबई-लखनौ आमनेसामने; दोघांना विजय आवश्यक, ‘या’ खेळाडूंवर असणार नजर
आयपीएल २०२५ चा पंधराव्या सामन्यानंतर गुणतालिकेवर नजर लागली तर मुंबई इंडियन्सचा मागील सामना केकेआर विरुद्ध झाला होता. या सामन्यांमध्ये विजय मिळवल्यानंतर मुंबई इंडियन्सचा संघ गुणतालिकेमध्ये सहाव्या स्थानावर आहे. जर आज मुंबईचा संघ लखनऊविरुद्ध विजय मिळवण्यात यशस्वी झाला तर टीम पाचव्या स्थानावर पोहोचेल. मुंबई इंडियन्सच्या संघाने जर लखनऊ विरुद्ध मोठा धावसंख्येने विजय मिळवला तर टॉप चारमध्ये मुंबई इंडियन्स संघ पोहोचले. तर लखनौ सुपर जायंट्सचा मागील सामन्यात झालेल्या पंजाब किंग्सच्या पराभवानंतर सध्या गुणतालिकेमध्ये सातव्या स्थानावर आहे. त्यामुळे आजच्या सामन्यांमध्ये विजय मिळवून गुणतालिकेमध्ये चांगला स्थानावर जाण्यासाठी लखनऊचा संघ लढेल.