Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

MI vs PBKS : Suryakumar Yadav ची गाडी काही थांबेना! IPL मध्ये रचला इतिहास, Sachin Tendulkar ला टाकले पिछाडीवर; वाचा सविस्तर.. 

क्वालिफायर-२ सामन्यात मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज आमनेसामने आले होते. यामध्ये पंजाबने विजय मिळवला होता. या सामन्यात सूर्यकुमार यादवने सचिन तेंडुलकरला मागे टाकत इतिहास रचला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jun 02, 2025 | 08:16 PM
MI vs PBKS: Suryakumar Yadav's car never stops! Created history in IPL, left Sachin Tendulkar behind; Read in detail..

MI vs PBKS: Suryakumar Yadav's car never stops! Created history in IPL, left Sachin Tendulkar behind; Read in detail..

Follow Us
Close
Follow Us:

MI vs PBKS : मुंबई इंडियन्सचा अनुभवी फलंदाज सूर्यकुमार यादव आयपीएल २०२५ मध्ये एकामागून एक विक्रम काबिज करत आहे. अशातच त्याने एक  मोठी कामगिरी केली आहे. तो मुंबईसाठी ७०० धावा करणारा पहिला फलंदाज बनला आहे.  त्याचबरोबर, तो आयपीएलच्या इतिहासात मधल्या फळीत फलंदाजी करताना ७०० धावा करणारा पहिला खेळाडू देखील बनला आहे. तसेच तो १६ सामन्यांमध्ये २५ किंवा त्याहून अधिक धावा करणारा जगातील पहिला फलंदाज बनला आहे.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर काल खेळवण्यात आलेल्या आयपीएल २०२५ क्वालिफायर २ सामन्यात पंजाब किंग्जविरुद्ध ७०० धावांचा टप्पा ओलांडण्यासाठी सूर्याला २७ धावांची गरज होती.  त्याने एमआयकडून खेळत असताना काइल जेमिसनने टाकलेल्या १३ व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर चौकार मारून हा भीम पराक्रम करून दाखवला आहे.

हेही वाचा : PBKS vs RCB Final Match : आयपीएल फायनलपूर्वी Virat Kohli ला मोठा झटका! बेंगळुरूमध्ये करण्यात आली कारवाई…

सूर्याच्या नावे ‘हा’ पराक्रम

सूर्यकुमार यादव हा आयपीएलच्या इतिहासात एका हंगामात ७०० धावा करणारा पहिला नॉन-ओपनर फलंदाज बनला आहे. आयपीएल हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या नॉन-ओपनर फलंदाजांच्या यादीत सूर्या नंतर एबी डिव्हिलियर्स आणि ऋषभ पंत यांचा नंबर येतो. एबीडीने आयपीएल २०१६ मध्ये आरसीबी संघासाठी एकूण ६८७ धावा केल्या होत्या, तर पंतने आयपीएल २०१८ मध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी ६८४ धावा काढल्या होत्या.

आयपीएल हंगामात सर्वाधिक धावा करणारे नॉन-ओपनर फलंदाज

  • ७१७ सूर्यकुमार यादव (२०२५)
  • ६८७ एबी डिव्हिलियर्स (२०१६)
  • ६८४ ऋषभ पंत (२०१८)
  • ६२२ केन विल्यमसन (२०१८)
  • ६०५ सूर्यकुमार यादव (२०२३)

सूर्यकुमार यादव आयपीएल २०२५ मध्ये मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. तो मुंबईसाठी ७०० पेक्षा जास्त धावा करणारा पहिला खेळाडू बनला आहे. यापूर्वी  २०१० मध्ये सचिन तेंडुलकरने सर्वाधिक ६१८ धावा केल्या होत्या.

एमआयसाठी आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

  • ७१७ सूर्यकुमार यादव (२०२५)
  • ६१८  सचिन तेंडुलकर (२०१०)
  • ६०५ सूर्यकुमार यादव (२०२३)
  • ५५३  सचिन तेंडुलकर (२०११)
  • ५४०  लेंडल सिमन्स (२०१५)
  • ५३८  रोहित शर्मा (२०१३)

हेही वाचा : PBKS vs RCB Final Match : IPL च्या अंतिम सामन्यात पंजाब किंग्ज आणि आरसीबी करणार दोन हात; विजेतेपदाचा दावेदार कोण? जाणून घ्या..

सूर्यकुमार यादवच  क्वालिफायर-२ मध्येही  चालली बॅट

क्वालिफायर-२ सामन्यात मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज आमनेसामने आले होते. या सामन्यात सूर्यकुमार यादवने ४४ धावांची खेळी केली होती. या खेळीत ४ चौकार आणि ३ षटकार मारले आहेत. मुंबईने पहिल्या डावात २०३ धावा उभारल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल पंजाब किंग्जने १९ षटकांत ही लक्ष्य पूर्ण करून अंतिम फेरीत प्रवेश केला.

Web Title: Mi vs pbks suryakumar yadav creates history in ipl surpasses sachin tendulkar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2025 | 08:16 PM

Topics:  

  • IPL 2025
  • IPL records
  • MI vs PBKS
  • Sachin Tendulkar
  • Suryakumar Yadav

संबंधित बातम्या

Sachin Tendulkar चा स्पोर्ट्सवेअर ब्रँड TEN x YOU चे भव्य पदार्पण
1

Sachin Tendulkar चा स्पोर्ट्सवेअर ब्रँड TEN x YOU चे भव्य पदार्पण

Ind vs WI 2nd Test :  यशस्वी जयस्वालचा दिल्लीत बोलबाला! डॉन ब्रॅडमनसह ‘या’ भारतीय दिग्गजाच्या यादीत झाला  सामील 
2

Ind vs WI 2nd Test :  यशस्वी जयस्वालचा दिल्लीत बोलबाला! डॉन ब्रॅडमनसह ‘या’ भारतीय दिग्गजाच्या यादीत झाला  सामील 

RCB ला नवा मालक मिळाला? अदर पूनावालाचे नाव समोर; एक्सवरील ‘त्या’ पोस्टने उडाला गोंधळ 
3

RCB ला नवा मालक मिळाला? अदर पूनावालाचे नाव समोर; एक्सवरील ‘त्या’ पोस्टने उडाला गोंधळ 

IND VS PAK : ‘आधी नक्वीसोबत हस्तांदोलन, पण ट्रॉफीस नकार? कर्णधार सूर्या अडचणीत? वाचा सविस्तर…
4

IND VS PAK : ‘आधी नक्वीसोबत हस्तांदोलन, पण ट्रॉफीस नकार? कर्णधार सूर्या अडचणीत? वाचा सविस्तर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.