Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

MI vs RR Live: वानखेडेवर महामुकाबला! राजस्थानसमोर प्लेऑफचं आव्हान, मुंबईने टॉस जिंकत घेतला ‘हा’ निर्णय

MI vs RR Toss Live: मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आज अत्यंत महत्वाचा सामना खेळला जाणार आहे. त्यामुळे वानखेडेच्या मैदानावर नाणेफेक मोठी भूमिका बजावणार आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 24, 2026 | 03:34 PM
MI vs RR Live: वानखेडेवर महामुकाबला! राजस्थानसमोर प्लेऑफचं आव्हान, मुंबईने टॉस जिंकत घेतला ‘हा’ निर्णय
Follow Us
Close
Follow Us:

आयपीएल २०२६ मध्ये आज  शेवटचे २ लीग स्टेज सामने खेळले जाणार आहेत. हा हंगामातील हा शेवटचा डबलहेडर आहे. पहिल्या सामना  मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला जात आहे. हा सामना मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर काही वेळातच ३.३० वाजता  खेळला जाईल. त्याआधी, ३ वाजता दोन्ही संघाचे कर्णधार, हार्दिक पांड्या आणि रियान पराग नाणेफेकीसाठी मैदानात उतरले आहेत. मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर, राजस्थानला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले आहे. मुंबई इंडियन्सने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल केला, तर राजस्थान रॉयल्सने तीन बदल केले.

या सामन्यात  राजस्थानचा नियमित कर्णधार रियान पराग पुन्हा मैदानात उतरला आहे. तो दुखापतीमुळे लखनौविरुद्धच्या सामन्यात संघाबाहेर होता. मुंबई या स्पर्धेतून आधीच अधिकृतपणे बाहेर पडली आहे. परंतु, राजस्थानसाठी हा सामना ‘करो या मरो’ असा असणार आहे. राजस्थानने हा सामना जिंकल्यास ते थेट प्लेऑफसाठी क्वालिफाय करतील. रॉयल्स संघ सध्या १४ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. मुंबई इंडियन्सविरुद्ध विजय मिळवल्यास त्यांचे १६ गुण होतील.

IPL 2026: ‘शाब्बास अर्जुन!’ मुलाच्या शानदार पदार्पणानंतर सचिन तेंडुलकर भावुक; पोस्ट करत म्हणाला…

मुंबईने जिंकला टॉस

हार्दिकने सांगितले की, या सामन्यासाठी जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली असून दीपक चहरला संधी देण्यात आली आहे. रवींद्र जडेजाचे राजस्थान संघात पुनरागमन झाले आहे. या महत्त्वाच्या सामन्यासाठी राजस्थानने प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन बदल केले आहेत. जडेजासोबतच नांद्रे बर्गरचाही संघात समावेश करण्यात आला आहे.

MI vs RR Pitch पिच रिपोर्ट

मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स हा सामना वानखेडे स्टेडियमवरील खेळपट्टी क्रमांक ६ वर खेळला जाईल. यापूर्वी, या हंगामात या खेळपट्टीवर दोन सामने खेळले गेले आहेत. हा दुपारचा सामना असल्याने, प्रथम फलंदाजी करणे चांगला पर्याय ठरु शकतो. या मैदानावर हाय- स्कोअरिंग सामने पाहायला मिळाले आहेत. या खेळपट्टीवर २०० पेक्षा जास्त धावा करता येतील असा अंदाज आहे. खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल असेल, परंतु जोरदार वाऱ्याच्या शक्यतेमुळे वेगवान गोलंदाजांना फायदा होऊ शकतो. रविवारी दुपारी मुंबईत काही प्रमाणात पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे कर्णधार प्रथम गोलंदाजी करण्याचा पर्याय निवडू शकतात. तसेच, या मैदानावर दव मोठी भूमिका बजावू शकतो, म्हणून नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणे फायदेशीर ठरेल.

दोन्ही संघाचे प्लेइंग ११ –

मुंबई इंडियन्स: रायन रिकेल्टन (विकेटकीपर), नमन धीर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (क), विल जॅक्स, कॉर्बिन बॉश, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, एएम गझनफर, रघु शर्मा.

इम्पॅक्ट सबस्टिट्यूट: रोहित शर्मा, मयंक रावत, रॉबिन मिंज, क्रिश भगत, ट्रेंट बोल्ट.

राजस्थान रॉयल्स: यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रियान पराग (क), डोनोवन फरेरा, शुभम दुबे, दासून शनाका, जोफ्रा आर्चर, नांद्रे बर्गर, यशराज पुंजा, ब्रिजेश शर्मा.

इम्पॅक्ट सबस्टिट्यूट: रवींद्र जडेजा, सुशांत मिश्रा, अमन राव पेराला, रवी बिश्नोई, तुषार देशपांडे.

IPL 2026: RCB ची चिंता वाढली; प्लेऑफपूर्वी ‘हा’ स्टार फलंदाज स्पर्धेतून बाहेर, संघासमोर मोठं आव्हान

Web Title: Mi vs rr toss update wankhede stadium ipl 2026 mumbai indians vs rajasthan royals match report

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2026 | 03:19 PM

Topics:  

  • IPL 2026
  • mumbai indians
  • Rajasthan Royals

संबंधित बातम्या

IPL 2026: RCB ची चिंता वाढली; प्लेऑफपूर्वी ‘हा’ स्टार फलंदाज स्पर्धेतून बाहेर, संघासमोर मोठं आव्हान
1

IPL 2026: RCB ची चिंता वाढली; प्लेऑफपूर्वी ‘हा’ स्टार फलंदाज स्पर्धेतून बाहेर, संघासमोर मोठं आव्हान

IPL 2026: ‘शाब्बास अर्जुन!’ मुलाच्या शानदार पदार्पणानंतर सचिन तेंडुलकर भावुक; पोस्ट करत म्हणाला…
2

IPL 2026: ‘शाब्बास अर्जुन!’ मुलाच्या शानदार पदार्पणानंतर सचिन तेंडुलकर भावुक; पोस्ट करत म्हणाला…

MI vs RR: करो किंवा मरो लढत! वानखेडेवर धावांचा पाऊस की गोलंदाजांचा कहर? जाणून घ्या पिच रिपोर्ट
3

MI vs RR: करो किंवा मरो लढत! वानखेडेवर धावांचा पाऊस की गोलंदाजांचा कहर? जाणून घ्या पिच रिपोर्ट

IPL 2026 मध्ये Shreyas Iyer ने केला राडा; ‘सरपंच’चे शानदार शतक; प्ले-ऑफची शर्यत कायम…
4

IPL 2026 मध्ये Shreyas Iyer ने केला राडा; ‘सरपंच’चे शानदार शतक; प्ले-ऑफची शर्यत कायम…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.