फोटो सौजन्य - Social Media
फेडरल बँक पुणे मॅरेथॉन 2025 ही नववर्षातील पहिली मॅरेथॉन येत्या 5 जानेवारीला पुण्यात होणार आहे. फिटनेस आयकॉन आणि फेडरल बँक पुणे मॅरेथॉनचे ब्रँड ॲम्बेसेडर मिलिंद सोमण हाफ मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहेत. त्यांनी समुदायाला या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. मिलिंद सोमण यांची कारकीर्द मॉडेलिंग, अभिनय आणि फिटनेस क्षेत्रात वैविध्यपूर्ण राहिली आहे. त्यांनी आयर्नमॅन ट्रायथलॉन 15 तास 19 मिनिटांत पूर्ण करून जगभरात ख्याती मिळवली आहे. त्याशिवाय अल्ट्रामॅन ट्रायथलॉनमध्येही यशस्वी सहभाग घेतला आहे. आपल्या फिटनेसविषयक दृष्टिकोनाबाबत ते म्हणाले, “मन हे सर्वात शक्तिशाली स्नायू आहे. तंदुरुस्ती म्हणजे जीवनाचा आनंद सकारात्मक मार्गाने घेणे. फेडरल बँक पुणे मॅरेथॉनमध्ये सर्वांनी सामील व्हावे.”
फेडरल बँकेचे मुख्य विपणन अधिकारी एम. व्ही. एस. मूर्ती याप्रसंगी बोलताना म्हणाले, “फेडरल बँक पुणे मॅरेथॉनच्या पहिल्या आवृत्तीचा शुभारंभ हा आमच्यासाठी एक रोमांचक क्षण आहे. फेडरल बँकेसाठी पुणे ही एक अतिशय महत्त्वाची आणि विस्तारणारी बाजारपेठ आहे. नागपूर, सातारा, नाशिक, कोल्हापूरमध्ये आमचा बँकीग व्यवसाय विस्तारत असताना मॅरेथॉन्समुळे स्थानिक समुदायाशी जोडण्याची आम्हाला संधी मिळत आहे. कॉस्मोपॉलिटन रुपामुळे पुण्याची इतर राज्यांच्या राजधान्यांशी असलेल्या थेट कनेक्टिव्हिटीमुळे फेडरल बँक पुणे मॅरेथॉन केवळ तेथील धावपटूंनाच पुण्याकडे आकर्षित करत नाही, तर त्यांच्या धावगतीला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचा मित्रपरिवार आणि कुटुंबालासुध्दा या शहराकडे आकर्षित करेल, अशी आम्हाला आशा आहे. आमच्या बँकेतील सहकाऱ्यांनी अभिमान बाळगावा अशा पध्दतीने ते ग्राहकांना सातत्याने प्रदान करत असलेली सेवा त्याचबरोबर समुदायाशी आमचे घट्टपणे जुळलेले बंध याचा अनुभव प्रत्येकाने घ्यावा, अशी आमची नितांत इच्छा आहे. या उत्कृष्ट मॅरेथॉनसाठी तयार झालेला माहौल आणखी वातावरणनिर्मिती करेल, अशी मला खात्री आहे. २०२५ च्या शुभारंभप्रसंगी फेडरल बँक पुणे मॅरेथॉनमध्ये धावपटूंच्या सर्वोत्कृष्ट कामगिरीबाबत सोशल मीडियावरील विविध पोस्ट आणि त्यांच्यासंदर्भात झळकणाऱ्या माहितीची मी अतिशय आतुरतेने वाट पाहत आहे.”
‘द सह्याद्री रन’ असे नाव असलेल्या या मॅरेथॉनमध्ये पुण्याचे सांस्कृतिक व भौगोलिक वैशिष्ट्य उलगडले जाणार आहे. अनुभवी व हौशी धावपटूंसाठी विविध गट ठेवण्यात आले आहेत.
मॅरेथॉन वेळापत्रक:
फेडरल बँक ही भारतातील आघाडीची खासगी बँक असून देशभरात 1,533 शाखा आणि 2,052 एटीएम्स आहेत. 30 सप्टेंबर 2024 रोजी बँकेच्या व्यवसायाची एकूण उलाढाल ₹4.99 लाख कोटी होती. बँकेचे प्रतिनिधी कार्यालय दुबई व अबू धाबी येथे असून ती एनआरआय ग्राहकांसाठी महत्त्वाची भूमिका बजावते. मॅरेथॉनच्या तयारीसाठी पुणे सज्ज असून, स्पर्धकांचा उत्साह वाढत आहे!