मोहम्मद शमी(फोटो-सोशल मीडिया)
Syed Mushtaq Ali Trophy 2025 : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सध्या भारतीय संघाच्या बाहेर आहे. त्याने देशांतर्गत कामगिरीने सर्वांना चकित केल आहे. शमीचा आत्मविश्वास आणि गोलंदाजी कौशल्य अद्याप देखील अबाधित आहे. निवडकर्ते मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष करत असेल तरी मोहम्मद शमी प्रत्येक वेळी त्याच्या मैदानी कामगिरीने एक मजबूत इशारा देत आहे. सध्या तो सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये बंगालसाठी उत्कृष्ट कामगिरी करताना दिसत आहे.
हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या सामन्यात, बंगालकडून खेळणाऱ्या मोहम्मद शमीने हरियाणाविरुद्ध शानदार गोलंदाजीचे प्रदर्शन केले आहे. मोहम्मद शमीने त्याच्या चार षटकांच्या स्पेलमध्ये चार महत्त्वपूर्ण बळी टिपले. त्याने फक्त ३० धावा मोजत ४ बळी घेण्याची किमया साधली. त्याच्या गोलंदाजीसमोर हरियाणाच्या फलंदाजांना जास्त काळ दम धरता आल नाही.
या सामन्यात, मोहम्मद शमीने यशवर्धन दलाल, सुमित कुमार, आशिष सिवाच आणि अमित राणा यांना माघारी पाठवले. त्याच्या चेंडूंमधील तीक्ष्णता आणि स्विंग जबरदस्त होता. त्यामुळे त्याने सामना बंगालच्या बाजूने झुकवला. शमीची कामगिरी आतापर्यंतच्या स्पर्धेतील सर्वात प्रभावी स्पेलपैकी एक मानण्यात येत आहे.
मोहम्मद शमीने आतापर्यंतच्या सात सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी सामन्यांमध्ये १६ विकेट्स घेण्याची किमया केली आहे. तो बंगालच्या सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक असून त्याने प्रत्येक सामन्यात संघासाठी महत्त्वाची भूमिका वठवली आहे. देशांतर्गत क्रिकेटमधील टेकया कामगिरीवरुन हे दिसून येते की, तो अजून देखील भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी तयार आहे.
मोहम्मद शमी भारताकडून त्याचा शेवटचा सामना २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. तेव्हापासून तो राष्ट्रीय संघात आपले स्थान मिळवण्यात अपयशी ठरला आहे. तथापि, देशांतर्गत क्रिकेटमधील त्याच्या कामगिरीमुळे त्याला सतत दुर्लक्षित करण्यात असून असे का होत आहे? यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.
३५ वर्षीय मोहम्मद शमीने भारतासाठी ६४ कसोटी, १०८ एकदिवसीय आणि २५ टी-२० सामने खेळलेले आहेत. त्याच्याकडे कसोटीत २२९, एकदिवसीय सामन्यात २०६ आणि टी-२० सामने २७ विकेट्स जमा आहेत. आयपीएलमध्ये, शमीने १२० सामन्यांमध्ये १३३ विकेट्स मिळवल्या आहेत.
हेही वाचा : काय सांगता? 2025 हे वर्ष क्रिकेट जगतासाठी वाईट स्वप्न! 40 दिग्गजांनी घेतला अखेरचा श्वास






