LSG चे मालक संजीव गोयंकांकडून Mohammad Shami चे स्वागत(फोटो-सोशल मीडिया)
Mohammed Shami welcomed by Sanjeev Goenka : लखनऊ सुपर जायंट्सने आयपीएल २०२६ साठी त्यांचा वेगवान गोलंदाजी विभाग मजबूत करण्यासाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. संघाने सनरायझर्स हैदराबादकडून अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची देवाणघेवाण केली आहे. एसआरएचकडून आयपीएल २०२५ साठी शमीला १० कोटी रुपयांना करारबद्ध करण्यात आले होते. आता शमी एलएसजीमध्ये सामील झाला आहे.
या व्यवहारानंतर, ऋषभ पंत एलएसजीचा कर्णधार म्हणून मैदानावर खेळताना दिसणार आहे. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली, संघ नवीन रणनीतींसह लीगमध्ये एंट्री करत आहे. अर्जुन तेंडुलकर देखील मुंबई इंडियन्सकडून एलएएसजी संघामध्ये ३० लाख रुपयांना सामील झाला आहे, ज्यामुळे संघातील तरुण आणि अनुभवी खेळाडूंचे संतुलन मजबूत झाल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा : IPL 2026 Retention : फ्रँचायझींकडून ट्रेड खेळाडूंची यादी जाहीर! ‘या’ स्टार खेळाडूंनी संघ बदलले
मोहम्मद शमीच्या संघात सामील होण्याबद्दल एलएसजीचे मालक संजीव गोयंका खूप उत्साहित असल्याचे दिसून आले होते.. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले की, “स्माईल, तू लखनऊमध्ये आहेस, सुपर जायंट्स कुटुंबात स्वागत आहे.” या पोस्टवर चाहत्यांनीही मजेदार प्रतिक्रिया देखील दिली आहेत. काहींनी लिहिले, “तुम्ही हसाल का?” तर काहींनी विनोद केला की त्याला विकेट्ससोबत बिर्याणी देखील मिळेल. एका वापरकर्त्याने गोयंका यांना शमीला टीम इंडियामध्ये परत आणण्यासाठी पाठिंबा देखील मागितला आहे.
मोहम्मद शमीचा अनुभव कोणत्याही संघासाठी महत्वाचा ठेवा आहे. २०१३ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केल्यापासून, त्याने पाच वेगवेगळ्या फ्रँचायझींसाठी एकूण ११९ सामने खेळलेले आहेत. एसआरएचमध्ये येण्यापूर्वी, तो गुजरात टायटन्सचा एक भाग होता, जिथे त्याने २०१३ मध्ये पर्पल कॅपल देखील गवसणी घातली होती. यंदये त्याने १७ सामन्यांमध्ये २८ विकेट्स घेतल्या होत्या. दुखापतीमुळे त्याला २०२४ हंगामात त्याला खेळता आले नाही. २०२३ मध्ये जीटीच्या जेतेपद मिळवून देण्यात शमीने महत्त्वाची भूमिका बजावली.
हेही वाचा : IND vs SA 1st Test : भारताला मोठा झटका! शुभमन गिल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर?
एलएसजीला आता आपसकह आहे की, अनुभवी वेगवान गोलंदाज शमी त्यांच्या आक्रमणात एक नवीन धार जोडणार.त्याच्या गोलंदाजीमध्ये संघाच्या प्लेऑफच्या आशा मजबूत होतील. तज्ञांनी असा विश्वास व्यक्त केला आहे की, आयपीएल २०२५ साठी ही सर्वात मोठी धोरणात्मक चाल आहे.






