
mp medha kulkarani
यासंदर्भात प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी सांगितले की, सायकल वापरण्यास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम गेल्या सहा वर्षांपासून आयोजित केला जात आहे. सायकलचे शहर अशी पुण्याची ओळख आहे. सायकल वापरणे आरोग्यासाठी लाभदायक आहे. यंदाच्या सायकल रॅलीतही सहा हजारांहून अधिक सायकलस्वार सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. ही रॅली केवळ सायकल चालविण्याचा कार्यक्रम नसून, सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन आणि आरोग्यजागृतीचा संदेश देणारा उपक्रम आहे. नागरिक, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सायकलप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या चळवळीला बळ द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
पुणेकरांचा नाद कराल तर पराभूतच व्हाल! महिला फुटबॉल स्पर्धेत सलग दोन वर्षे जिंकले विजेतेपद
यावेळी काही गरजू मुलामुलींना सायकलचे मोफत वाटप करण्यात करण्यात येणार आहे. रॅलीत सहभागी प्रत्येकाला पदक, प्रमाणपत्र आणि टी-शर्ट देऊन गौरविण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. या सायकल रॅलीच्या निमित्ताने गरीब गरजू विद्यार्थ्यांना १५० सायकलींचे मोफत वाटप करण्यात येणार आहे.
प्रारंभ: बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल, मयूर कॉलनी, कोथरूड, पुणे
सांगता: बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल, मयूर कॉलनी, कोथरूड, पुणे.
मार्ग : कर्वे रोड – गुडलक चौक मार्गे वळून डेक्कन जिमखाना बस स्टॉप, छत्रपती संभाजी महाराज पुतळा, खंडोजी बाबा चौक, सावरकर स्मारक मार्गे कर्वेरोड मार्गे परत
Q Sports League Pune: डेक्कन जिमखाना ऐसेस संघाची विजयी सुरुवात! आरसीबीसी ऑल स्टार्सचा ४-१ असा धुव्वा
फॅमेली वॉकेथॉन / चालणे (वॉकिंग / रनिंग)
प्रारंभ : बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल, मयूर कॉलनी, कोथरूड, पुणे
सांगता : बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल, मयूर कॉलनी, कोथरूड, पुणे
मार्ग : कर्वे रोड – नळ स्टॉप वळण कर्वे रोड मार्गे परत