- ‘व्योहर-डेक्कन जिमखाना करंडक’ क्यु स्पोर्ट्स लीग (फोटो- सोशल मिडिया)
पहिल्या एकेरीमध्ये डेक्कन जिमखानाच्या प्रशांत नातू याने अनुप मल्होत्रा याचा १०६-६२ असा पराभव केला. दुहेरीच्या सामन्यात डेक्कनच्या सचिन बिचे आणि अनिल दुबे या जोडीने आरसीबीसीच्या रॉबिन पॉल आणि चिराग मेहता या जोडीचा ८७-७७ असा पराभव केला आणि २-० अशी आघाडी घेतली. डेक्कनच्या सिद्धांत टेंब याचा फरशीद इरानी याने ४०-४७ असा पराभव करून प्रतिकार केला. मात्र, उदय पुंडे याने समीर साल्वा याचा ७५-३६ असा आणि समर खंडेलवाल याने पंकज जगसिया याचा ६१-४८ असा पराभव करून डेक्कन जिमखाना ऐसेस संघाला ४-१ असा विजय मिळवून दिला.
Pune Table Tennis Competition: स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलांच्या गटात वरदन कोलतेचा सनसनाटी विजय
याआधी स्पर्धेचे उद्घाटन डेक्कन जिमखाना क्लबचे सरचिटणीस मिहीर केळकर, डेक्कन जिमखाना क्लबचे वित्तसचिव गिरीष इनामदार आणि व्योहरचे जनसंपर्क व्यवस्थापक प्रतिक गोखले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डेक्कन जिमखानाचे बिलीयर्डस् आणि स्नुकर विभागाचे उदय पुंडे, स्पर्धेचे संचालक समर खंडेलवाल, महाराष्ट्र बिलीयर्डस् आणि स्नुकर संघटनेचे समिती सदस्य राजवर्धन जोशी, बिलीयर्डस् आणि स्नुकर विभागाचे सचिव सतिश शाळीग्राम, क्लबचे सदस्य राजेंद्र कदम आदि मान्यवर उपस्थित होते.
पुण्यात Badminton चा थरार! मानांकन असूनही पराभव; ‘या’ युवा खेळाडूंनी रचला इतिहास
डेक्कन जिमखाना ऐसेस वि. वि. आरसीबीसी ऑल स्टार्स ४-१ (प्रशांत नातू वि. वि. अनुप मल्होत्रा १०६-६२; सचिन बिचे / अनिल दुबे वि. वि. रॉबिन पॉल / चिराग मेहता ८७-७७; सिद्धांत टेंब पराभूत वि. फरशीद इरानी ४०-४७; उदय पुंडे वि.वि. समीर साल्वा ७५-३६; समर खंडेलवाल वि.वि. पंकज जगसिया ६१-४८)






