महिला फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धा (फोटो- सोशल मिडिया)
जळगांव येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयम मैदानावर झालेल्या या अंतिम सामन्यात दोन्ही संघांनी चुरशीची लढत दिली. पुर्वार्धात पुणे आणि मुंबई संघांनी आक्रमक खेळ केला परंतु गोल करण्यामध्ये दोन्ही संघांना अपयश आले. उत्तरार्धात पुणे संघाने काही नवीन चाली रचत आपला खेळ उंचावला. खेळाडूंच्या उत्तम संयोजनाच्या जोरावर मुंबई संघावर दबाव निर्माण केला. याशिका तेजवानी ४७ व्या मिनिटाला गोल करून पुणे संघाचे खाते उघडले. त्यानंतर आघाडीच्या फळीतील अरमीत कौर आणि रितिका सिंग यांनी प्रत्येकी एकेक गोल करून संघाची आघाडी ३-० अशी वाढवून संघाचा विजय निश्चित केला.
Q Sports League Pune: डेक्कन जिमखाना ऐसेस संघाची विजयी सुरुवात! आरसीबीसी ऑल स्टार्सचा ४-१ असा धुव्वा
विजेत्या पुणे संघाला करंडक, पदक आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. पुणे संघाच्या याशिका तेजवानी हिला स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान तसेच अंतिम सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान मिळाला. पुणे संघाच्या रितिका सिंग हिला उत्कृष्ट आक्रमक खेळाडूचा मान मिळाला.
डेक्कन जिमखाना क्लबच्यावतीने आयोजित ‘व्योहर-डेक्कन जिमखाना करंडक’ क्यु स्पोर्ट्स आंतरक्लब लीग २०२६ स्पर्धेत डेक्कन जिमखाना ऐसेस संघाने आरसीबीसी ऑल स्टार्स संघाचा ४-१ असा पराभव करून स्पर्धेचा उद्घाटनाचा दिवस गाजवला. डेक्कन जिमखाना क्लबच्या बिलीयर्डस् आणि स्नुकर हॉलमध्ये झालेल्या या सामन्यात प्रशांत नातू, सचिन बिचे, अनिल दुबे, उदय पुंडे आणि कर्णधार समर खंडेलवाल यांनी केलेल्या कामगिरीच्या जोरावर विजयी कामगिरी केली.
Pune Table Tennis Competition: स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलांच्या गटात वरदन कोलतेचा सनसनाटी विजय
पहिल्या एकेरीमध्ये डेक्कन जिमखानाच्या प्रशांत नातू याने अनुप मल्होत्रा याचा १०६-६२ असा पराभव केला. दुहेरीच्या सामन्यात डेक्कनच्या सचिन बिचे आणि अनिल दुबे या जोडीने आरसीबीसीच्या रॉबिन पॉल आणि चिराग मेहता या जोडीचा ८७-७७ असा पराभव केला आणि २-० अशी आघाडी घेतली.






