(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
2024 टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर रोहित शर्माने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर सूर्यकुमार यादवला भारताच्या T20 संघाचा कर्णधार बनवण्यात आलं. कर्णधारपद हे फक्त भूषवण्याचं नसतं तर ते सांभाळण्याचं असतं. त्याच्याकडे संपूर्ण संघासह भारतीयांच्याही अपेक्षा लागून असतात. त्या अपेक्षा सूर्याने या वर्ल्डकपमध्ये पूर्णपणे पार पाडल्या आहेत. पण सूर्याला कर्णधार करावं या कोणाचा निर्णय असावा. याबाबत सूर्याने स्वतःच उघड केले आहे की कोणत्या 4 ने त्याला कर्णधार बनवण्याचा निर्णय घेतला होता.
भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने पीटीआयला सांगितले की, ‘एक वेळ अशी होती की, बीसीसीआयचे तत्कालीन सचिव जय भाई यांनी श्रीलंका मालिकेच्या तीन-चार दिवस आधी फोन केला होता. त्यानी मला फोन करून सांगितले की तो मला टी-20 संघाचा कर्णधार बनवत आहे. होय, त्यानी मला पहिल्यांदा कॉल करुन ही बातमी सांगितली. ‘
सूर्या पुढे म्हणाला, ‘पण मला सगळ्याबद्दल अगोदरपासूनच अंदाज होता. हे सर्व रोहित भाई आणि अजित भाई यांनी आधीच ठरवलेलं होतं याबाबत मला कल्पना होतीच. त्या कॉलनंतर गौतम भाई आले. ते राहुल सरांना भेटले. कारण त्यावेळी प्रशिक्षक राहुल द्रविड होते. यांच्यासोबत जय भाईशी चर्चा केली आणि यानंतर त्यांनी भारताच्या नेतृत्वासाठी माझी निवड निश्चित केली.’
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने 52 पैकी 42 टी-20 सामने जिंकले आहेत. त्याच्या नेतृत्वाखाली त्याने एकही द्विपक्षीय टी-२० मालिका गमावलेली नाही. 35 वर्षीय सूर्या त्याच्या नेतृत्वाखाली आणखी 8 सामने जिंकल्यास सर्वाधिक T20 सामने जिंकणारा भारतीय कर्णधार बनेल. सूर्यकुमार यादवने भारतासाठी एकूण 113 टी-20 सामने खेळले असून 3272 धावा केल्या आहेत.






