MI vs KKR: Mumbai bowlers bowl out Kolkata for 116 runs, debutant Ashwini Kumar hits a four.
MI vs KKR : IPL 2025 मध्ये या सीझनचा 12 वा सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला जात आहे. हा सामना मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाता आहे. सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली. नाणेफेक जिंकल्यानंतर हार्दिक पंड्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर केकेआर प्रथम फलंदाजीला मैदानात उतरला. कोलकाता संघाने 16.2 ओव्हरमध्ये सर्वबाद 116 धावा केल्या. मुंबईला विजयासाठी 117 धावांचे लक्ष असणार आहे. मुंबईकडून आयपीएलचा डेब्यू सामना खेळणाऱ्या अश्विनी कुमारने 3 ओव्हरमध्ये 24 धावा देत 4 विकेट्स घतेल्या. केकेआरकडून केवळ अंगकृष्ण रघुवंशीने सर्वाधिक 26 धावा केल्या आहेत.
आजच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सची सुरुवात खूपच निराशाजनक झाली. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी 6 षटकांमध्येच कोलकाताच्या 4 फलंदाजांना तंबूत पाठवले. ट्रेंट बोल्टच्या पहिल्या षटकाने सुरुवात झाली. या पहिल्याच षटकात त्याने सुनील नारायणला शून्य धावसंख्येवर माघारी पाठवले. यानंतर दीपक चहरने क्विंटन डी कॉक(1 धाव)ला बाद केले.
हेही वाचा :Viral Video : राजस्थान रॉयल्सने उडवली धोनीची खिल्ली? थाला बाद होताच लिहिले असे काही, वाचा सविस्तर…
तसेच आयपीएलचा डेब्यू सामना खेळणाऱ्या अश्विनी कुमारने केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेला माघारी पाठवले. पॉवरप्लेपर्यंत कोलकाताची धावसंख्या ४१-४ विकेट्स अशी वाईट अवस्था होती. त्यात पुढेही काही बदल झाला नाही तर कोलकाता विकेट देत गेला. यानंतर हार्दिक पांड्याने आंगक्रिश रघुवंशीला बाद(16 चेंडू 26 धावा) करून कोलकात्याची फलंदाजीला खिंडार पाडले. त्यानंतर व्यंकटेश अय्यरलाही फार काही करता आले नाही. त्याला दीपक चहरने आपला शिकार बनवले. त्याने 9 चेंडूत 3 धावा केल्या. मग आलेला ताबोडतोब फलंदाज रिंकू सिंगही लवकर बाद झाला. त्याला अश्विनी कुमारने आपला दूसरा बळी बनवला.
तसेच प्रभावशाली खेळाडू म्हणून फलंदाजीला आलेला मनीष पांडेला देखील अश्विनी कुमारने माघारी पाठवले. त्यानंतर सर्वात धोकादायक आंद्रे रसेलला अश्विनी कुमारने आपला 4 था शिकार बनवला. तो केवळ 11 चेंडूत केवळ 5 धावा करून माघारी परतला. त्यानंतर उर्वरित फलंदाजांना मुंबईच्या गोलंदाजांनी माघारी पाठवले. मुंबईकडून अश्विनी कुमारने 3 ओव्हरमध्ये 24 धावा देत सर्वाधिक 4 विकेट्स घतेल्या. तसेच दीपक चहरने 2 तर ट्रेंट बोल्ट, हार्दिक पंड्या, मिचेल सँटनर आणि विघ्नेश पुथूर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
आयपीएल 2025 च्या 18 व्या हंगामातील 12 वा सामना वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला जाता आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून 23 वर्षीय अश्विनी कुमारने आयपीएलमध्ये पदार्पण केले आहे. मुंबई इंडियन्सने या 23 वर्षीय खेळाडूवर विश्वास दाखवला आहे. त्यानेही या विश्वासाला जागत आपली कामगिरी केली. त्याने केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेला बाद केले. रहाणेने 7 चेंडूत 11 धावा केल्या आहेत. आयपीएल 2025 मधील पहिलीच ओव्हरमधील पहिल्याच चेंडूवर त्याने अजिंक्य रहाणेला आपला पहिला बळी ठरवले. राहणेने टोवलेला चेंडू तिलक वर्माने अफलातून टिपला आणि अश्विनीने आयपीएलमधील आपली पहिली विकेट घेतली. तसेच अश्विनीने रिंकू सिंग आणि प्रभावशाली खेळाडू मनीष पांडेसह आंद्रे रसेलसारख्या महत्वाच्या फलंदाजांना बाद केले.
हेही वाचा :MI vs KKR : कोण आहे अश्वनी कुमार? मुंबईकडून पदार्पणातच घेतली पहिल्या चेंडूवर पहिली विकेट…
मुंबई इंडियन्स : हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, रायन रिक्लेटन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, विल जॅक, नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, विघ्नेश पुथूर.
केकेआर : अजिंक्य रहाणे (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), अंगकृष्ण रघुवंशी, सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, स्पेन्सर जॉन्सन, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.