एम एस धोनी(फोटो-सोशल मीडिया)
CSK vs RR : आयपीएल 2025 चा 18 वा हंगाम सुरुवातीच्या टप्प्यात असून अनेक सामन्यांत थरार अनुभवायला मिळत आहे. काल म्हणजे रविवारी 30 मार्च रोजी राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने भिडले होते. गुहाटीमध्ये हा सामना रंगला होता. या सामन्यात राजस्थानने चेन्नई सुपर किंगचा 6 धावांनी पराभव केला. या विजयाने आरआरने आयपीएलच्या 18 व्या हंगामातील आपला पहिला विजय नोंदवला आहे. तर चेन्नईला लागोपाठ दोन पराभवाला सामोरे जावे लागले. राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करत चेन्नई सुपर किंग्जसमोर 183 धावांचे लक्ष्य उभारले होते. परंतु चेन्नईला 6 गडी गमावत 176 धावाच करता आल्या आणि त्यांना सामना गमवावा लागला. या सामन्यात फलंदाजीला आलेला धोनी आऊट होताच अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
चेन्नई सुपर किंग्जचा संघ यंदा अपेक्षेप्रमाणे खेळताना दिसत नाहीये. पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव करण्यात चेन्नईला यश आले असले तरी त्यानंतर चेन्नई सुपर किंग्जने सलग दोन सामने गमावले आहेत. दुसऱ्या सामन्यात चेन्नईचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून पराभव झाला. तर त्यानंतर तिसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने चेन्नईचा पराभव केला.
हेही वाचा : CSK VS RR : MS Dhoni ची विकेट अन् महिला फॅन रागाने लालबुंद, दिली लक्षात राहील अशी प्रतिक्रिया.., पाहा Video
राजस्थानविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात धोनी फलंदाजीला आला. त्याने 18व्या षटकात दोन षटकार लगावत आपले इरादे स्पष्ट केले. यानंतर चेन्नईला शेवटच्या षटकात विजयासाठी 20 धावांची आवश्यकता होती. अशा परीस्थितीत धोनी आपल्या जुन्या शैलीत सामना संपवून चेन्नईला विजय मिळवून देईल, असे सर्वांना वाटत होते. दरम्यान, राजस्थानकडून शेवटच्या षटकात संदीप शर्मा गोलंदाजी करत होता. दुसरीकडे महेंद्रसिंग धोनी स्ट्राईकवर आला होता, पण 20व्या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर षटकार मारण्याच्या नादात धोनी हेटमायरकडून झेलबाद झाला.
Good Morning 💗pic.twitter.com/td4eMzZI6D
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) March 31, 2025
धोनी बाद होता चेन्नईचा संघ विजयापासून लांब गेला आणि राजस्थानने सामन्यावर नियंत्रण मिळवत विजय मिळवला. आता राजस्थान रॉयल्सने धोनीच्या विकेटचा हा व्हिडिओ ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना राजस्थान रॉयल्सच्या अधिकृत अकाऊंटवरून ‘गुड मॉर्निंग’ असे लिहिण्यात आले आहे. राजस्थान रॉयल्सने ही पोस्ट शेअर केल्यानंतर लोक त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. तर दुसरीकडे काही लोक या पोस्टचे वेगवेगळे अर्थ काढताना देखील दिसत आहेत.
आजकाल प्रत्येक संघाची स्वतःची एक पीआर टीम आहे. अशा परिस्थितीत अनेक संघ सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या संघातील खेळाडूंचे सर्वोत्तम क्षण आणि चांगली कामगिरी दाखवत असतात. जेणेकरून त्या संघाची लोकांमध्ये लोकप्रियता वाढण्यात मदत होईल. राजस्थान रॉयल्सने देखील तेच केलेल दिसून येत आहे. त्याने धोनीची संदीप शर्माने घेतलेली विकेट दाखवली. महेंद्रसिंग धोनीसारख्या दिग्गज खेळाडूची विकेट घेणे ही कोणत्याही गोलंदाजासाठी मोठी गोष्ट असते.