अश्विनी कुमार(फोटो-सोशल मीडिया)
MI vs KKR : आयपीएल 2025 च्या 18 व्या हंगामातील 12 वा सामना वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला जात आहे. सामन्यापूर्वी कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. तर केकेआर प्रथम फलंदाजीला मैदानात उतरले आहे. या सामन्यात मुंबई 18 व्या हंगामातील पहिला विजय मिळवण्याच्या प्रयत्नात याआहे. या सामन्यात मुंबईने चांगली सुरवात केली असून केकेआरचे 4 फलंदाज 50 धावांच्या आतमध्ये माघारी पाठवले आहेत. या सामन्यात चर्चेचा विषय ठरला आहे तो म्हणजे 23 वर्षीय अश्विनी कुमार. त्याने पदार्पणातच पहिल्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर विकेट घेतली आहे. तसेच त्याने या संन्यात 2 ओव्हरमध्ये 18 धावा देत 3 विकेट घेऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अश्विनी कुमार कोण? त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊया.
आयपीएल 2025 च्या 18 व्या हंगामातील 12 वा सामना वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला जाता आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून 23 वर्षीय अश्विनी कुमारने आयपीएलमध्ये पदार्पण केले आहे. मुंबई इंडियन्सने या 23 वर्षीय खेळाडूवर विश्वास दाखवला आहे. त्यानेही या विश्वासाला जागत आपली कामगिरी केली. त्याने केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेला बाद केले. रहाणेने 7 चेंडूत 11 धावा केल्या आहेत. आयपीएल 2025 मधील पहिलीच ओव्हरमधील पहिल्याच चेंडूवर त्याने अजिंक्य रहाणेला आपला पहिला बळी ठरवले. राहणेने टोवलेला चेंडू तिलक वर्माने अफलातून टिपला आणि अश्विनीने आयपीएलमधील आपली पहिली विकेट घेतली. तसेच अश्विनीने रिंकू सिंग आणि प्रभावशाली खेळाडू मनीष पांडेला बाद केले.
आयपीएल 2025 च्या 12 व्या सामन्यात आज मुंबई इंडियन्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी खेळला जाता आहे. मुंबईच्या प्लेइंग ११ मध्ये दोन बदल करण्यात आलेअ आहेत. आजच्या सामन्यात मुंबईकडून अश्विनी कुमारने आयपीएलमध्ये पदार्पण केले आहे. 23 कुमार वर्षीय हा डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. डाव्याखुरा अश्विनी कुमारच्या वेगात वैविध्य असल्याचे बोलले जाते. पंजाबचा अश्विनी हा कटर, स्लो-बाऊंसर, फ्लोटिंग फुलटॉस आणि लेन्थ बॉल टाकू शकतो. अश्विनी हर्षल पटेलप्रमाणे गोलंदाजी करतो. त्याने वयाच्या 18 व्या वर्षी पंजाबसाठी प्रथम श्रेणी पदार्पण केले आहे. वयाच्या 20 व्या वर्षी लिस्ट-अ मध्ये पदार्पण केले आणि वयाच्या 21 व्या वर्षी वरिष्ठ T20 संघात पदार्पण केले.
हेही वाचा :Viral Video : राजस्थान रॉयल्सने उडवली धोनीची खिल्ली? थाला बाद होताच लिहिले असे काही, वाचा सविस्तर…
मुंबई इंडियन्सने त्याला 30 लाख रुपयांच्या मूळ किमतीत विकत घतेले आहे. गेल्या मोसमात तो पंजाब किंग्ज संघाचा देखील एक भाग होता, पण त्याला प्लेइंग 11 मध्ये स्थान देण्यात आले नव्हते. अश्विनी कुमारने पंजाबकडून सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2022 मध्ये पदार्पण केले होते. या स्पर्धेत चार सामने खेळले असून त्याने 8.50 च्या इकॉनॉमीने तीन विकेट मिळवल्या आहेत.
मुंबई इंडियन्स : हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, रायन रिक्लेटन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, विल जॅक, अश्विनी कुमार, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, विघ्नेश पुथूर.
केकेआर : अजिंक्य रहाणे (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, स्पेन्सर जॉन्सन, वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.