Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

National Sports Day: ‘खेल की बात, पीएम के साथ’! राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त वाशिममध्ये तरुणांशी ‘खेलो इंडिया संवाद’

National Sports Day Khelo India Samvad : राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या पार्श्वभूमीवर वाशिममध्ये ‘खेलो इंडिया संवाद-खेल की बात, पीएम के साथ’ या राष्ट्रव्यापी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. ‘मेरा युवा भारत, वाशिम’ आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थी, खेळाडू व स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सह

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 29, 2026 | 08:02 PM
National Sports Day Khelo India Samvad

National Sports Day Khelo India Samvad

Follow Us
Follow Us:
  • राष्ट्रीय क्रीडा दिन
  • तरुणांशी साधला ‘खेलो इंडिया संवाद
  • शांताबाई गोटे महाविद्यालयाचा पुढाकार
वाशिम: राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या पार्श्वभूमीवर विकसित भारत युवा कनेक्ट’ अंतर्गत ‘खेलो इंडिया संवाद-खेल की बात, पीएम के साथ’ या राष्ट्रव्यापी उपक्रमाचे आयोजन राजस्थान आर्य महाविद्यालय आणि मातोश्री शांताबाई गोटे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात करण्यात आले. ‘मेरा युवा भारत, वाशिम‘ आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमात विद्यार्थी, खेळाडू आणि स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

Table Tennis: दोन गेममध्ये पराभव मात्र शानदार पुनरागमन; अनन्या पाटीलने मिळवले अजिंक्यपद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील तरुण आणि खेळाडूंशी संवाद साधताना क्रीडा क्षेत्राच्या विकासात युवकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले. क्रीडा हे केवळ पदक मिळविण्याचे माध्यम नसून शिस्त, आत्मविश्वास, नेतृत्वगुण, संघभावना आणि निरोगी जीवनशैली घडविणारे प्रभावी साधन असल्याचा संदेश त्यांनी दिला. तळागाळातील क्रीडा सुविधा सक्षम करणे, गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण आणि प्रशिक्षक उपलब्ध करून देणे, तसेच ग्रामीण व दुर्गम भागातील प्रतिभावान खेळाडूंना संधी उपलब्ध करून देण्यावर त्यांनी भर दिला. भारताच्या २०३६ ऑलिम्पिकच्या आकांक्षांच्या पार्श्वभूमीवर युवा खेळाडूंची शास्त्रीय पद्धतीने निवड, दीर्घकालीन प्रशिक्षण आणि सर्वांगीण विकासाची आवश्यकता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तरुणांनी नियमित व्यायाम आणि खेळाला जीवनशैलीचा भाग बनवावा, व्यसनांपासून दूर राहावे तसेच समाज आणि राष्ट्राच्या विकासात सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. मातोश्री शांताबाई गोटे महाविद्यालयातील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजय गोटे होते. माध्यमिक शिक्षणाधिकारी मंगल धुपे, प्रा. डॉ. जी. एस. कुबडे आणि डॉ. सुमित गोटे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

खेळाडूंच्या अनुभवातून तरुणांना मार्गदर्शन

राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व केलेले खेळाडू संघर्ष खिल्लारे आणि अंकिता सावळे तसेच राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत कलर कोड प्राप्त खेळाडू साहिल राऊत यांनीही कार्यक्रमात सहभाग घेतला. तरुणांनी क्रीडा क्षेत्रातील उपलब्ध संधी, प्रशिक्षण आणि सुविधांबाबत संवाद साधला. प्रास्ताविक डॉ. डी. एन. लांजेवार यांनी केले. ‘मेरा युवा भारत’ केंद्राचे कार्यक्रम अधिकारी अनिल देंगे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. एस. पी. कुमरे, प्रा. एस. एस. काळपांडे आणि डॉ. जी. ए. बळी यांनी सहकार्य केले.

Hardik-Bumrah च्या फिटनेसवर मोठी अपडेट! अफगाणिस्तान मालिकेत मैदानावर दिसणार? प्रिन्स यादव पूर्णपणे फिट

Web Title: National sports day 2026 khelo india samvad washim

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2026 | 08:02 PM

Topics:  

  • Khelo India tournament
  • Washim news

संबंधित बातम्या

Washim News: कर्जमुक्तीचा दुसरा टप्पा; तब्बल १७ हजार शेतकऱ्यांना मिळाला १५० कोटींचा लाभ, ७, ४०४ आधार प्रमाणीकरण बाकी
1

Washim News: कर्जमुक्तीचा दुसरा टप्पा; तब्बल १७ हजार शेतकऱ्यांना मिळाला १५० कोटींचा लाभ, ७, ४०४ आधार प्रमाणीकरण बाकी

National Sports Day: ‘मेजर ध्यानचंद यांची खेळाप्रती असलेली प्रतिभा अन्…’; PM Modi यांचा Video व्हायरल
2

National Sports Day: ‘मेजर ध्यानचंद यांची खेळाप्रती असलेली प्रतिभा अन्…’; PM Modi यांचा Video व्हायरल

नेपाळमध्ये अडकलेल्यांनी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा -वाशिम जिल्हा प्रशासनाचे आवाहन
3

नेपाळमध्ये अडकलेल्यांनी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा -वाशिम जिल्हा प्रशासनाचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.