
crime (फोटो सौजन्य: social media)
वर्षभरापासून सुरु होते अत्याचार
ऑक्टोबर २०२४ पासून सातारा जिल्ह्यातील कराड येथील कोपर्डे हवेली परिसरात घडत होता. आरोपींनी या अल्पवयीन मुलाला प्रेमसंबंधाचे आमिष दाखवून आणि धमकावून शारीरिक व मानसिक त्रास दिला. एवढेच नाही तर आरोपींनी कथित शारीरिक संबंधाचे व्हिडीओ, फोटो तयार करून ते सार्वजनिक करण्याची धमकी दिली होती. या ब्लॅकमेलिंगच्या भीतीपोटी पीडित मुलाने ही बाब कोणालाही सांगितली नव्हती. याप्रकरणी नेरुळ पोलिसांनी या प्रकरणी तक्रार प्राप्त होताच POCSO Act 2012 : कलम 11 व 12 (लैंगिक छळ), Juvenile Justice Act 2015: कलम 75 व 77 (बालकांवरील क्रूरता आणि अमली पदार्थांचा वापर) तातडीने गुन्ह्याची नोंद केली आहे.
या प्रकरणात पीडित तरुणाचा जबाब ‘ई-साक्ष’ प्रणालीद्वारे नोंदवण्यात आला आहे. ज्यामुळे पीडित बालकाला सुरक्षित वातावरणात आपली बाजू मांडता आली. सध्या या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. मात्र, अद्याप या प्रकरणात कोणालाही अटक झालेली नाही आहे. यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
धावत्या लोकलमधून 18 वर्षीय तरुणीला ढकललं; नवी मुंबई येथील घटना
नवी मुंबईमधून एक धक्कदायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. गुरुवारी सकाळच्या सुमारास एका १८ वर्षीय तरुणीला धावत्या लोकलमधून खाली ढकलून दिल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. लोकलमधील महिला डब्यात एक ५० वर्षीय पुरुष घुसला होता. महिलांनी त्याला जाब विचारला असता तो संतापला आणि त्याने एका १८ वर्षीय तरुणीला धावत्या लोकलमधून खाली ढकलून दिले. यात तरुणी गंभीर जखमी झाली. तरुणी ही अभियांत्रिकीची विद्यार्थिनी आहे. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ही घटना पनवेल ते खांदेश्वर स्थानकादरम्यान घडली.
Ans: नवी मुंबई, नेरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत.
Ans: अद्याप अटक नाही; पोलीस तपास सुरू आहेत.
Ans: मुलांच्या सुरक्षिततेसाठी मोबाईल वापरावर नियंत्रण, शाळा-पालक संवाद, संशयास्पद व्यक्तींवर लक्ष ठेवणे.