Neeraj Chopra New Coach Jan Zelezny : भारताचा स्टार भालाफेकपटू आणि दोन वेळा ऑलिम्पिकपदक विजेता नीरज चोप्रा यांचे प्रशिक्षक क्लॉस बार्टोविट्झ निवृत्त झाले आहेत आणि ते जर्मनीला परतले आहेत. आता नीरज चोप्रा यांना त्यांचा नवा प्रशिक्षक मिळाला आहे.
नीरज चोप्राच्या नव्या प्रशिक्षकाची घोषणा
ऑलिम्पिक पदक विजेता आणि भारताचा सुवर्ण मुलगा नीरज चोप्राने एक मोठी बातमी शेअर केली आहे. क्लॉस बारटोनिट्झ यांच्या निवृत्तीनंतर नीरज चोप्राच्या नव्या प्रशिक्षकाची घोषणा करण्यात आली आहे. जॉन झेलेझनी नीरज चोप्राचे नवे प्रशिक्षक बनले आहेत. त्याच्या नावावर अनेक ऑलिम्पिक सुवर्णपदके आणि जागतिक विजेतेपद तसेच अनेक विक्रम आहेत. ते नीरजचे पूर्वीचे प्रशिक्षक डॉ. क्लॉस बार्टोनिएझ यांची जागा घेतील, ज्यांच्यासोबत नीरजने दोन ऑलिम्पिक आणि दोन जागतिक चॅम्पियनशिप पदके जिंकली आहेत.
झेलेजानीचे प्रशिक्षक बनल्याने नीरज चोप्रा आनंदी
नीरज चोप्रा यांनी आता तीन वेळा ऑलिम्पिक चॅम्पियन आणि सध्याचा विश्वविक्रम धारक जॉन झेलेझनी यांना त्यांच्या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षक म्हणून निवडले आहे. भारतीय क्रीडा मंत्रालयाच्या टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम (TOPS) अंतर्गत झेलेझनी यांना ही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली असून त्यांच्या पगाराचा खर्चही मंत्रालय उचलणार आहे.
लहानपणापासून नवीन प्रशिक्षकाचा चाहता
या नवीन प्रवासाबद्दल उत्साह व्यक्त करताना नीरज चोप्रा म्हणाले, “लहानपणापासूनच मी झेलेझनीच्या तंत्राचा आणि अचूकतेचा खूप मोठा चाहता आहे. त्याचे व्हिडिओ पाहून मला नेहमीच प्रेरणा मिळाली. आता त्याच्यासोबत काम करण्याची संधी ही माझ्यासाठी एक नवीन संधी आहे. कारकीर्द वाढेल आमच्या फेकण्याच्या शैली देखील खूप समान आहेत, ज्याचा मला या भागीदारीचा फायदा होईल.
झेलेजानीचा विक्रम अजून मोडलेला नाही
1992, 1996 आणि 2000 च्या ऑलिम्पिक गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या भालाफेकच्या जगातील एक नाव म्हणजे जॅन झेलेझनी. 1996 मध्ये 98.48 मीटर अंतर फेकून त्याने तयार केलेला विक्रम आजतागायत मोडता आलेला नाही. झेलेझनीकडे 1993, 1995 आणि 2001 चे जागतिक विजेतेपद देखील आहे. त्याच्या रेकॉर्डमध्ये जगातील टॉप 10 पैकी पाच सर्वात लांब फेकांचा समावेश आहे. झेलेझनीने झेक प्रजासत्ताकच्या काही सर्वोत्तम खेळाडू जसे की जेकब वडलेज, विटेझस्लाव्ह वेसेली आणि तीन वेळा विश्वविजेती बार्बोरा स्पोटाकोवा यांनाही प्रशिक्षण दिले आहे.
पॅरिस आॅलिम्पिकमध्ये रौप्यपदकाला गवसणी
भालाफेक खेळाडू नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये रौप्य पदक जिंकले. पॅरिस आॅलिम्पिकमध्ये भालाफेकच्या अंतिम फेरीत नीरजने दुसरे स्थान पटकावले. नीरजने 2020 च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. यावेळी त्याच्याकडून सुवर्णपदकाची अपेक्षा होती, मात्र त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. पाकिस्तानच्या अर्शद नदीमने 92.97 मीटर फेक करून सुवर्णपदक पटकावले आहे. टोकियो पेक्षा जास्त थ्रो करूनही तो दुसऱ्या स्थानावर राहिला कारण पाकिस्तानचा ॲथलेटिक्स अरशद नदीम याने त्याच्या करियरची सर्वात्तम थ्रो करून पाकिस्तानला पहिले सुवर्ण पदक मिळवून दिले