Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

SA Vs NZ Champions Trophy: किवींनी दाखवला दक्षिण आफ्रिकेला बाहेरचा रस्ता; ‘चोकर्स’ला हरवत दिमाखात फायनलमध्ये प्रवेश

सेमी फायनल सामन्यात न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले आहे. या विजयासह न्यूझीलंडने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम  फेरीत धडक मारली आहे. अंतिम सामन्यात आता न्यूझीलंडचा सामना बलाढ्य भारतासोबत होणार आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Mar 05, 2025 | 10:23 PM
SA Vs NZ Champions Trophy: Kiwis show South Africa the way out; Enter final in spirit after defeating 'Chokers'

SA Vs NZ Champions Trophy: Kiwis show South Africa the way out; Enter final in spirit after defeating 'Chokers'

Follow Us
Close
Follow Us:

SA vs NZ : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा दुसऱ्या सेमी फायनल सामन्यात  न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेवर 50 धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह न्यूझीलंडने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. रचिन रवींद्र आणि केन विल्यमसन हे दोन्ही शतकवीर विजयाचे शिल्पकार ठरले. दुबईत 9 मार्चला होणाऱ्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड भारतासोबत भिडणार आहे.

न्यूझीलंडचा डाव..

न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. रचीन रवींद्रसह केन विल्यमसनच्या शतकांच्या जोरावर न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेसमोर 363 धावांचे आव्हान ठेवले होते. चॅम्पियन्स ट्रॉफी सेमी फायनलच्या दुसऱ्या सामन्यात रचीन रवींद्रने शतकी खेळी केली आहे. त्याने 101 चेंडूमध्ये 108 धावा केल्या आहेत. त्याला कासिगो रबडाने आऊट केले. तर केन विल्यमसनने 94 चेंडूचा सामना करत 102 धावा केल्या आहेत. त्याला  विआन मुल्डरने माघारी पाठवले. तसेच ससलामीवीर विल यंग लुंगी एनगिडीने बाहेरचा रस्ता दाखवला.

हेही वाचा :  SA vs NZ : न्यूझीलंडचा द. आफ्रिकेसमोर 362 धावांचा डोंगर; रचीन रवींद्रसह केन विल्यमसनची दमदार शतके..

डॅरिल मिशेलने फटकेबाजी करत 37 चेंडूमध्ये 49 धावांची खेळी केली.  त्याला लुंगी एनगिडीने तंबूत पाठविले. तर टॉम लॅथम रबडाच्या चेंडूवर स्वस्तात बाद झाला. त्याने केवळ 4 धावाच केल्या.  त्यांतर आलेला ग्लेन फिलिप्स 27 चेंडूमध्ये 49 धावांची ताबडतोब फलंदाजी करत नाबाद राहिला. तर मायकेल ब्रासवेलने  16 धावांची भर घातली आणि मिचेल सँटनर 2 धावा करत नाबाद राहीला.

दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगिडीन सर्वाधिक 3 विकेट्स तर कसिगो रबडा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच विआन मुल्डरने एक विकेट्स घेतली. केशव महाराजला मात्र बळी टिपण्यात अपयश आले.

हेही वाचा : SA vs NZ : Kane Williamson ने घातला धावांचा रतीब; केला ‘हा’ रेकॉर्ड, असं करणारा न्यूझीलंडचा ठरला पहिलाच खेळाडू..

दक्षिण आफ्रिकेचा डाव..

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्यात धडक मारण्यासाठी दक्षिण आफ्रिका मैदानात उतरली. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत दक्षिण आफ्रिकेसमोर 363 धावांचे टार्गेट ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरवात निराशाजनक झाली. सलामीवीर  रायन रिकेल्टन 17 धावांवर मॅट हेनरीचा शिकार ठरला. त्यांनंतर आलेला रॅसी व्हॅन डेर ड्युसेन आक्रमक खेळ दाखवत धाव फलक हलता ठेवला. परंतु त्याला मिचेल सँटनरने आपल्या फिरकीत गुंतवले आणि डेर ड्युसेन 66 चेंडूत 69 धावा करून माघारी परतला.

तसेच सलामीवीर कर्णधार टेम्बा बावुमाने अर्धशतकी खेळी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, मिचेल सँटनरने बावुमाचा(71 चेंडूत 56 धावा) काटा काढला आणि  बावुमाला तंबूचा रस्ता पकडावा लागला.  चार नंबरवर आलेला  एडन मार्करामडून (29 चेंडूत 31 धावा) दक्षिण आफ्रिकेला अपेक्षा होत्या. मात्र तो जास्त वेळ मैदानात तग धरू शकला नाही. त्याला रचिन रवींद्रने बाद केले. त्यांनंतर फॉर्मात असलेला हेनरिक क्लासेन फलंदाजीला आला. परंतु, 3 धावांवर त्याला सँटनरने माघारी धाडले. तर विआन मुल्डर 8 धावा करून बाद झाला. त्यांतर आलेला मार्को जॉन्सन 3 धावांवर ग्लेन फिलिप्सचा शिकार ठरला. केशव महाराजही (1 धाव) स्वस्तात बाद झाला. त्याला ग्लेन फिलिप्सने चालतं केलं.  डेव्हिड मिलर एक बाजू लावून धरत 67 चेंडूत 100 धावांची नाबाद खेळी केली, परंतु दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवून देण्यास अपयशी ठरली.

न्यूझीलंडकडून  कर्णधार मिचेल सँटनरने 29 धावा देत सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच मॅट हेन्री आणि  ग्लेन फिलिप्स यांनी प्रत्येकी  2 गडी बाद केले. तर मायकेल ब्रेसवेलने 1 गडी बाद केला.

दक्षिण आफ्रिकेचे प्लेइंग इलेव्हन

रायन रिकेल्टन, टेम्बा बावुमा (कर्णधार), रॅसी व्हॅन डेर ड्युसेन, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, एडन मार्कराम, विआन मुल्डर, मार्को जॉन्सन, केशव महाराज, केशवजी महाराज, लुंगी एनगिडी

न्यूझीलंडची प्लेईंग इलेव्हन

विल यंग, ​​रचिन रवींद्र, केन विल्यमसन, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर (क), मॅट हेन्री, काइल जेमिसन, मायकेल ब्रासवेल

Web Title: New zealand defeated south africa by runs at champions trophy semi final sports marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2025 | 10:23 AM

Topics:  

  • Champions Trophy 2025
  • ICC
  • ICC Champions Trophy 2025
  • kane williamson
  • Mitchell Santner
  • Semifinal

संबंधित बातम्या

मॅच फिक्सिंग प्रकरणी श्रीलंकेच्या खेळाडूवर ५ वर्षांची बंदी, ICC ने घेतला कठोर निर्णय
1

मॅच फिक्सिंग प्रकरणी श्रीलंकेच्या खेळाडूवर ५ वर्षांची बंदी, ICC ने घेतला कठोर निर्णय

Rohit Sharma: चॅम्पियन्स ट्रॉफीचा ‘अनसीन व्हिडिओ’ आला समोर, रोहित शर्माने निवृत्तीवर दिली होती ‘ही’ प्रतिक्रिया
2

Rohit Sharma: चॅम्पियन्स ट्रॉफीचा ‘अनसीन व्हिडिओ’ आला समोर, रोहित शर्माने निवृत्तीवर दिली होती ‘ही’ प्रतिक्रिया

ICC वनडे रँकिंगमध्ये रोहित शर्माची लाॅटरी! तर ‘या’ भारतीय खेळाडू पहिल्या स्थानी विराजमान, बाबर आझमचे मोठे नुकसान
3

ICC वनडे रँकिंगमध्ये रोहित शर्माची लाॅटरी! तर ‘या’ भारतीय खेळाडू पहिल्या स्थानी विराजमान, बाबर आझमचे मोठे नुकसान

शुभमन गिल ठरला चौथ्यांदा ICC Player of the Month चा विजेता! ‘या’ दोन मातब्बर खेळाडूंना दिला धोबीपछाड
4

शुभमन गिल ठरला चौथ्यांदा ICC Player of the Month चा विजेता! ‘या’ दोन मातब्बर खेळाडूंना दिला धोबीपछाड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.