Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Smriti Mandhana Wedding: स्मृती नाही, तर पलाशने ढकलली लग्नाची तारीख पुढे; सिंगरच्या आईचा मोठा खुलासा, काय घडले नेमके?

Smriti Mandhana Postpond: लग्नाच्या दिवशी, स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांना अचानक हृदयविकाराची लक्षणे जाणवली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. यामुळे लग्नाचे समारंभ पुढे ढकलावे लागले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Nov 25, 2025 | 09:56 PM
स्मृती नाही, तर पलाशने स्वतः ढकलली लग्नाची तारीख पुढे (Photo Credit - X)

स्मृती नाही, तर पलाशने स्वतः ढकलली लग्नाची तारीख पुढे (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • स्मृती-पलाशच्या लग्नाची तारीख का पुढे ढकलली?
  • सिंगरच्या आईने केला खुलासा
  • ‘तो’ निर्णय घेण्यामागे होते मोठे कारण
Smriti Mandhana Palash Muchhal Wedding: क्रिकेटपटू स्मृती मानधना (Smriti Mandhana) आणि फिल्ममेकर-संगीतकार पलाश मुच्छल (Palash Muchhal) यांच्या लग्नाची चर्चा सध्या खूप रंगली आहे. २३ नोव्हेंबर रोजी सांगली येथे होणारे त्यांचे लग्न कुटुंबाने अचानक स्थगित केले. लग्नाची तारीख पुढे ढकलल्याची घोषणा होताच, पलाश मुच्छलवर सोशल मीडियावर फसवणुकीचे आरोपही व्हायरल झाले होते. मात्र, कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचे लग्न आरोग्य आणीबाणीमुळे (Health Emergency) पुढे ढकलण्यात आले आहे.

वडिलांच्या आजारपणाने पलाशला आला तणाव

लग्नाच्या दिवशी स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांना अचानक हृदयविकाराच्या झटक्यासारखी लक्षणे दिसल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यामुळे सर्वात आधी लग्नाचे विधी थांबवण्यात आले. या घटनेनंतर लगेचच होणाऱ्या नवरदेवाची, पलाश मुच्छलचीही तब्येत बिघडली. सततचा प्रवास, कॉन्सर्ट्स आणि लग्नाच्या तयारीमुळे पलाश खूप तणावात (Stress) आला होता. रिपोर्ट्सनुसार, त्याला व्हायरल इन्फेक्शन आणि ऍसिडिटीच्या तक्रारीमुळे सांगली येथील रुग्णालयात दाखल केले गेले आणि नंतर अधिक काळजी म्हणून मुंबईतील गोरेगाव येथील एसव्हीआर रुग्णालयात हलवण्यात आले.

हे देखील वाचा: लग्नाआधी वाद विकोपाला! धक्कादायक चॅट व्हायरल; पलाश मुच्छलकडून स्मृती मानधनाची फसवणूक? 

“तो खूप रडत होता…” पलाशने घेतला भावनिक निर्णय

पलाशची नेमकी स्थिती किती गंभीर आहे, याची अधिकृत माहिती अद्याप नसली तरी, लग्नाच्या नवीन तारखेबद्दल अनिश्चितता वाढली आहे. ‘हिंदुस्तान टाइम्स’नुसार, स्मृतीच्या वडिलांची तब्येत बिघडल्याचे कळताच लग्नाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय खुद्द पलाशने घेतला. पलाशची आई अमिता मुच्छल यांनी सांगितले, “पलाशचे अंकल (श्रीनिवास मंधाना) यांच्याशी खूप घट्ट नाते आहे… अनेकदा स्मृतीपेक्षाही जास्त.

जेव्हा ते आजारी पडले, तेव्हा सर्वात आधी पलाशनेच सांगितले की, अंकल पूर्णपणे बरे होईपर्यंत फेरे होणार नाहीत.” त्यांनी पलाशच्या भावनिक स्थितीबद्दल सांगितले की, मानधना कुटुंबाच्या अडचणीच्या बातमीने पलाशला भावनिक धक्का बसला.

“हळदीचा कार्यक्रम झाल्यापासून आम्ही त्याला बाहेर जाऊ दिले नाही. तो रडत रडत इतका तणावात आला की त्याची तब्येत बिघडली. त्याला चार तास रुग्णालयात ठेवून IV ड्रिप, ECG आणि इतर आवश्यक तपासण्या कराव्या लागल्या. सर्व रिपोर्ट्स नॉर्मल होते, पण पलाशवर तणावाचा खूप परिणाम झाला आहे.”

हे देखील वाचा: ग्राउंडपासून ते वर्ल्ड कपपर्यंत! Smriti Mandhana च्या क्रिकेट कारकिर्दीला आकार देणारे वडील Shrinivas Mandhana कोण आहेत?

Web Title: Not smriti but palash himself postponed the wedding date singers mother makes a big revelation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 25, 2025 | 09:55 PM

Topics:  

  • Palash Muchhal
  • Smriti Mandhana
  • Sports

संबंधित बातम्या

भारतात होणाऱ्या T20 World Cup 2026 चे बिगुल वाजले! IND vs PAK लढत ‘या’ दिवशी, तर फायनलची तारीखही निश्चित
1

भारतात होणाऱ्या T20 World Cup 2026 चे बिगुल वाजले! IND vs PAK लढत ‘या’ दिवशी, तर फायनलची तारीखही निश्चित

लग्नाआधी वाद विकोपाला! धक्कादायक चॅट व्हायरल; पलाश मुच्छलकडून स्मृती मानधनाची फसवणूक? 
2

लग्नाआधी वाद विकोपाला! धक्कादायक चॅट व्हायरल; पलाश मुच्छलकडून स्मृती मानधनाची फसवणूक? 

भारतीय संघाची आनंदाची बातमी! या दिनी टीम इंडियामध्ये हार्दिक पंड्या करणार कमबॅक, वाचा सविस्तर
3

भारतीय संघाची आनंदाची बातमी! या दिनी टीम इंडियामध्ये हार्दिक पंड्या करणार कमबॅक, वाचा सविस्तर

Smriti Mandhana Wedding : “रडून रडून मला त्रास…” स्मृती मानधनासोबतचे लग्न पुढे ढकलल्यानंतर आईने सांगितले कारण
4

Smriti Mandhana Wedding : “रडून रडून मला त्रास…” स्मृती मानधनासोबतचे लग्न पुढे ढकलल्यानंतर आईने सांगितले कारण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.