Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cricket World Cup 2011! आजच्याच दिवशी भारताने वनडे विश्वचषक उंचावला, धोनीच्या ‘त्या’ षटकाराने सर्वांच्याच डोळ्यात पाणी..  

भारतानेयाच दिवशी 2011 मध्ये 28 वर्षानंतर महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेचा पराभव करत दुसऱ्यांदा एकदिवसीय विश्वचषक आपल्या नावे केला होता. एम एस धोनीचा तो अविस्मरणीय षटकार आणि भारत विश्वविजेता ठरला होता.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Apr 02, 2025 | 12:12 PM
Cricket World Cup 2011! On this day, India lifted the ODI World Cup, Dhoni's 'that' six brought tears to everyone's eyes..

Cricket World Cup 2011! On this day, India lifted the ODI World Cup, Dhoni's 'that' six brought tears to everyone's eyes..

Follow Us
Close
Follow Us:

ODI Cricket World Cup 2011  : भारताने याच दिवशी 2011 मध्ये 28 वर्षानंतर महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेचा पराभव करत दुसऱ्यांदा  एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. श्रीलंकेने भारतासमोर 275 धावांचे लक्ष्य ठेवले होते. 275 धावांचा पाठलाग करताना सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर फार काही न करता स्वस्तात बाद झाले होते, तेव्हा मैदानात आलेले गौतम गंभीर आणि विराट कोहली यांनी डाव सावरत सारी सूत्रे हातात घेतली होती. यानंतर कर्णधार एमएस धोनीने 91 धावांची नाबाद खेळी करत असताना एक षटकार खेचून टीम इंडियाला एकदिवसीय विश्वचषक जिंकून दिला होता. हा क्षण भारतीय चाहत्यांसह खेळाडूंच्या डोळ्यात पाणी आणणारा ठरला होता. याच एकदिवसीय विश्वचषकविषयी जाणून घेऊया.

श्रीलंकेचा कर्णधार कुमार संगकाराने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. महेला जयवर्धनेच्या शतकाच्या जोरावर संघाला 274 धावापर्यंत मजल मारता आली होती. त्याने 103 धावांची खेळी केली होती. भारताकडून झहीर खान आणि युवराज सिंगने प्रत्येकी  2 विकेट घेतल्या होत्या. यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना लसिथ मलिंगाने भारताला धडकी भरवणारा पहिला ओव्हर टाकला. त्यात त्याने  दुसऱ्या चेंडूवर वीरेंद्र सेहवागला एलबीडब्ल्यू बाद केले यानी भारतीयांचा ठोका चुकला.

हेही वाचा : LSG Vs PBKS : ‘भारतासाठी खेळण्याचे ध्येय..’, एलएसजीविरुद्ध वादळी खेळी खेळणाऱ्या प्रभसिमरन सिंगने केली इच्छा व्यक्त…

सचिन बाद अन् भारतीयांच्या डोळ्यात पाणी..

संपूर्ण स्पर्धेत सचिन तेंडुलकरने चांगली कामगिरी केली होती, त्यातील विशेष खेळी(85) पाकिस्तानविरोधात आली होती. अंतिम सामन्यात मात्र मलिंगाने सचिनला (18) 7 व्या  षटकाच्या पहिल्या चेंडूवर माघारी पाठवले. तेव्हा भारताचे 31 धावांवर दोन्ही सलामीवीर माघारी गेले होते. या वाईट परिस्थितीमध्ये टीम इंडियाचा डाव सावरला तो म्हणजे गौतम गंभीर आणि विराट कोहली (35)  या फलंदाजांनी.  यांनी 83 धावांची भागीदारी केली होती. यानंतर गंभीरने एमएस धोनीसोबत १०९ धावांची भागीदारी रचत भारताचा विजय सोपा केला होता. गौतम गंभीरला थीसारा परेराने बाद केले आणि ही जोडी फोडली. गंभीरने 122 चेंडूचा सामना करत 97 धावांची शानदार खेळी केली होती.

एमएस धोनीचा विजयी षटकार अन्..

गंभीरसोबत भागीदारी केल्यानंतर रचल्यानंतर एमएस धोनीने युवराज सिंगसह डाव पुढे नेण्यास सुरवात केली. धोनीने 79 चेंडूत 91 धावांची खेळी केली. त्याने नुवान कुलसेकराच्या चेंडूवर अप्रतिम आणि सर्व भारतीयांच्या लक्षात राहील असा विजयी षटकार ठोकला होता. त्यावेळी मैदनावर धोनीसोबत युवराज सिंगही एका बाजूने उभा होता. 28 वर्षांनंतर भारताने दुसरा एकदिवसीय विश्वचषक आपल्या नावावर केला होता. त्या रात्री भारतात दिवाळी साजरी  करण्यात आली होती.  संपूर्ण देशातील लोक रस्त्यावर विजयाचा आनंद साजरा करताना दिसून येत होती. अंतिम सामना जिंकल्यानंतर भारतीय दिग्गज खेळाडूंना आपले अश्रू अनावर झाले होते. ते सर्व मैदानावरच रडताना सर्व देशवासीयांनी बघितले होते. सचिन, गंभीर, हरभजन, धोनी, युवराज सिंग यासारख्या दिग्गजांच्या डोळ्यात पाणी तरळताना सर्वांनीच पाहिले होते.

हेही वाचा : LSG vs PBKS : निकोलस पूरनला बाद करताच चहलचा सुटला ताबा! केली हीन भाषेत टिप्पणी, पाहा Video

2011 च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील भारतीय 11 खेळाडू

वीरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर, गौतम गंभीर,  एमएस धोनी,  विराट कोहली, युवराज सिंग, सुरेश रैना, हरभजन सिंग, झहीर खान, मुनाफ पटेल, श्रीशांत.

Web Title: On this day india won the odi world cup 2011

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2025 | 12:10 PM

Topics:  

  • Cricket World Cup
  • Gautam Gambhir
  • Kumar Sangakkara
  • Mahela Jayawardene
  • MS Dhoni Captain
  • Sachin Tendulkar
  • Suresh Raina
  • virat kohali
  • yuvraj singh
  • Zaheer Khan

संबंधित बातम्या

T20 Asia Cup मध्ये सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू कोण? हार्दिक पंड्याकडे त्याला मागे टाकण्याची नामी संधी
1

T20 Asia Cup मध्ये सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू कोण? हार्दिक पंड्याकडे त्याला मागे टाकण्याची नामी संधी

Photo : 290 डावांनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतकांचा राजा कोण? भारताचे तीन खेळाडू टाॅप 5 मध्ये सामील
2

Photo : 290 डावांनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतकांचा राजा कोण? भारताचे तीन खेळाडू टाॅप 5 मध्ये सामील

जय शाहपासून ते अनिल कुंबळेपर्यंत, क्रिकेटपटूंकडून श्रीकृष्णजन्माष्टमीच्या खास शुभेच्छा; वाचा सविस्तर..
3

जय शाहपासून ते अनिल कुंबळेपर्यंत, क्रिकेटपटूंकडून श्रीकृष्णजन्माष्टमीच्या खास शुभेच्छा; वाचा सविस्तर..

सारा तेंडुलकरने सुरु केली नवी कंपनी! वडीलांनी केले उद्घाटन, सचिनच्या सुनेसोबत शेअर केला फोटो…
4

सारा तेंडुलकरने सुरु केली नवी कंपनी! वडीलांनी केले उद्घाटन, सचिनच्या सुनेसोबत शेअर केला फोटो…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.