Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Sports: ९३५ खेळाडू अन् विजयाचा थरार! ‘विनायकी क्रीडा महोत्सवा’त तायक्वांदो स्पर्धेचा महासंग्राम

विनायकी क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून पुणे शहर आणि जिल्ह्यातील युवा खेळाडूंना विविध क्रीडा प्रकारांमध्ये आपले कौशल्य सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 22, 2026 | 09:45 PM
Pune Sports: ९३५ खेळाडू अन् विजयाचा थरार! ‘विनायकी क्रीडा महोत्सवा’त तायक्वांदो स्पर्धेचा महासंग्राम
Follow Us
Follow Us:
  • पुणे जिल्ह्यातील तब्बल ९३५ खेळाडूंचा सहभाग
  • सुस रोडवरील सनीज वर्ल्ड येथे २२ व २३ ऑगस्टला रंगणार सामने
  • कौशल्य सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न
पुणे: सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने आणि माजी आमदार कै. विनायक निम्हण यांच्या जयंतीनिमित्त आयोजित विनायकी क्रीडा महोत्सवाअंतर्गत जिल्हास्तरीय खुल्या तायक्वांदो स्पर्धेला भरघोस प्रतिसाद लाभला असून, पुणे जिल्ह्यातून तब्बल ९३५ खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे. सुस रोड येथील पेरीडॉट हॉल, सनीज वर्ल्ड येथे दि. २२ व २३ ऑगस्ट २०२६ रोजी ही स्पर्धा रंगणार आहे.

विनायकी क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून पुणे शहर आणि जिल्ह्यातील युवा खेळाडूंना विविध क्रीडा प्रकारांमध्ये आपले कौशल्य सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या महोत्सवाअंतर्गत यापूर्वी  बॅडमिंटन,  कॅरम,  बुद्धिबळ,  धनुर्विद्या, स्केटिंग आणि मल्लखांब या क्रीडा प्रकारांतील विविध स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडल्या असून, त्यांना राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता.

स्नुकरचा थरार! स्कायलाईन स्ट्रायकर्सचा तिसरा, तर बदामीकर स्टार्सचा दुसरा शानदार विजय

जिल्ह्यातून ९०० हून खेळाडूंचा सहभाग

स्पर्धेविषयी माहिती देताना सोमेश्वर फाउंडेशनचे सदस्य तथा नगरसेवक सनी निम्हण म्हणाले, “विनायकी क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून पुणे शहर आणि जिल्ह्यातील युवा खेळाडूंना विविध क्रीडा प्रकारांमध्ये आपले कौशल्य दाखविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. तायक्वांदो स्पर्धेला जिल्ह्यातून तब्बल ९०० हून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदविला असून, ही अत्यंत उत्साहवर्धक बाब आहे. खेळाडूंमध्ये शिस्त, आत्मविश्वास, जिद्द आणि खिलाडूवृत्ती निर्माण करण्यासाठी अशा स्पर्धा अत्यंत महत्त्वाच्या ठरतात.”

पुण्याचा १९ वर्षीय सार्थक चव्हाण ठरला नॅशनल चॅम्पियन! मद्रास इंटरनॅशनल सर्किटवर ऐतिहासिक विजेतेपद!

 

 खेळाडूंना ‘बेस्ट फायटर’ पुरस्काराने गौरवणार

पुणे जिल्हा तायक्वांदो संघटनेच्या मान्यतेखाली ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धा क्युरोगी आणि पुंगसे या दोन प्रकारांमध्ये होणार आहे. यामध्ये फ्रेशर्स, सब ज्युनियर, कॅडेट, ज्युनियर आणि वरिष्ठ अशा विविध वयोगटांतील खेळाडूंचा समावेश असून, विविध वजनी गटांमध्ये सामने खेळविण्यात येणार आहेत. स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना रोख रकमेची पारितोषिके, प्रशस्तिपत्रके, करंडक आणि टी-शर्ट प्रदान करण्यात येणार आहेत. याशिवाय स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना ‘बेस्ट फायटर’ पुरस्कारानेही गौरविण्यात येणार आहे.

Web Title: Overwhelming response to taekwondo competition at vinayaki sports festival 935 athletes participated pune sports news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2026 | 09:45 PM

Topics:  

  • pune news
  • Pune Sports News
  • Sports News

संबंधित बातम्या

पुण्यातील सभेत राहुल गांधींनी मांडली महिलांवरील अत्याचाराची आकडेवारी, बऱ्याच प्रकरणांची नोंदच होत नसल्याचा केला दावा
1

पुण्यातील सभेत राहुल गांधींनी मांडली महिलांवरील अत्याचाराची आकडेवारी, बऱ्याच प्रकरणांची नोंदच होत नसल्याचा केला दावा

‘महिला या देशाची सर्वात मोठी ताकद’; राहुल गांधींच्या ‘छात्रो की गुंज’मध्ये तरुणाईशी संवाद
2

‘महिला या देशाची सर्वात मोठी ताकद’; राहुल गांधींच्या ‘छात्रो की गुंज’मध्ये तरुणाईशी संवाद

‘Hockey स्पर्धेत उडाली खळबळ! फायनलच्या ट्रॉफीवर कोण कोरणार नाव? झारखंड की हरियाणा?
3

‘Hockey स्पर्धेत उडाली खळबळ! फायनलच्या ट्रॉफीवर कोण कोरणार नाव? झारखंड की हरियाणा?

राहुल गांधींच्या कार्यक्रमापूर्वीच ABVP-NSUI वाद चिघळला; विद्यार्थिनींना धमकावल्याचा काँग्रेसचा आरोप
4

राहुल गांधींच्या कार्यक्रमापूर्वीच ABVP-NSUI वाद चिघळला; विद्यार्थिनींना धमकावल्याचा काँग्रेसचा आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.