पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा पडला उघडा (फोटो- ट्विटर)
पाकिस्तान कायमच आपण दहशतवाद्यांना आश्रय देत नसल्याचे सांगत आला आहे. मात्र आता यामागचे सत्य समोर आले आहे. भारताच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीत असलेला आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड दहशतवादी शोएब अख्तरच्या भावाच्या दफनविधिला उपस्थित असल्याचे समोर आले आहे. या घटनेचे व्हिडिओ आणि फोटोज समोर आले आहेत.
पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देतो हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. या घटनेचे व्हिडिओ आणि फोटोज व्हायरल झाले आहेत. सोबतच, या प्रकरणावरून क्रिकेटपटू शोएब अख्तरवरही गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. शोएब अख्तर भावाच्या दफनविधीसाठी मोठी गर्दी जमली होती. या गर्दीत जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आणि लष्कर-ए-तोयबा किंवा इतर प्रतिबंधित संघटनेशी संबंधित असलेला कमांडर उघडपणे फिरताना आणि सामील झाल्याचे दिसून आले.
Ex Cricketer Shoaib Akhtar's Brother died of heart attack! Shahid Akhtar's funeral was attended by PMML Islamabad President Inam ur Rehman Kamboh and other LeT terrorists. PMML serves as a proxy for LeT. Why Were LeT Leaders/Terrorists There? pic.twitter.com/ldJiocolCl — Megh Updates 🚨™ (@MeghUpdates) June 27, 2026
शोएब अख्तर हा प्रसिद्ध खेळाडू आहे. शोएब अख्तर हा केवळ पाकिस्तानातच नाही, तर भारतातही प्रचंड लोकप्रिय आहे. तो अनेकदा भारत-पाकिस्तान संबंध सुधारण्यावर आणि शांततेवर भाष्य करत असतो. मात्र त्याच्या भावाच्या दफनविधीला दहशतवादी उपस्थित असल्याने आटा त्याच्यावर देखील टीका केली जात आहे.
सोशल मिडियाव हा व्हिडिओ आणि फोटोज समोर आल्यावर नेटकऱ्यांनी शोएब अख्तर आणि पाकिस्तान सरकारला धारेवर धरले आहे. भारताकडून या प्रकरणावर अधिकृतपणे आणि राजनैतिक पातळीवर तीव्र आक्षेप घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पाकिस्तान नेहमीच आंतरराष्ट्रीय मंचावर आपण दहशतवादाच्या विरोधात असल्याचा आव आणतो.
मात्र, एका आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रसिद्ध क्रिकेटपटूच्या कौटुंबिक कार्यक्रमात थेट भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी दिसल्याने, पाकिस्तान दहशतवाद्यांची सुरक्षित पाठराखण करत असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे.






