पाकिस्तान संघ(फोटो-सोशल मीडिया)
Junior Hockey World Cup 2025 : पाकिस्तानने पुन्हा एकदा आपले खरे दात दाखवले आहेत. नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या ज्युनियर हॉकी आशिया कप २०२५ चे आयोजन भारतात करण्यात येणार आहे. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी पाकिस्तानकडून भारतात येण्यास नकार देण्यात आला आहे. चकित करणारी बाब म्हणजे काही दिवसांपूर्वी पाकिस्तान भारतात येणार असल्याचे सांगितले होते. त्यासाठी पाकिस्तानने सहमति दर्शवली होती. परंतु आता अचानक पाकिस्तानने तसे करण्यास नकार दिला आहे.
पाकिस्तान भारतात येणार असल्याची माहिती त्यावेळी हॉकी इंडियाचे महासचिव यांनीही देली होती. तेव्हा भोलानाथ सिंग यांनी सांगितले होते की, “पाकिस्तानी हॉकी संघ भारताला भेट देणार असून ज्युनियर हॉकी विश्वचषकातही सहभागी होणार आहे.” आता मात्र पाकिस्तानकडून आपला दुटप्पीपणा दाखवून देण्यात कसली कस्सर सोडली नाही.
हेही वाचा : Asia Cup 2025 : आशिया कपमध्ये सूर्यकुमार यादवला विक्रम रचण्याची नामी संधी! ‘या’ खेळाडूंना देणार धोबीपछाड
ज्युनियर हॉकी विश्वचषक २०२५ मध्ये भारतात येणारणसल्याची माहिती पाकिस्तान हॉकी महासंघाकडून देण्यात आली आहे. त्यांनी आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की “पाकिस्तान ज्युनियर संघ भारताच्या दौऱ्यावर येणार नाही. सध्याच्या परिस्थितीमध्ये आम्ही भारतात जाऊ शकत नाही. सध्या भारतासोबत असणारा तणाव बघता, भारतात जाणे पूर्णपणे अशक्य होते. दोन्ही बाजूंनी युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. आम्ही सध्या किंवा भविष्यात भारतात प्रवास करू शकणार नाही. सध्याही परिस्थिती तशीच आहे आणि जर भारतीय क्रिकेट संघ येथे येऊ शकत नसेल, तर पाकिस्तान हॉकी संघ देखील भारतात जाणार नाही.”
यावेळी हॉकी आशिया कप २०२५ भारतातील बिहारच्या राजगीर शहरात आयोजित करण्यात आला आहे. या स्पर्धेत देखील पाकिस्तानने कारणे सांगून तो येणार नाही असे सांगण्यात आले होते. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांनी आशिया कप २०२५ साठी भारतात येण्यास नकार दर्शवला होता.
हेही वाचा : AFG vs PAK : अफगाणिस्तानचा पाकिस्तानला धोबीपछाड! आशिया कपपूर्वी ‘पठाण’ आर्मीने फोडली डरकाळी..
ज्युनियर हॉकी वर्ल्ड कप २०२५ चे भारतातील प्रसिद्ध शहरे, चेन्नई आणि मदुराई आयोजन होणार आहे. या दरम्यान, जगातील २४ संघ या मेगा स्पर्धेत सहभागी होणार असून ज्युनियर हॉकी आशिया कप २०२५ स्पर्धेला २८ नोव्हेंबरपासून सुरूवात होऊन १० डिसेंबरयापर्यंत चलाणार आहे.