Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cricket News: वनडे क्रिकेटचा महासंग्राम! इंग्लंड, पाकिस्तान अन् श्रीलंका भिडणार; ट्राय-सिरीजचे पूर्ण शेड्यूल एका क्लिकवर

Pakistan Sri Lanka England Tri series Timetable: पाकिस्तान, श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यात ट्राय सीरीज खेळवली जाणार आहे. या सामन्याच वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 20, 2026 | 02:35 PM
Cricket News: वनडे क्रिकेटचा महासंग्राम! इंग्लंड, पाकिस्तान अन् श्रीलंका भिडणार; ट्राय-सिरीजचे पूर्ण शेड्यूल एका क्लिकवर
Follow Us
Follow Us:
  • पाकिस्तानच्या मैदानावर श्रीलंका-इंग्लंड भिडणार
  • ट्राय-सिरीजचे वेळापत्रक आले समोर
  • पाकिस्तान- श्रीलंका टी- २० मालिकेचे वेळापत्रक
 

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) १९ ऑगस्ट रोजी पाकिस्तान एकदिवसीय ट्राय सीरीजचे वेळापत्रक जाहीर केले. ही ट्राय सीरीज १८ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान खेळवली जाईल. यामध्ये पाकिस्तान, इंग्लंड आणि श्रीलंका हे संघ सहभागी होतील. ही ट्राय सीरीज रावलपिंडी क्रिकेट स्टेडियम आणि लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळवली जाईल. या मालिकेची सुरुवात १८ ऑक्टोबर रोजी रावलपिंडी येथे पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील सामन्याने होईल.स्पर्धेचा अंतिम सामना ३१ ऑक्टोबर रोजी लाहोरमध्ये खेळला जाईल. सध्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी पाकिस्तानी संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. त्यानंतर पाकिस्तान संघ ९ ऑक्टोबरपासून मायदेशात श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका खेळेल.

IND vs SL 2nd Test: श्रीलंकेचा पुन्हा धुव्वा उडणार? Team India व्हाईटवॉशच्या तयारीत! दुसरा कसोटी सामना कधी?

ट्राय सीरीजचे वेळापत्रक जाहीर

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ट्राय सीरीजचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यासोबत, पीसीबीने श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिन्ही सामने ९, ११ आणि १३ ऑक्टोबर रोजी रावलपिंडीच्या मैदानावर खेळवल्या जाणार असल्याचीही घोषणा केली. यानंतर, १८ ऑक्टोबरपासून एकदिवसीय ट्राय सीरीजला सुरू होईल, ज्यातील पहिले तीन सामने रावलपिंडीमध्येच खेळले जातील. २० ऑक्टोबर रोजी पाकिस्तानचा सामना त्याच मैदानावर इंग्लंडशी होईल आणि त्यानंतर २२ ऑक्टोबर रोजी श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यात सामना खेळला जाईल.त्यानंतर हे तिन्ही संघ लाहोरला जातील. जिथे पाकिस्तानचा सामना २५ ऑक्टोबर रोजी इंग्लंडशी आणि २७ ऑक्टोबर रोजी श्रीलंकेशी होईल. सहावा सामना, श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यात, २९ ऑक्टोबर रोजी खेळला जाईल आणि ३१ ऑक्टोबर रोजी गद्दाफी स्टेडियमवर अव्वल दोन संघ अंतिम सामन्यात आमनेसामने येतील. यापूर्वी, पाकिस्तानने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या अगदी आधी ट्राय मालिकेचे आयोजन केले होते, ज्यामध्ये पाकिस्तानने न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेसह भाग घेतला होता.

पाकिस्तान- श्रीलंका टी- २० मालिकेचे वेळापत्रक

  • पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका – पहिला टी२० सामना ९ ऑक्टोबर रोजी (रावलपिंडी क्रिकेट स्टेडियम)
  • पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका – दुसरा टी२० सामना ११ ऑक्टोबर रोजी (रावलपिंडी क्रिकेट स्टेडियम)
  • पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका – तिसरा टी२० सामना, १३ ऑक्टोबर (रावलपिंडी क्रिकेट स्टेडियम)

वनडे ट्राय सीरीजचे वेळापत्रक

  • पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका – पहिला एकदिवसीय सामना, १८ ऑक्टोबर (रावलपिंडी क्रिकेट स्टेडियम)
  • पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड – दुसरा एकदिवसीय सामना, २० ऑक्टोबर (रावलपिंडी क्रिकेट स्टेडियम)
  • श्रीलंका विरुद्ध इंग्लंड – तिसरा एकदिवसीय सामना, २२ ऑक्टोबर (रावलपिंडी क्रिकेट स्टेडियम)
  • पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड – चौथा एकदिवसीय सामना, २५ ऑक्टोबर (गद्दाफी स्टेडियम, लाहोर)
  • पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका – पाचवा एकदिवसीय सामना, २७ ऑक्टोबर (गद्दाफी स्टेडियम, लाहोर)
  • श्रीलंका विरुद्ध इंग्लंड – ६ वा एकदिवसीय सामना,२२ ऑक्टोबर (गद्दाफी स्टेडियम, लाहोर)
  • अंतिम सामना – ३१ ऑक्टोबर (गद्दाफी स्टेडियम, लाहोर)

श्रीलंका रावलपिंडी -लाहोर येथे खेळणार कसोटी सामने

एकदिवसीय ट्राय सीरीज संपल्यानंतर, श्रीलंका पाकिस्तानतर्फे आयोजित दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळेल. त्याआधी इस्लामाबादमध्ये तीन दिवसीय सराव सामन्याद्वारे मालिकेची तयारी करण्याची संधीही दिली जाईल. या कसोटी मालिकेतील पहिला सामना ९ ते १३ नोव्हेंबर दरम्यान रावलपिंडी क्रिकेट स्टेडियमवर, तर दुसरा सामना १७ ते २१ नोव्हेंबर दरम्यान लाहोरमधील गद्दाफी स्टेडियमवर खेळला जाईल.

वाशिम जिल्हा टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धा उत्साहात; ‘जे. डी.’ त रंगल्या चुरशीच्या लढती

Web Title: Pakistan tri series pakistan sri lanka england schedule 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2026 | 02:35 PM

Topics:  

  • England cricket
  • Pakistan Cricket team
  • Sri Lanka cricket
  • Tri Series

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.