Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PAK vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी पाकिस्तान संघ घोषित! बाबर आझमसह ‘या’ स्टार खेळाडूचे पुनरागमन 

टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धा सुरू होणार असून या स्पर्धेपूर्वी पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी पाकिस्तानने संघ जाहीर केला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jan 23, 2026 | 05:59 PM
PAK vs AUS: Pakistan squad announced for the T20 series against Australia! Babar Azam and this star player make a comeback.

PAK vs AUS: Pakistan squad announced for the T20 series against Australia! Babar Azam and this star player make a comeback.

Follow Us
Close
Follow Us:

Pakistan squad announced for the T20 series against Australia : ७ फेब्रुवारीपासून टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धा सुरू होणार आहे. या स्पर्धेला काही दिवस शिल्लक असताना पाकिस्तान संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी पाकिस्तानने संघ जाहीर केला आहे. ऑस्ट्रेलिया टी-२० विश्वचषकापूर्वी पाकिस्तान दौरा करणार आहे. पाकिस्तानकडून जाहीर करण्यात आलेल्या संघात बाबर आझम आणि शाहीन शाह आफ्रिदी यांना संधी देण्यात आली आहे.

टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारा बाबर आझमला टी-२० विश्वचषकापूर्वी पाकिस्तानच्या टी-२० संघात स्थान देण्यात आले आहे.तर जखमी शाहीन शाह आफ्रिदीचाही १६ सदस्यीय संघात समावेश केला गेला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला श्रीलंकेविरुद्ध खेळलेल्या संघात कोणते देखील बदल करण्यात आलेले नाहीत. या मालिकेसाठी हरिस रौफकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.  यामुळे टी-२० विश्वचषकासाठी हरिस रौफ संघाचा भाग राहणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा : विराट कोहलीच्या मनाविरुद्ध कसोटी निवृत्तीचा निर्णय? ‘या’ दिग्गज खेळाडूच्या विधानाने क्रिकेट जगतात वादळ

बिग बॅश लीग दरम्यान आफ्रिदीला दुखापत

ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीग दरम्यान क्षेत्ररक्षण करताना वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीला गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे तो स्पर्धा सोडून लाहोरमधील हाय परफॉर्मन्स सेंटरमध्ये उपचारासाठी मायदेशी परतला होता. त्यानंतर, श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी त्याला संघात स्थान देण्यात आले नाही.

ऑस्ट्रेलियाचा संघ २८ जानेवारी रोजी पाकिस्तानमध्ये दाखळ होणार आहे.  एप्रिल २०२२ मध्ये झालेल्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यानंतर, ऑस्ट्रेलियन संघ पाकिस्तानच्या भूमीवर या फॉरमॅटमध्ये दुसरी मालिका खेळणार आहे. तीन सामन्यांची टी-२० मालिका २९ आणि ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारी रोजी खेळवली जाणार आहे. सर्व सामने लाहोरमधील गद्दाफी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहेत.

विश्वचषकासाठी संघ जाहीर करण्याची प्रतिक्षाच

पाकिस्तानच्या निवडकर्त्यांकडून अद्याप विश्वचषकासाठी त्यांचा अंतिम संघ जाहीर करण्यात आलेला नाही. दरम्यान, अफवा वाढत आहेत की पाकिस्तान क्रिकेट बोर्ड बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या समर्थनार्थ स्पर्धेतून माघार घेण्याची शक्यता आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने सुरक्षेच्या कारणास्तव आपला संघ भारतात पाठवण्यास अधिकृतपणे नकार दिला आहे.

हेही वाचा : T20 World Cup 2026 : बांगलादेशी खेळाडूंची भारतात खेळण्याची होती इच्छा! सरकारच्या निर्णयामुळे नाराजीचा सुर

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या T20I मालिकेसाठी पाकिस्तानचा संघ खालीलप्रमाणे

सलमान अली आगा (कर्णधार), अबरार अहमद, बाबर आझम, फहीम अश्रफ, फखर जमान, ख्वाजा मोहम्मद नाफे (यष्टीरक्षक), मोहम्मद नवाज, मोहम्मद सलमान मिर्झा, सीम शाह, मोहम्मद वसीम ज्युनियर, नसाहिबजादा फरहान (यष्टीरक्षक), सैम अयुब, शाहीन शाह आफ्रिदी, शादाब खान (उमराव खान), उम्मेद खान (विकेटकीपर).

Web Title: Pakistans squad for the t20 series against australia announced babar gets a chance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 23, 2026 | 05:59 PM

Topics:  

  • Babar Azam
  • Salman Ali Agha
  • T20 cricket

संबंधित बातम्या

 PCB ची जाहिरात फसली! भारतीय क्रिकेटपटूंना डीवचण्याचा प्रयत्न अंगलट; चाहत्यांनी उडवली खिल्ली; पहा VIDEO
1

 PCB ची जाहिरात फसली! भारतीय क्रिकेटपटूंना डीवचण्याचा प्रयत्न अंगलट; चाहत्यांनी उडवली खिल्ली; पहा VIDEO

T20 World Cup 2026 : ‘मला एक विचित्र भावना…’ टी-२० विश्वचषकातून बाहेर पडण्यावर माजी कर्णधार रोहित शर्मा स्पष्टच बोलला 
2

T20 World Cup 2026 : ‘मला एक विचित्र भावना…’ टी-२० विश्वचषकातून बाहेर पडण्यावर माजी कर्णधार रोहित शर्मा स्पष्टच बोलला 

IND vs NZ 1st T20I : अभिषेक शर्माचा आणखी एक पराक्रम! आंद्रे रसेलला धोबी पछाड देत नोंदवला ‘हा’ विक्रम 
3

IND vs NZ 1st T20I : अभिषेक शर्माचा आणखी एक पराक्रम! आंद्रे रसेलला धोबी पछाड देत नोंदवला ‘हा’ विक्रम 

Big Bash League : बाबर आझमची बिग बॅश लीगमधून अंतिम सामन्यापूर्वीच हकालपट्टी? कारण जाणून तुम्हीही व्हाल हैरान
4

Big Bash League : बाबर आझमची बिग बॅश लीगमधून अंतिम सामन्यापूर्वीच हकालपट्टी? कारण जाणून तुम्हीही व्हाल हैरान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.