बांगलादेशी खेळाडूंची भारतात खेळण्याची होती इच्छा(फोटो-सोशल मीडिया)
The Bangladeshi players wanted to play in India : टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेतून बांगलादेशने अधिकृत माघार घेतली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव, बांगलादेश सरकारकडून गुरुवारी विश्वचषक सामन्यांसाठी आपला संघ भारतात न पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.आता आयसीसी कधीही त्यांच्या अधिकृत प्रेस रिलीजमध्ये स्कॉटलंडला बांगलादेशच्या जागी सहभागी देश म्हणून घोषित करू शकते. दरम्यान, बांगलादेशी खेळाडूंना भारतात टी-२० विश्वचषकामध्ये खेळायचे होते, आता बांग्लादेशी क्रिकेटपटू त्यांच्या सरकारच्या निर्णयावर निराश असल्याचे समोर आले आहे.
बांगलादेशी क्रिकेटपटूंच्या मते, सरकारकडून विश्वचषकात न खेळण्याचा निर्णय घेण्यापूर्वी त्यांच्याशी सल्लामसलत करण्यात आली नाही. सरकारच्या निर्णयामुळे बांगलादेशी खेळाडूंमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाला आहे. एका वृत्तानुसार, खेळाडूंचा असंतोष निर्णय घेण्याच्या पद्धतीमुळेच अधिक असल्याचे बोलले जात आहे. वरून आलेल्या आदेशाच्या संस्कृतीने संवादाची जागा घेतली होती. खेळाडूंनाए असे वाटले की ते चर्चेचा भाग नाहीत, तर पूर्वनिर्धारित स्क्रिप्टचे श्रोते आहेत. वास्तविक पाहता, विश्वचषकातून माघार घेण्याचा निर्णय घेण्यापूर्वी, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने खेळाडूंची बैठक बोलावली.
एका क्रिकेटपटूने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, “ही बैठक आमची संमती घेण्यासाठी बोलावण्यात आली नव्हती. आम्हाला फक्त काय होणार आहे याची माहिती देण्यासाठी बोलावण्यात आले होते. निर्णय आधीच घेण्यात आले होते आणि आमच्या टिप्पण्यांचा त्यावर काहीही परिणाम होत नव्हता. पूर्वी, खेळाडूंशी उघडपणे सल्लामसलत केली जात होती, परंतु यावेळी स्पष्टपणे सांगण्यात आले होते की भारतात विश्वचषक खेळण्याचा प्रश्न देखील उद्भवत नाही.”
क्रिकेटपटूचे म्हणणे आहे की, बांगलादेश सरकारने या प्रकरणात थेट हस्तक्षेप केला असून सरकारचा आवाहन आधीच आले होते. संघ प्रवास करू नये असा थेट आदेश आला होता. हा विषय आता क्रिकेटच्या तर्काच्या पलीकडे जाऊन सुरक्षा आणि राज्य धोरणाच्या क्षेत्रात जून पोहचला आहे. वृत्तांनुसार, बैठकीदरम्यान कर्णधार लिटन दास आणि कसोटी कर्णधार नझमुल हुसेन शांतो यांनी सांगितले की, संघ स्पर्धेत खेळण्यास तयार आणि उत्सुक आहे. “कारण आम्ही अलिकडच्या काही महिन्यांत एक मजबूत टी-२० युनिट बनण्यासाठी कठोर मेहनत केली आहे आणि सकारात्मक परिणाम देखील दिले आहेत,” तो म्हणाला. आणखी एका क्रिकेटपटूने म्हटले की, “जर आपण गेलो नाही तर आपल्या क्रिकेटचे नुकसान होईल. आपण खूप मेहनत घेतली, पण कोणालाही काळजी नाही.”
बैठकीनंतर, क्रीडा सल्लागार आसिफ नजरुल यांनी माध्यमांसोबत संवाद साधला आहे, बांगलादेश आपल्या निर्णयावर ठाम राहणार. त्यांनी आयसीसीवर “योग्य न्याय” न दिल्याचा आरोप देखील केला आणि सांगितले की आयसीसी किंवा भारत सरकारकडून बांगलादेशच्या सुरक्षेच्या चिंता दूर करण्यासाठी ठोस पावले उचलण्यात आले नाहीत. सरकार आणि बीसीबी अधिकाऱ्यांनी मागील धोके आणि प्रेक्षक आणि पत्रकारांच्या सुरक्षिततेसारख्या समस्यांचा उल्लेख केला. तसेच संपूर्ण कार्यक्रम धोकादायक असल्याचे म्हटले.






