Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maitri Chashak Kabaddi: वाईत रंगला ‘मैत्री चषक’; पाचगणीच्या व्यायाम मंडळाने पटकावला तृतीय क्रमांक, दिग्गज खेळाडूंचा भव्य सत्कार

वाई येथील मोरगिरीत झालेल्या 'मैत्री चषक' जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत पाचगणीच्या स्थानिक व्यायाम मंडळाने तृतीय क्रमांक पटकावला आहे. ४० वर्षांवरील माजी खेळाडूंच्या या यशाबद्दल पाचगणीत त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 10, 2026 | 05:16 PM
Maitri Chashak Kabaddi: वाईत रंगला ‘मैत्री चषक’; पाचगणीच्या व्यायाम मंडळाने पटकावला तृतीय क्रमांक, दिग्गज खेळाडूंचा भव्य सत्कार
Follow Us
Follow Us:

 

  •  वाईत रंगला ‘मैत्री चषक’
  • पाचगणीच्या व्यायाम मंडळाने पटकावला तृतीय क्रमांक
  • दिग्गज खेळाडूंचा भव्य सत्कार
वाई : सातारा जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली शिवशक्ती क्रीडा मंडळ आणि अंबिका स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच ‘मैत्री चषक’ या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मोरगिरी येथील मोरणा विद्यालयाच्या मैदानावर रंगलेल्या या स्पर्धेत ४० वर्षे व त्यापुढील वयाच्या जिल्ह्यातील अनेक माजी आणि दिग्गज खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. या चुरशीच्या स्पर्धेत पाचगणीच्या स्थानिक व्यायाम मंडळाच्या संघाने आपल्या बहारदार आणि अनुभवाच्या जोरावर अटीतटीच्या लढतीत तृतीय क्रमांक पटकावून पाचगणीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

या स्पर्धेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे जिल्ह्यातील जुन्या जाणत्या कबड्डी पटूंना पुन्हा एकदा मैदानावर उतरून आपला दम दाखवण्याची संधी मिळाली, ज्यामुळे प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. वाढत्या वयातही खेळाडूंचा शारीरिक आणि मानसिक फिटनेस पाहून उपस्थित तरुण वर्ग कमालीचा प्रोत्साहित झाला. वय पडताळणीसाठी अधिकृत ओळखपत्रांची कडक अंमलबजावणी करत अत्यंत पारदर्शक वातावरणात हे सामने पार पडले.

IND Vs AFG: शनिवार ठरलाय! भारत -अफगाणिस्तान थरार रंगणार, पहिला सामना कधी अन् कुठे होणार?

या स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या पाचगणीच्या व्यायाम मंडळाच्या संघात संतोष गोळे, संदेश कासुर्डे, रवी गोळे, राजू काकडे, दीपक पारठे, शशिकांत भिलारे, राजू दुधाने, अमोल कळंबे, जाधव आणि संजय राजपुरे या कसलेल्या खेळाडूंचा समावेश होता. या सर्वच खेळाडूंनी मैदानावर चढाई आणि पकडीचा उत्कृष्ट नमुना पेश केला. उपांत्य फेरीत केवळ एका गुणाच्या निसटत्या फरकाने संघाला पराभवाचा सामना करावा लागला, मात्र त्यांच्या या झुंजार खेळाचे संपूर्ण मैदानात कौतुक झाले. या यशस्वितेबद्दल संघाला कायम चषक आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

या संघाने मंडळाचे संचालक अंकुश आबा मालुसरे यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेत सहभाग घेतला होता. या यशाबद्दल आज पाचगणी येथे मंडळाचे संचालक नानासाहेब कासुर्डे, राजूशेठ राजपुरे, राजू आबा भिलारे, शेखर दादा कासुर्डे, रावसाहेब भिलारे, प्रविणशेठ भिलारे, यशवंत पारठे आणि शरद कासुर्डे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपूर्ण संघाचा भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी छत्रपती शिबाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आपला आंनदोत्सव साजरा करण्यात आला. खेळाडूंच्या या दैदिप्यमान कामगिरीमुळे आणि त्यांनी दाखवलेल्या क्रीडा कौशल्यामुळे संपूर्ण तालुक्यातून आणि क्रीडा वर्तुळातून या खेळाडूंचे आणि मार्गदर्शकांचे जोरदार अभिनंदन होत आहे.

ICC Women’s T20 World Cup च्या सामन्यांची वेळ बदलली? ‘हे’ वाचाच; नाहीतर हुकणार भारताचे सामने

Web Title: Panchgani vyayam mandal wins third prize in satara district level maitri chashak kabaddi tournament

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2026 | 05:15 PM

Topics:  

  • Kabbadi
  • Satara News
  • Sports News
  • Wai

संबंधित बातम्या

Satara News : ‘वाघ्या घेवड्याचा पीकविम्यात समावेश करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविणार,’ जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आश्वासन
1

Satara News : ‘वाघ्या घेवड्याचा पीकविम्यात समावेश करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविणार,’ जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आश्वासन

विलक्षण, अद्भुत! कुणाल गुप्ताचे झंझावाती शतक अन्…; ‘स्पार्टन मान्सुन लीग‌’मध्ये ‘या’ संघाचा दणदणीत विजय
2

विलक्षण, अद्भुत! कुणाल गुप्ताचे झंझावाती शतक अन्…; ‘स्पार्टन मान्सुन लीग‌’मध्ये ‘या’ संघाचा दणदणीत विजय

Washim News: धावपट्टी, थाळीफेक स्पर्धेत म्हसणीच्या विद्यार्थ्यांची बाजी; तालुकास्तरीय विविध स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांक
3

Washim News: धावपट्टी, थाळीफेक स्पर्धेत म्हसणीच्या विद्यार्थ्यांची बाजी; तालुकास्तरीय विविध स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांक

पुण्यात Cricket चा महाथरार! महिला क्रिकेटपटूंसाठी पर्वणी! रंगणार ‘हिंदवी वॉरियर्स करंडक’ ODI सिरिज
4

पुण्यात Cricket चा महाथरार! महिला क्रिकेटपटूंसाठी पर्वणी! रंगणार ‘हिंदवी वॉरियर्स करंडक’ ODI सिरिज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.