फोटो सौजन्य - हॉकी इंडिया
भारतीय हॉकी संघ : भारताच्या हॉकी संघाने ब्रॉन्झ मेडल मॅचमध्ये स्पेनचा पराभव करून कांस्य पदकावर कब्जा केला आहे. भारताच्या हॉकी संघाने स्पेनला २-१ ने पराभूत करून कांस्य पदक मिळवले. टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये भारतीय हॉकी संघाने कांस्यपदक जिंकले. यानंतर पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये हॉकी संघ सलग दुसऱ्यांदा कांस्यपदक जिंकण्यात यशस्वी ठरला. या मोठ्या विजयानंतर भारताचा हॉकी संघ मायदेशी परतला आहे. आता संपूर्ण देश हा आनंद साजरा करत आहे. हा घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दिल्ली विमानतळावर त्यांचे भव्य स्वागत झाले. ढोलाच्या तालावर वादक नाचत होते. सर्वांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. भारताच्या हॉकी संघाचे खेळाडू विमानतळावर ढोल ताशांच्या गजरात नाचताना दिसले आणि मजा करताना दिसले.
Our Heroes are back!
Current mood: 🥳🎊🕺🏻🥁#BronzeMedalists #BackHome #HockeyIndia pic.twitter.com/MA78WcZS7q
— Hockey India (@TheHockeyIndia) August 10, 2024
विमानतळावर पोहोचल्यावर संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग म्हणाला की, “एक पदक हे पदक असते, देशासाठी ते जिंकणे हे मोठे काम असते. आम्ही सुवर्णाचे स्वप्न पाहत होतो, पण हे स्वप्न पूर्ण झाले नाही. पण, आम्ही रिकाम्या हाताने आलो नाही. २०२० मध्ये पदक जिंकले आणि आता २०२४ मध्ये पदक जिंकले हा एक स्वतःचाच रेकॉर्ड आहे.”
संघाचा गोलरक्षक पीआर श्रीजेशचा हा शेवटचा सामना होता. हा त्याच्यासाठी भावनिक क्षण होता. विशेष म्हणजे ऑलिम्पिकच्या समारोप समारंभात श्रीजेशच भारताचा ध्वजवाहक म्हणून निवड करण्यात आली आहे. त्याच्यासोबत दोन कांस्यपदक जिंकणारी नेमबाज मनू भाकर असेल. हरमनप्रीत म्हणाला की, “आम्हाला मिळत असलेल्या प्रेमामुळे आमची जबाबदारी वाढते. आम्ही देशासाठी पुन्हा पदक आणण्याचा प्रयत्न करू.”
आतापर्यत भारताच्या हॉकी संघाने १३ ऑलिम्पिक पदक नावावर केले आहेत.