फोटो सौजन्य - हॉकी इंडिया
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ : भारतीय खेळाडूंचा पॅरिस ऑलिम्पिकचा (Paris Olympics 2024) आठवा दिवस निराशाजनक राहिला. यामध्ये भारताचे अनेक खेळाडू मेडलपासून १-१ विजय दूर असताना पराभूत झाले आहेत. आज पुन्हा नव्या दिवसभरामध्ये भारतचे अनेक खेळाडू ॲक्शनमध्ये असणार आहेत. यामध्ये आज भारताचा पुरुष हॉकी संघ नॉकआऊट मॅचमध्ये ग्रेट ब्रिटनचा सामना करणार आहे, तर भारताचा एतेहासिक पुरुष बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन आज व्हिक्टर एक्सेलसेन याचा सामना करणार आहे. त्याचबरोबर भारताची टोकियो ऑलिम्पिक पदक विजेती लोव्हलिना बोरगोहेन ही तिचा आज चीनच्या बॉक्सर विरुद्ध क्वार्टर फायनलच्या सामना खेळणार आहे. आजच्या दिवसभरामध्ये कोणते ॲथलेटिक्स कोणत्या वेळी ॲक्शनमध्ये असणार आहेत याकडे नजर टाकणार आहोत, यासंदर्भात सविस्तर वेळापत्रक देण्यात आले आहे.
खेळ | वेळ | खेळाडू |
मेन्स रॅपिड फायर पिस्तूल | 12:30 | अनिश भानवाला |
विजयवीर सिंधू | ||
गोल्फ इंडिविज्युअल स्ट्रोक प्ले राऊंड ४ | 12:30 | शुभंकर शर्मा |
गगनजीत भुललार | ||
शूटिंग वुमेन्स स्कीट | 13:00 | महेश्वरी चौहान |
रायझा धिल्लान | ||
हॉकी क्वार्टर फायनल | 13:30 | भारत विरुद्ध ग्रेट ब्रिटन |
ॲथलेटिक्स महिला ३००० मीटर धावणे | 13:35 | पारुल चौधरी |
बॅडमिंटन पुरुष वैयक्तिक सेमीफायनल | 15:30 | लक्ष्य सेन विरुद्ध व्हिक्टर एक्सेलसेन |
पुरुष लांब उडी क्वालिफिकेशन | 14:30 | जेस्विन आल्ड्रिन |
बॉक्सिंग | 15:02 | लोव्हलिना बोरगोहेन |
सेलिंग मेन्स डिंगी | 15:35 | विष्णु सर्वानन |
शूटिंग २५ मीटर पिस्तूल | 16:30 | अनिश भानवाला |
विजयवीर सिंधू | ||
सेलिंग वुमेन्स डिंगी | 18:05 | नेत्रा कुमनन |
शूटिंग वुमेन्स स्कीट फायनल | 19:00 | जिंकलेले नेमबाज |
आजच्या या स्पर्धेमध्ये दोन पदक पक्के होण्याची शक्यता आहे. यामध्ये भारताची बॉक्सर लोव्हलिना बोरगोहेन आजच्या विजयानंतर मेडल पक्के करणार आहे. त्याचबरोबर आजच्या सामन्यामध्ये लक्ष्य सेनने व्हिक्टर एक्सेलसेन पराभूत केल्यास आजचा मेडल पक्के होणार आहे. आजच्या हा महत्वाच्या सामान्यांवर भारतीयांच्या नजरा असणार आहेत. त्याचबरोबर भारताच्या हॉकी संघाला आजचा सामना जिंकणे महत्वाचे आहे. त्यामुळे आज भारताचे खेळाडू कशी कामगिरी करतात यावर भारतीय प्रेक्षकांची नजर असणार आहे.