फोटो सौजन्य - इंस्टाग्राम
Paris Olympics 2024 : भारताचे एकूण २१ नेमबाजांची तुकडी भारताने यंदा पाठवली आहे. आज ऑलिम्पिकचा (Paris Olympics 2024) खऱ्या अर्थाने पहिला दिवस आहे. भारताचे नेमबाज (Indian Shooter In Paris Olympics) आज ॲक्शनमध्ये दिसणार आहेत. भारताचा मिक्स टीम क्वालिफिकेशनमध्ये (Mix Team Qualification) आज नेमबाज भाग घेणार आहेत. यामध्ये एलवेनिल वलरिवन संदीप सिंह यांची जोडी असणार आहे, तर दुसरी जोडी अर्जुन बबूता आणि रमिता जिंदल यांची दुसरी जोडी या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहे. या दोन्ही जोड्या १२.३० वाजता जिओ सिनेमावर लाईव्ह खेळताना दिसणार आहेत. यामध्ये पात्र झालेले नेमबाज २.०० फायनलची फेरी खेळणार आहेत.
त्यानंतर टीम इंडियाचे अर्जुन चिमा आणि सरबजोत सिंह हे १० मीटर एयर पिस्टल मेन्स क्वालिफिकेशन सुरु होणार आहे. अर्जुन चिमा आणि सरबजोत सिंह ॲक्शनमध्ये दुपारी २.०० वाजता जिओ सिनेमावर दिसणार आहेत. त्यानंतर १० मीटर एयर पिस्टल वूमेन्स क्वालिफिकेशन संध्याकाळी ५.०० सुरु होणार आहेत. यामध्ये भारताच्या दोन महिलांचा सहभाग आहे. मनु भाकर आणि रिदम सांगवान या दोन सहभागी होणार आहेत.
भारताचा बॅडमिंटपटू लक्ष्य सेन आणि जागतिक क्रमवारीमध्ये तिसऱ्या स्थानावर असणारी भारताची दुहेरी जोडी सुद्धा आज पहिला सामना खेळणार आहे. त्याचबरोबर भारतीय टेनिसपटू रोहन बोपण्णा आणि श्री बालाजी हे आज त्यांचा पहिला सामना खेळतील टेनिसचा सामना ३.३० पर्यत होण्याची शक्यता आहे. हरमनप्रीत सिंहच्या नेतृत्वाखाली भारताचा संघ आज पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पहिला सामना न्यूझीलंडविरुद्ध रंगणार आहे. त्याचबरोबर भारतीय महिला बॉक्सर प्रीती पवार आज आज रात्री १२.३० वाजता रिंगमध्ये दिसणार आहे. महिला दुहेरी जोडी पोणप्पा आणि क्रिस्टी या दोघी त्यांचा सामना आज रात्री ११.५० मिनिटाने खेळताना दिसणार आहेत.