फोटो सौजन्य - सोशल मीडिया
पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ : भारताने मेडल मिळवण्याचे सूत्र सुरूच आहे, भारताचे पॅरा खेळाडू सध्या पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये दमदार कामगिरी करत भारताच्या खात्यात मेडल जमा करण्याचं काम करत आहे. भारताने आतापर्यत २५ अधिक पदकांची कमाई केली आहे. यामध्ये भारताने पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ च्या नवव्या दिवशी दमदार कामगिरी करत सुवर्ण आणि कांस्यपदक नावावर केले आहे. यामध्ये प्रवीण कुमारने भारताला उंच उडी मारून सुवर्ण पदकावर नाव कोरल, त्याचबरोबर होकाटो सेमा यांनी गोळाफेकमध्ये दिवसाचे दमदार दुसरे मेडल दिले. पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ च्या नवव्या दिनी भारताने कशी कामगिरी केली यावर नजर टाका.
भारताची स्टार धावपटू सिमरन शर्मा हिने दमदार कामगिरी करत क्वालिफिकेशन फेरीमध्ये आणि सेमी फायनल फेरीमध्ये दमदार कामगिरी करत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. यामध्ये तिने २५.०३ एवढं अंतरात तिने सेमी फायनलची रेस पार केली.
भारताचा स्टार उंच उडीपटू प्रवीण कुमारने दमदार कामगिरी करत सुवर्ण पदकावर नाव कोरल आहे. त्याने २.०८ मीटर अंतर पार करून त्याने गोल्ड मेडलवर कब्जा केला आहे. त्याच्या दमदार कामगिरीने अनेक दिग्गज खेळाडूंना मागे टाकून भारताचा तिरंगा फडकवला आहे. हे त्याचे दुसरे मेडल आहे, त्याने टोकियो पॅरालिम्पिक २०२० मध्ये सिल्वर मेडल मिळवले होते.
भारताचा गोळाफेकपटू होकाटो सेमा यांनी दमदार कामगिरी करत कांस्यपदक मिळवले आहे. 14.65m चे अंतर पार करून भारताला २७ वे मेडल मिळवून दिले आहे.