पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ : भारताच्या खेळाडूंनी सातव्या दिवशी अद्भुत कामगिरी करून २० चा आकडा पार केला आणि टोकियो पॅरालिम्पिक २०२० रेकॉर्ड मोडला. भारताने टोकियोमध्ये १९ मेडल नावावर केले होते. यामध्ये त्यांनी पाच सुवर्ण, आठ सिल्वर आणि ६ कांस्यपदकांचा समावेश होता. आता पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ च्या सातव्या दिवशी भारताने २४ मेडलची कमाई केली आहे. यामध्ये ५ सुवर्ण, ९ सिल्वर आणि १० कांस्यपदकांचा समावेश आहे. भारताने सातव्या दिवशी चार पदकांची कमाई केली यामध्ये २ सुवर्ण आणि २ सिल्वर मेडलचा समावेश आहे. या स्पर्धेमध्ये भारताने केलेल्या कामगिरीचे काही खास क्षणांवर नजर टाका.
पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ च्या दिवशी पॅरा खेळाडूंनी केलेली कामगिरी. फोटो सौजन्य - पॅरालिम्पिक युट्युब/सोशल मीडिया
मराठमोळा गोळाफेकपटू सचिन सर्जेराव खिलारी याने पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये सिल्वर मेडल मिळवून कमालीची कामगिरी केली. सचिनने ४० वर्षानंतर गोळाफेकमध्ये मेडल भारताच्या नावावर केले. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
भारताचा स्टार पॅरा तिरंदाज हरविंदर सिंह याने अविश्वसनीय कामगिरी करून भारताला आर्चरीमधून पहिले मेडल मिळवून दिले. त्याचे हे पॅरालिम्पिकमधील दुसरे मेडल होते. फोटो सौजन्य - पॅरालिम्पिक खेळ सोशल मीडिया
मेन्स क्लब थ्रोमध्ये भारताचे तीन खेळाडू सहभागी झाले होते यामध्ये भारताच्या संघाने सुवर्ण आणि रौम्य पदकावर कब्जा केला आहे. धरमबीर यांनी सुवर्ण आणि प्रणव सुरमा याने सिल्वर मेडलवर नाव कोरलं आहे. फोटो सौजन्य - पॅरालिम्पिक युट्युब
मेन्स क्लब थ्रोमध्ये भारताच्या धरमबीर यांनी दमदार कामगिरी करत सुवर्ण पदक नावावर केले. धरमबीर यांचे पहिले चार थ्रो अमान्य करण्यात आले होते परंतु शेवटच्या दोन थ्रोमधील शानदार कामगिरीने सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केला. फोटो सौजन्य - पॅरालिम्पिक युट्युब
आर्चरीमध्ये भारताने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आणि पॅरालिम्पिक फार चांगली कामगिरी करू शकला नाही त्यामुळे सारखी निराशा तिरंदाजांच्या हाती लागत होती. परंतु आर्चरीमध्ये हरविंदर सिंह याने मेडल मिळवून तिरंदाजांचा सुवर्ण पदकाचा दुष्काळ संपवला. फोटो सौजन्य - पॅरालिम्पिक युट्युब