पंतप्रधान मोदी - पुतीन (फोटो- ट्विटर)
बिश्केक एरिना येथे सोमवारी रात्री स्थानिक वेळेनुसार सायंकाळी सुमारे ९ वाजता सहाव्या ‘वर्ल्ड नोमॅड गेम्स २०२६’ या भव्य आंतरराष्ट्रीय क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाचा शानदार उद्घाटन सोहळा पार पडला. यंदाच्या ‘वर्ल्ड नोमॅड गेम्स’मध्ये जगभरातील ११० हून अधिक देशांचे खेळाडू आणि प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. या महाकुंभामध्ये विविध देशांच्या पारंपरिक क्रीडा प्रकारांचे सादरीकरण आणि स्पर्धा रंगणार असून, मध्य आशियाई संस्कृतीचे अनोखे दर्शन या निमित्ताने जगाला पाहायला मिळत आहे.
Incredible scenes at Bishkek Arena during the opening ceremony of the 6th World Nomad Games on Kyrgyz Republic Independence Day, with SCO heads of state in attendance—including Xi Jinping, Vladimir Putin, Narendra Modi, Masoud Pezeshkian, and host President Sadyr Japarov. The… pic.twitter.com/NhJyYeM4qP — 🅰pocalypsis 🅰pocalypseos 🇷🇺 🇨🇳 🅉 (@apocalypseos) August 31, 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची या सोहळ्यातील उपस्थिती आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबतची मैत्रीपूर्ण चर्चा यामुळे भारतीय पथकाचा उत्साह अधिकच द्विगुणित झाला आहे. भारताचे हे ८७ सदस्यांचे पथक क्रीडा आणि संस्कृती दोन्ही क्षेत्रांत आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचा नावलौकिक वाढवण्यासाठी सज्ज झाले आहे.






