Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मैदान गाजवायचे सोडून थेट बाथरूममध्येच…; महिला आंघोळ करताना केला Video, ‘या’ देशाचे खेळाडू अटकेत

पोलिसांनी या खेळाडूंचे मोबाईल जप्त केले असून बाकीचे पुरावे जमा केले आहेत. तपास पूर्ण होईपर्यंत खेळाडूना देशाबाहेर जाण्यास किंवा पुराव्यांशी छेडछाड करण्यास मनाई केली गेली आहे. 

  • By तेजस भागवत
Updated On: May 01, 2026 | 03:49 PM
मैदान गाजवायचे सोडून थेट बाथरूममध्येच…; महिला आंघोळ करताना केला Video, ‘या’ देशाचे खेळाडू अटकेत
Follow Us
Follow Us:

श्रीलंका पोलिसांची क्रिकेटपटूंवर अटकेची कारवाई 
महिलांचे स्नान करताना व्हिडिओ केल्याचा आरोप 
क्रिकेट बोर्डकडून मोठी कारवाई केली जाण्याचा अंदाज 

SRI Lanka Cricket Board: सध्या भारतात आयपीएलचा महासंग्राम सुरू आहे. त्यामध्ये काही श्रीलंकेचे खेळाडू देखील खेळत आहेत. भारतात आयपीएलचा उत्साह सुरू असतानाच श्रीलंकामधून एक अत्यंत विचित्र आणि घाणेरडे वृत्त समोर आले आहे. हे वृत्त श्रीलंका क्रिकेट बोर्डशी सबंधित आहे. नेमके हे प्रकरण काय आहे ते जाणून घेऊयात.

महिलांचे गुपचूप व्हिडिओ चित्रीकरण केल्याप्रकरणी श्रीलंकेच्या अंडर-19 संघातील दोन खेळाडूंना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण क्रिकेट विश्वात संताप व्यक्त केला जात आहे. समोर आलेल्या माहितीनुसार ही घटना कोलंबो येथील नराहेनपीटा येथे घडली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, दोन क्रिकेटपटू एका मोठ्या आणि प्रसिद्ध हॉटेलमध्ये थांबले होते. याच ठिकाणी महिलांच्या बाथरूममध्ये लपून, त्या आंघोळ करत असतानाचे व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केल्याचा आरोप आहे. महिलांनी अशी तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल होताच पोलिसांनी त्या खेळाडूंवर अटकेची कारवाई केली आहे.

BCCI चा मोठा निर्णय! Ajit Agarkar युग कायम ? BCCIकडून कार्यकाळ वाढवण्याची शक्यता; 2027 वर्ल्ड कपपर्यंत मोठी जबाबदारी

पोलिसांनी वेगाने हालचाली करत दोन्ही क्रिकेटपटूंना ताब्यात घेतले. त्यांच्या मोबाईलची तपासणी केली असता, त्यामध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ सापडल्याचे म्हटले जात आहे. या खेळाडूंवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने याची गंभीर दाखल घेतली आहे. संबंधित खेळाडूंवर मोठी कारवाई केली जाणार असल्याचे समोर येत आहे. प्राथमिक तपास होईपर्यंत त्यांच्यावर क्रिकेट खेळण्याची बंदी घातली जाऊ शकते. या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून, दोषी आढळल्यास या खेळाडूंचे करिअर कायमचे संपुष्टात येऊ शकते.

पोलिसांनी अटक केल्यावर या खेळाडूना तेथील कोर्टात हजर केले गेले. न्यायालयाने दोन्ही खेळाडूंना वैयक्तिक जामिनावर मुक्त करण्याचे आदेश दिले. यासाठी प्रत्येक खेळाडूला ५ लाख श्रीलंकाई रुपये (सुमारे १,५६४ अमेरिकन डॉलर्स) जामीन रक्कम म्हणून जमा करावी लागली आहे. या प्रकरणाची गंभीर दाखल तेथील कोर्टाने देखील घेतली आहे.

IPL 2026: ‘हा’ कारनामा करणारा भुवनेश्वर कुमार हा पहिला भारतीय बॉलर, मिळवले मोठे यश

या प्रकरणात आता 25 मे रोजी पुढील सुनावणी होणार आहे. पोलिसांनी या खेळाडूंचे मोबाईल जप्त केले असून बाकीचे पुरावे जमा केले आहेत. तपास पूर्ण होईपर्यंत खेळाडूना देशाबाहेर जाण्यास किंवा पुराव्यांशी छेडछाड करण्यास मनाई केली गेली आहे.

Web Title: Police arrested sri lanka under 19 cricketers shoot women bath video crime marathi sports news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2026 | 03:31 PM

Topics:  

  • cricket news
  • crime news
  • Sri Lanka

संबंधित बातम्या

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…
1

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक
2

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड
3

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड

Crime News: शेटफळमध्ये एका वादातून गाव पेटलं; जवानावर सत्तूरने वार, 100 जणांचा जमाव रस्त्यावर
4

Crime News: शेटफळमध्ये एका वादातून गाव पेटलं; जवानावर सत्तूरने वार, 100 जणांचा जमाव रस्त्यावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.