फोटो सौजन्य - ProKabaddi सोशल मीडिया
पाटणा पायरेट्स विरुद्ध हरियाणा स्टिलर्स : काल दोन सेमीफायनलचे सामने रंगले होते यामध्ये आता प्रो कबड्डीच्या अकराव्या सीझनचे दोन फायनलमध्ये खेळणारे संघ ठरले आहेत. यामध्ये आता प्रो कबड्डी सिझन ११ च्या फायनलमध्ये पाटणा पायरेट्स आणि हरियाणा स्टिलर्स हे २९ डिसेंबर रोजी एकमेकांशी भिडणार आहेत. काल हरियाणा स्टीलर्स विरुद्ध युपी योद्धा यांच्यामध्ये उपांत्य फेरीचा सामना रंगला होता. तर दुसरा सामना दबंग दिल्ली विरुद्ध पाटणा पायरेट्स यांच्यामध्ये झाला. यामध्ये युपी योद्धाला हरियाणा स्टीलर्सने २८-२५ असे पराभूत केले तर हरियाणा स्टिलर्सने दबंग दिल्लीला ३२-२८ असे पराभूत करून अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आहे.
We have our 𝐅𝐈𝐍𝐀𝐋𝐈𝐒𝐓𝐒 🤩
It’s 𝐒𝐭𝐞𝐞𝐥𝐞𝐫𝐬 ⚔️ 𝐏𝐢𝐫𝐚𝐭𝐞𝐬 in the GRAND FINALE of #PKL11 🔥#ProKabaddi #PKL11 #LetsKabaddi #ProKabaddiOnStar #PKLPlayoffs pic.twitter.com/bt3O5Qg6Cz
— ProKabaddi (@ProKabaddi) December 27, 2024
बचावाच्या आघाडीवर रंग भरलेल्या प्रो कबड्डीच्या अकराव्या पर्वातील दुसऱ्या उपांत्य लढतीत शुभम शिंदे आणि अंकितच्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर पाटणा पायरेट्सने दबंग दिल्लीचे आव्हान ३२-२८ असे मोडून काढले. अंतिम फेरीत रविवारी त्यांची गाठ गतउपविजेत्या हरियाणा स्टिलर्सशी पडेल.
पूर्वार्धात हरियाणा स्टिलर्सच्या आक्रमक खेळाने सामना एकतर्फी होईल ही आशा उत्तरार्धात दिल्लीच्या बचावपटूंनी फेल ठरवली. पण, हरियानाने देखील सामन्याची लय कमी जास्त करत नियंत्रण सुटणार नाही याची काळजी घेतली होती. उत्तरार्धात योगेशने चार गुणांची कमाई करुन दिल्लीसाठी बाजू लावून धरली. पण, शुभमचे ५ आणि अंकितचे ४ गुण हरियानासाठी महत्वाचे ठरले. देवांक, अयान, आशु, नविन कुमार या चढाईपटूंना तेवढी छाप पाडता आली नाही. पूर्वार्धात हरियाणा स्टिलर्सच्या बचावफळीने दिल्लीच्या चढाईपटूंना बोनस गुणांपासून रोखले हेच त्यांच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले.
पाटणा संघ आज वेगळ्याच नियोजनाने उतरला होता. देवांक दलाल आणि अयान यांच्या होणाऱ्या चढाया त्यांच्यासाठी निर्णायक ठरत होत्या. पण, हरियानाचा बचाव आज कमालीचा ताकदवान भासला. महाराष्ट्रातील रत्नागिरीचा शुभम शिंदे आणि कर्णधार अंकित या कोपरारक्षकांनी दबंग दिल्लीच्या आशु मलिक आणि नविन कुमार या सर्वात यशस्वी चढाईपटूंची चांगलीच कोंडी केली. दिल्लीचा बतावपटू मोहितने एकाक्षणात चढाईत बोनससह दोन गुण मिळवत लोण यशस्वी टाळला. पण, त्यानंतर पुन्हा एकदा देवांकने चढाईत बाजी मारून दिल्लीला लोणच्या उंबरठ्यावर आणले. या वेळी मात्र आशुची पकड घेत पाटणा संघाने लोणची संधी साधत आघाडी १४-८ अशी भक्कम केली. त्यानंतर हाच जोश कायम राखत मध्यंतराला हरियानाने १७-१० अशी मोठी आघाडी घेत आपले वर्चस्व कायम राखले होते.
उत्तरार्धाला सुरुवात झाल्यावर पाटणाने सामना अपेक्षित संथ केला. सामन्यात आव्हान राखण्यासाठी दिल्लीलाच प्रयत्न करावे लागणार होते. पाटणा संघाने नेमके याच गोष्टीकडे लक्ष दिले आणि दिल्लीच्या चढाईपटूंना चुका तर करायलाच लावल्या आणि तिसऱ्या चढाईच्या कोंडीत अडकवून ठेवले होते. चढाईपटूंच्या अपयशाचे काहीसे दुर्लक्ष करुन त्यांनी बचावावर लक्ष देत पाटणाच्या चढाईपटूंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न जरुर केला. पण, त्यांना लगेच शुभम शिंदे आणि अंकितकडून चोख प्रत्युत्तर मिळत होते. मात्र वेळ जाऊ लागला, तसा पाटणाच्या बचावपटूंचा संयम सुटल्यासारखा दिसू लागला. अशातच नोंद नसलेल्या मोहितने अचूक चढाया करुन दिल्लीचे आव्हान राखत मध्यंतराची पिछाडी एका क्षणी १८-२२ अशी भरुन काढली. त्यामुळे सामना एकतर्फी होणार नाही हे स्पष्ट झाले.
सामन्याच्या चौथ्या सत्रात दिल्लीने लोण परतवून लावत पिछाडी २२-२३ अशी कमी करत सामन्यातील रंगत वाढवली. देवांकची आणखी एक पकड करत दिल्लीने सामना २४-२४ असा बरोबरीत आणला. या क्षणापासून सामना अखेरच्या पाचव्या मिनिटापासून बरोबरीत सुरु राहिला. पूर्वार्धात आशुला बोनस गुणापासून दूर ठेवण्यात पाटणाला यश आले होते. पण, उत्तारार्धात आशुने बोनस गुणांवरच खेळ करण्यावर भर दिला होता. सामन्याला दोन मिनिट बाकी असताना शुभमने आशुची पकड करत पाटणाकडे २८-२७ आघाडी मिळवली. एक मिनिट बाकी असताना हीच स्थिती राहिली होती. अयानने डु ऑर डाय चढाईत योगेशला टिपत आघाडी २९-२७ अशी वाढवली. त्यानंतर पुन्हा एकदा मोहितने एक गुण मिळवत आघाडी पुन्हा २९-२८ अशी कमी केली. सामना संपण्यास ५२ सेकंद असताना देवांकने वेळ काढत दिल्लीवर हडपण आणले. दिल्लीच्या नविनची पकड करत पाटणाने आघाडी ३०-२८ अशषी वाढवली आणि अखेरच्या सेकंदाला देवांकने दोन गुण मिळवत पाटणा संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.