फोटो सौजन्य - X
PSL 2025 BROADCAST IN INDIA : सध्या भारतामध्ये आयपीएल २०२५ चा उत्सव सुरु आहे, याचदरम्यान मंगळवारी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी अचानक पर्यटकांवर गोळीबार केला, ज्यामध्ये २६ जणांची निर्घृण हत्या झाली. या दहशतवादी हल्ल्याबद्दल संपूर्ण देशात संताप आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर राजकीय नेते, अभिनेते सामान्य जनतेच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. पाकिस्तानचे हे केलेले कृत्य आहे असा सर्वांचा अंदाज आहे. भारताचे गृहमंत्री अमित शाह हे देखील गेले होते. त्यामुळे सोशल मीडियावर सध्या या संदर्भात मोठ्या प्रमाणात बोलले जात आहे.
दुसरीकडे शेजारील देशांमध्ये पीएसएल म्हणजेच पाकिस्तान प्रीमियर लीग सुरु आहे. दरम्यान, या दहशतवादी हल्ल्यानंतर फॅन कोडनेही एक मोठे पाऊल उचलले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पहलगाममधील घटनेनंतर, फॅनकोड आजपासून पीएसएल २०२५ चे स्ट्रीमिंग थांबवेल असे सांगण्यात आले आहे.
सध्या पाकिस्तान सुपर लीग (PSL) २०२५ चे सामने फक्त फॅनकोडद्वारे भारतात प्रसारित केले जात आहेत. ड्रीम स्पोर्ट्सच्या डिजिटल प्लॅटफॉर्म फॅनकोडने पीएसएल २०२५ साठी भारतात विशेष स्ट्रीमिंग अधिकार मिळविण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) सोबत भागीदारी केली आहे.
🚨 NO PSL BROADCAST IN INDIA 🚨
Fancode will stop streaming PSL 2025 from today after the incident in Pahalgam. ❌ pic.twitter.com/Sjr66vaXmW
— Johns. (@CricCrazyJohns) April 24, 2025
पहलगाममधील हल्ल्याबद्दल टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा खूप दुःखी आहे. त्याने इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट करून आपली वेदना व्यक्त केली आहे. काल सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना झाला, सामन्यापूर्वी हैदराबादमध्ये झालेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात येईल. हा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे.
वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजनेही या हल्ल्याबद्दल दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले की, पहलगाममधील भयानक आणि वेदनादायक हल्ल्याबद्दल त्यांनी नुकतेच वाचले. धर्माच्या नावाखाली निष्पाप लोकांना मारणे हे मोठे पाप आहे, असे सिराज म्हणाले. कोणतेही कारण किंवा विचार अशा वाईट कृत्याचे समर्थन करू शकत नाही.
विराट कोहलीने पहलगाम हल्ल्याबाबत इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे यामध्ये त्याने लिहिले की, ‘पहलगाममधील निष्पाप लोकांवर झालेल्या या भयानक हल्ल्यामुळे मला खूप दुःख झाले आहे. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना मी संवेदना व्यक्त करतो. देव त्यांच्या कुटुंबियांना शक्ती आणि शांती देवो. या क्रूर हल्ल्यातील दोषींना शिक्षा झालीच पाहिजे.
Virat kohli Instagram story about pahalgam attack 🚨
Truly a King. pic.twitter.com/S1s1PLVFKG
— हिमांशू 🦨 (@chaotic_Him) April 23, 2025