
Pune Rain Update: धुमशान आलंया! पुण्यात पावसाचा धुमाकूळ; खडकवासला धरण साखळी क्षेत्रात..
संपूर्ण जून महिना पावसाची वाट पाहण्यात निघून गेला होता. मात्र जुलै महिना सुरू होताच पावसाने आपली बॅटिंग सुरू केल्याचे दिसून येत आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार राज्यात पुढील दोन त तीन दिवसांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. खडकवासला धरण क्षेत्रात देखील पावसाचा जोर वाढल्याचे दिसून येत आहे.
सध्या पुणे शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा केली जात आहे. मात्र गेल्या दोन तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणसाखळी क्षेत्रात पाव ते अर्ध्या टीएमसी पाण्याची आवक झाल्याचे समजते आहे. त्यामुळे पुणेकरांना किंचितसा दिलासा मिळाला आहे. खडकवासला धरण साखळी क्षेत्रात वरसगाव, टेमघर, पानशेत आणि खडकवासला अशा चार धरणांचा समावेश होतो.
Pune Rain Alert: पुण्यात मध्यम पाऊस तर घाटमाथ्यावर भयंकर संकट; बंगालच्या उपसागरात…, रेड अलर्ट जारी
हवामान विभागानुसार, वायव्य बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र अधिक सक्रिय होत असून त्याचा परिणाम राज्यासह पुणे जिल्ह्यावरही जाणवणार आहे. त्यामुळे पुणे शहरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू राहण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे, जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता असून काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार, तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने पुण्याच्या घाटमाथ्यासाठी पुढील तीन दिवस रेड अलर्ट जारी केला आहे.
रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आवाहन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, मुंबई महानगर प्रदेश, ठाणे, रायगड, पालघर आणि पुणे व नाशिक जिल्ह्यांच्या काही भागांसह राज्यभरात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यांनी सांगितले की, सरकार शुक्रवारपासून विविध सूचना जारी करत आहे. विशेषतः, या भागांमध्ये ६ जुलैपर्यंत अति मुसळधार पाऊस आणि जोरदार वादळी पावसाची शक्यता आहे.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, काही भागांमध्ये सामान्यपेक्षा लक्षणीयरीत्या जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्य सरकार दर तीन तासांनी बाधित भागांना एसएमएस अलर्ट पाठवत आहे. त्यांनी नागरिकांना या सूचना गांभीर्याने घेण्याचे आवाहन केले. अनेक ठिकाणी शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. संभाव्य अपघात टाळण्यासाठी लोकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.