Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane Rain: ठाणे जिल्ह्यात पावसाचा ‘रेड अलर्ट’! केडीएमसी आणि उल्हासनगरमधील सर्व शाळा, कॉलेजेसना सुट्टी जाहीर

हवामान खात्याने ठाणे जिल्ह्यासाठी ४ जुलै २०२६ रोजी रेड अलर्ट जारी केल्याने कल्याण-डोंबिवली (KDMC) आणि उल्हासनगरमधील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 03, 2026 | 08:53 PM
केडीएमसी आणि उल्हासनगरमधील सर्व शाळा, कॉलेजेसना सुट्टी जाहीर (Photo Credit- AI)

केडीएमसी आणि उल्हासनगरमधील सर्व शाळा, कॉलेजेसना सुट्टी जाहीर (Photo Credit- AI)

Follow Us
Follow Us:
  • ठाणे जिल्ह्यात पावसाचा ‘रेड अलर्ट’!
  • केडीएमसी आणि उल्हासनगरमधील सर्व शाळा, कॉलेजेसना सुट्टी जाहीर
  • वाचा संपूर्ण बातमी
ठाणे: राज्यात मान्सूनचा जोर प्रचंड वाढला असून मुंबईसह संपूर्ण ठाणे जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पावसाचे सत्र सुरू आहे. या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पडझड आणि पाणी साचण्याच्या घटना समोर आल्या आहेत. दरम्यान, प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांनी शनिवार, ४ जुलै २०२६ रोजी ठाणे जिल्ह्यासाठी ‘रेड अलर्ट’ (Red Alert) जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा उपाय म्हणून कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC) आणि उल्हासनगर महानगरपालिका (UMC) क्षेत्रातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालयांना शनिवार, ४ जुलै रोजी अधिकृत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

सुरक्षिततेस धोका नको; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार, ४ जुलै रोजी ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट आणि सखल भागांत मोठ्या प्रमाणावर पाणी साचण्याची शक्यता आहे. यामुळे वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत होऊन विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या सुरक्षिततेस गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. ही संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी केडीएमसी आणि उल्हासनगरच्या शिक्षण विभागाने तात्काळ सुट्टीचा निर्णय घेतला आहे.

#schoolupdeat उल्हासनगर,कल्याण, डोंबिवली शहरातील सर्व शाळांना उद्या सुटी जाहीर करण्यात आली आहे.👇#rainupdet #kdmc #ulhasnagar #aplidombuvli #kalyankar #allulhasnagar #dombivlikar pic.twitter.com/SkBiklpsK3 — yuvraj surle (@SurleYuvraj) July 3, 2026

मुंबईत पावसाचा हाहाकार! शाळा-कॉलेजेस बंद करा आणि कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ द्या; शिंदेंच्या ‘या’ बड्या नेत्याचे BMC ला आवाहन

शाळा आणि महाविद्यालय व्यवस्थापनांना कडक सूचना

दोन्ही महानगरपालिकांनी परिपत्रकाद्वारे सर्व खासगी आणि शासकीय शाळा-कॉलेज व्यवस्थापनांना कडक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. तसेच महाविद्यालय व शाळा व्यवस्थापनाने यापुढील कालावधीत परिस्थितीचा विचार करुन विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सुरक्षिततेस धोका निर्माण होणार नाही, याबाबत योग्य त्या उपाययोजना करावयाच्या आहेत.

आंबेनली घाट संपूर्ण वाहनांसाठी आज पासून चार दिवस बंद

अतिवृष्टी व पुढील चार दिवस मुसळधार पावसाने संकेत हवामान खात्याने दिल्याने घाट माथ्यावर दरडीचा सातत्य लक्षात घेता प्रवासी वर्गाच्या सुरक्षित साठी पोलादपूर सुरूर राज्य मार्गवरील आंबेनली घाटातील वाहतूक ३ जुलै २०२६ ते ७ जुलै २०२६ पर्यत सर्व वाहतुकी साठी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी प्रसिद्धी पत्रक द्वारे दिले आहेत.

पोलादपूर आंबेनळी महाबळेश्वर राज्य महामार्ग हा सह्याद्री पर्वतरांगेतील अत्यंत संवेदनशील, भूस्खलनप्रवण, दरडप्रवण व उच्च जोखीम असलेल्या घाट विभागातून जात असून, सदर मार्गाची भौगोलिक, भूगर्भीय व हवामानविषयक वैशिष्ट्ये विचारात घेतल्यास पावसाळ्याच्या कालावधीत हा मार्ग सार्वजनिक वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक ठरतो.

सदर मार्गाचा मोठा भाग तीव्र उतार, खोल दऱ्या, नैसर्गिक जलप्रवाह, हवामानामुळे विदीर्ण झालेले बेसॉल्ट खडक, अस्थिर मातीचे थर, दाट वनक्षेत्र तसेच भूस्खलनास प्रवृत्त होणाऱ्या भूभागामधून जातो. भारतीय हवामान विभागाच्या नोंदीनुसार या परिसरात दरवर्षी अतिमुसळधार पर्जन्यवृष्टी होत असून अनेक वेळा अल्प कालावधीत अत्यंत तीव्र स्वरूपाचा पाऊस नोंदविला जातो.

Pune Rain Alert: पुण्यात मध्यम पाऊस तर घाटमाथ्यावर भयंकर संकट; बंगालच्या उपसागरात…, रेड अलर्ट जारी

Web Title: Thane rain red alert schools and colleges closed in kalyan dombivli and ulhasnagar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 08:51 PM

Topics:  

  • Heavy Rain
  • KDMC
  • Red Alert for Rain
  • School Holiday
  • Thane rain updates

संबंधित बातम्या

Ambenali Ghat Closed: अखेर आंबेनली घाट संपूर्ण वाहनांसाठी आज पासून चार दिवस बंद, पर्याय मार्ग वापरण्याचे आवाहन
1

Ambenali Ghat Closed: अखेर आंबेनली घाट संपूर्ण वाहनांसाठी आज पासून चार दिवस बंद, पर्याय मार्ग वापरण्याचे आवाहन

Pune Rain Alert: पुण्यात मध्यम पाऊस तर घाटमाथ्यावर भयंकर संकट; बंगालच्या उपसागरात…, रेड अलर्ट जारी
2

Pune Rain Alert: पुण्यात मध्यम पाऊस तर घाटमाथ्यावर भयंकर संकट; बंगालच्या उपसागरात…, रेड अलर्ट जारी

Kalyan News : कल्याणमध्ये खळबळ! सामाजिक कार्यकर्त्यांकडून महिलेसोबत गैरवर्तन? खडकपाडा पोलिसांत गुन्हा; आरोप फेटाळत बदनामीचा दावा
3

Kalyan News : कल्याणमध्ये खळबळ! सामाजिक कार्यकर्त्यांकडून महिलेसोबत गैरवर्तन? खडकपाडा पोलिसांत गुन्हा; आरोप फेटाळत बदनामीचा दावा

Mumbai Rain Updates: मुंबई पावसाचा जोर कायम! तिन्ही मार्गावरील लोकल उशिराने; सखल भागांत पाणीच पाणी
4

Mumbai Rain Updates: मुंबई पावसाचा जोर कायम! तिन्ही मार्गावरील लोकल उशिराने; सखल भागांत पाणीच पाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.