Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

RR vs SRH: राजस्थानचा दमदार विजय! सलग सातव्यांदा प्लेऑफमध्ये शानदार एन्ट्री, आता SRH विरुद्ध एलिमिनेटर

Rajasthan Royals Qualified For Playoffs: राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सचा पराभव करुन प्लेऑफमध्ये आपली जागा निश्चित केली आहे. राजस्थान सलग सातव्यांदा प्लेऑफमध्ये पोहोचली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 25, 2026 | 02:37 PM
RR vs SRH: राजस्थानचा दमदार विजय! सलग सातव्यांदा प्लेऑफमध्ये शानदार एन्ट्री, आता SRH विरुद्ध एलिमिनेटर
Follow Us
Close
Follow Us:
  • राजस्थानचा दमदार विजय
  • सातव्यांदा प्लेऑफमध्ये शानदार एन्ट्री
  • SRH विरुद्ध एलिमिनेटर
राजस्थान रॉयल्सने आयपीएल २०२६ च्या प्लेऑफमध्ये आपले स्थान अखेर निश्चित केले आहे. राजस्थानने आपल्या शेवटच्या लीग स्टेजच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा ३० धावांनी पराभव केला. यामुळे ते प्लेऑफमध्ये क्वालिफाय होणारे चौथे संघ बनले. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने २० ओव्हरमध्ये ८ विकेट्स गमावून २०५ धावा केल्या. प्रत्युत्तरात, मुंबईला २० ओव्हरमध्ये नऊ विकेट्स गमावून केवळ १७५ धावाच करता आल्या. या चालू हंगामात आरसीबी, गुजरात, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान यांनी प्लेऑफसाठी पात्रता मिळवली आहे.

Kohli-Travis Head: मैदानावरील वाद सोशल मीडियावर पोहोचला; कोहली-हेड वादानंतर ट्रॅव्हिस हेडच्या कुटुंबावर अश्लील कमेंट्सचा मारा

राजस्थान रॉयल्स सलग सातव्यांदा प्लेऑफमध्ये

आयपीएलच्या इतिहासात राजस्थान रॉयल्सने सलग सातव्यांदा प्लेऑफमध्ये स्थान मिळवले आहे. सर्वाधिक वेळा प्लेऑफमध्ये पोहोचण्याचा विक्रम चेन्नई सुपर किंग्सच्या नावावर आहे, त्यांनी १२ वेळा अंतिम चारमध्ये स्थान मिळवले आहे. कर्णधार म्हणून आपल्या पहिल्याच हंगामात राजस्थानला प्लेऑफमध्ये नेणाऱ्या रियान परागसाठीही ही एक महत्त्वपूर्ण कामगिरी आहे.

राजस्थान एलिमिनेटरमध्ये हैदराबादशी भिडणार

आयपीएल २०२६ हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. प्लेऑफमधील चारही संघ निश्चित झाले आहेत. गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु पहिल्या स्थानावर आहे, तर गुजरात दुसऱ्या स्थानावर आहे. आरसीबी आणि गुजरात यांच्यात २६ मे रोजी धर्मशाळा येथे क्वालिफायर १ खेळला जाईल. राजस्थान रॉयल्स २७ मे रोजी मुल्लानपूर येथे सनरायझर्स हैदराबादविरुद्ध एलिमिनेटर सामना खेळेल. क्वालिफायर १ जिंकणारा संघ थेट अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल, तर पराभूत संघ क्वालिफायर २ मध्ये एलिमिनेटरच्या विजेत्या संघाशी सामना करेल.

राजस्थानच्या विजयामुळे पंजाब-केकेआरला पराभव

राजस्थानच्या विजयाने पंजाब किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्या प्लेऑफचे स्वप्न भंग केले आहे. राजस्थानने १४ सामन्यांमध्ये ८ विजयांसह १६ गुण मिळवले आणि प्लेऑफमध्ये पोहोचणारा चौथा संघ बनला. प्लेऑफच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडलेला मुंबई इंडियन्स नवव्या स्थानावर राहिला. पंजाबने १४ सामन्यांमध्ये ७ विजय, ६ पराभव आणि एका बरोबरीसह १५ गुण मिळवले आणि प्लेऑफमधील आपले स्थान गमावले. पंजाबने स्पर्धेची शानदार सुरुवात केली होती आणि पहिल्या सात सामन्यांमध्ये ते अपराजित होते, परंतु दुसऱ्या टप्प्यात संघाची लय बिघडली. केकेआरलाही आशा होत्या, पण राजस्थानच्या विजयाने पंजाब आणि केकेआर या दोघांच्याही आशा संपुष्टात आणल्या.

IPL 2026: ‘शाब्बास अर्जुन!’ मुलाच्या शानदार पदार्पणानंतर सचिन तेंडुलकर भावुक; पोस्ट करत म्हणाला…

Web Title: Rajasthan royals qualify for ipl 2026 playoffs beat mumbai indians rr vs srh eliminator cricket marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2026 | 02:35 PM

Topics:  

  • IPL 2026
  • Rajasthan Royals
  • Sunrisers Hyderabad

संबंधित बातम्या

RCB vs GT Head to Head: कोणाचा पगडा ठरणार भारी? Qualifier 1 चा थरार रंगणार; King की Prince कोण वरचढ
1

RCB vs GT Head to Head: कोणाचा पगडा ठरणार भारी? Qualifier 1 चा थरार रंगणार; King की Prince कोण वरचढ

Kohli-Travis Head: मैदानावरील वाद सोशल मीडियावर पोहोचला; कोहली-हेड वादानंतर ट्रॅव्हिस हेडच्या कुटुंबावर अश्लील कमेंट्सचा मारा
2

Kohli-Travis Head: मैदानावरील वाद सोशल मीडियावर पोहोचला; कोहली-हेड वादानंतर ट्रॅव्हिस हेडच्या कुटुंबावर अश्लील कमेंट्सचा मारा

Delhi Beat Kolkata: दिल्लीचा अखेरच्या सामन्यात विजय; ईडन गार्डन्सवर कोलकाताचा ४० धावांनी धुव्वा
3

Delhi Beat Kolkata: दिल्लीचा अखेरच्या सामन्यात विजय; ईडन गार्डन्सवर कोलकाताचा ४० धावांनी धुव्वा

वानखेडे स्टेडियमवरील ‘सलाम मुंबई’वरून नवा वाद; भाजप युवा मोर्चा आक्रमक, स्क्रीनवर ‘नमस्कार मुंबई’ लिहिण्याची मागणी
4

वानखेडे स्टेडियमवरील ‘सलाम मुंबई’वरून नवा वाद; भाजप युवा मोर्चा आक्रमक, स्क्रीनवर ‘नमस्कार मुंबई’ लिहिण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.