Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 31 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ravindra Jadeja: रविंद्र जडेजाचे एकदिवसीय करिअर धोक्यात? जुन्या सहकाऱ्याच्या आशाही संपुष्टात, अक्षर पहिली पसंती

Ravindra Jadeja: रविंद्र जडेजाने वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळला, पण त्यात काही चांगली कामगिरी करू शकला नाही. यानंतर न्यूझीलंडविरूद्ध सिरीजमध्ये त्याची निवड झाली नाही

  • By दिपाली नाफडे
Updated On: Oct 31, 2026 | 07:46 PM
रविंद्र जाडेजाचे एकदिवसीय करिअर संपुष्टात आले का (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

रविंद्र जाडेजाचे एकदिवसीय करिअर संपुष्टात आले का (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • रविंद्र जडेजाचे एकदिवसीय करिअर संपल्यात जमा?
  • न्यूझीलंडविरूद्ध सिरीजमध्ये झाली नाही निवड
  • नक्की काय घडले आहे?
Ravindra Jadeja: भारतीय क्रिकेटचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाचे एकदिवसीय सामन्यातील करिअर संपुष्टात आल्याच्या वावड्या उठल्या आहेत. न्यूझीलंडविरूद्ध ५ सामन्यांच्या वनडे सिरीजमध्येही भारतीय संघाचा रविंद्र जडेजा भाग नाही. आता जडेजाचा जुना सहकारी चेतेश्वर पुजारानेदेखील याबाबत आपले मत मांडत रवींंद्रचे करिअर संपुष्टात आल्याचे म्हटलं आहे.  2027 मध्ये खेळणाऱ्या जाणाऱ्या वर्ल्ड कपच्या भारतीय संघात रविंद्रला जागा मिळणे कठीण असल्याचं त्याचं म्हणणं आहे. तर अभिषेक नायरच्या म्हणण्यानुसार, रविंद्र जडेजाला बॅकअप खेळाडू म्हणून संघात नक्कीच जागा मिळू शकते. 

‘JioStar’ वर मुलाखतीदरम्यान चेतेश्वर पुजाराने आपले मत व्यक्त करत म्हटले की, व्यवस्थापनाला जर रवींद्रला संघात स्थान द्यायचे असते तर त्यांनी न्यूझीलंडच्या दौऱ्यात त्याला नक्की स्थान दिले असते. पुजारानुसार, संघ व्यवस्थापनाचे प्राधान्य आता अक्षर पटेल आहे. त्याला नियमितपणे संधी देण्यात येत आहे आणि अष्टपैलू स्पिनर स्वरूपात व्यवस्थापनाच्या दृष्टीने अक्षर हा आता पहिली पसंती होताना दिसून येत आहे. 

पुजाराने केली भविष्यवाणी 

पुजाराने मुलाखतीदरम्यान असेही सुचवले की, संघ व्यवस्थापनाने जडेजाला सांगितले असेल की त्याने आता कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रित करावे आणि संघ त्याच्याकडे व्हाईट-बॉल क्रिकेटसाठी पाहत नाही. जडेजा आधीच टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे.

न्यूझीलंड मालिकेआधी रवींद्र जडेजाची गर्जना! रणजीत शतक ठोकत गोलंदाजीतही दाखवला दम, टीम इंडियाची चिंता मिटणार?

जडेजा अक्षरचा बॅकअप असू शकतो

अभिषेक नायरने जडेजाच्या भविष्याबद्दल थोडे वेगळे मत मांडले. तो म्हणाला की, ‘जडेजाचे संघात पुनरागमन कठीण असले तरी, अक्षर पटेल जखमी झाल्यास किंवा अनुपलब्ध असल्यास, संघात परत बोलावला जाणारा तो पहिला खेळाडू असेल.’ नायरने जडेजाचे वर्णन संघासाठी ‘विमा पॉलिसी’ असे केले. तो म्हणाला की, संघाकडे अक्षरच्या रूपात एक अनुभवी पर्याय आहे. विश्वचषकापूर्वी अक्षरला दुखापत झाल्यास, जडेजा संघात परत येऊ शकतो.

२०२३ विश्वचषकानंतर कामगिरीत घसरण

जडेजाची अलीकडील एकदिवसीय आकडेवारी संघातील त्याच्या स्थानाबद्दलही प्रश्न निर्माण करते. २०२३ विश्वचषकापासून, तो भारताच्या ३२ एकदिवसीय सामन्यांपैकी केवळ १५ सामने खेळला आहे. या काळात त्याने १४ बळी घेतले असून त्याची गोलंदाजीची सरासरी ४७.९२ आहे. फलंदाजीमध्ये, त्याने विश्वचषकानंतर १० डावांमध्ये १४९ धावा केल्या आहेत. गेल्या सहा वर्षांत त्याने एकदिवसीय सामन्यांमध्ये एकही अर्धशतक झळकावलेले नाही.

Ravindra Jadeja Century: जड्डूची बॅट तळपली! रणजी ट्रॉफीत ठोकलं खणखणीत शतक, न्यूझीलंड दौऱ्याआधी दाखवला दम

एकदिवसीय सामन्यात रविंद्र जडेजाचा रेकॉर्ड 

सामने 212
धावा  2,905
फलंदाजीची सरासरी 32.28
स्ट्राईक रेट 85.54
सर्वोत्तम धावा  87 धावा
अर्धशतक 13
विकेट 234
बॉलिंग सरासरी 36.78
इकॉनमी रेट 4.91
उत्तम गोलंदाजी  5/33
5 विकेट हॉल 2
कॅच  80
💡

Frequently Asked Questions

  • Que: रवींद्र जडेजावर बंदी का घालण्यात आली होती?

    Ans: २०१० मध्ये रवींद्र जडेजावर इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मधून एका वर्षासाठी बंदी घालण्यात आली होती

  • Que: रवींद्र जडेजा २०२६ मध्ये कोणत्या संघाकडून खेळणार?

    Ans: रवींद्र जडेजा आयपीएल २०२६ मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळत आहे.

  • Que: रवींद्र जडेजाचा आवडता क्रिकेटपटू कोण आहे?

    Ans: रवींद्र जडेजाचा आवडता क्रिकेटपटू बेन स्टोक्स आहे

Web Title: Ravindra jadeja odi career over lost hope axar patel preferred choice dn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2026 | 07:46 PM

Topics:  

  • cricket news
  • one day cricket
  • Ravindra Jadeja
  • Sports News

संबंधित बातम्या

Judo Championship: समृद्धी पार्टेची ज्युदो स्पर्धेत रौप्यपदकाला गवसणी! किसन वीर महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा
1

Judo Championship: समृद्धी पार्टेची ज्युदो स्पर्धेत रौप्यपदकाला गवसणी! किसन वीर महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा

Table Tennis कोर्टवर महाराष्ट्राच्या लेकीचा डंका! मायरा शेखला दुहेरी विजेतेपदाची संधी
2

Table Tennis कोर्टवर महाराष्ट्राच्या लेकीचा डंका! मायरा शेखला दुहेरी विजेतेपदाची संधी

Racing ट्रॅकवर धुमाकूळ घालण्यास पुण्याचा सार्थक सज्ज; चेन्नईत ‘या’ दिवशी रंगणार थरार
3

Racing ट्रॅकवर धुमाकूळ घालण्यास पुण्याचा सार्थक सज्ज; चेन्नईत ‘या’ दिवशी रंगणार थरार

आता प्रकरण संपणार? Vinesh Phogat च्या ‘त्या’ याचिकेवर हायकोर्टाचे WFI ला आदेश; दोन आठवड्यात…
4

आता प्रकरण संपणार? Vinesh Phogat च्या ‘त्या’ याचिकेवर हायकोर्टाचे WFI ला आदेश; दोन आठवड्यात…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.