Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 29 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विराट कोहलीची RCB सुपरहिट! विक्रमी ब्रँड व्हॅल्यूने क्रिकेटविश्वात रचला जागतिक इतिहास

RCB becomes first cricket franchise valued over 300 million dollars: जागतिक गुंतवणूक बँक हौलिहान लोकीच्या एका अहवालानुसार, रॉयल चॅलेंजर्स बंगळूर हा ३०० दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त ब्रँड व्हॅल्यू मिळवणारा जगातील पहिला क्रिकेट संघ ठरला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 29, 2026 | 06:29 PM
विराट कोहलीची RCB सुपरहिट! विक्रमी ब्रँड व्हॅल्यूने क्रिकेटविश्वात रचला जागतिक इतिहास
Follow Us
Follow Us:
  • RCBचा ऐतिहासिक पराक्रम
  • आरसीबीने गाठली 300 मिलियन डॉलर ब्रँड व्हॅल्यू
  • IPL चे व्यावसायिक मूल्य वार्षिक २०.६ अब्ज डॉलर्सवर
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) हा ३०० दशलक्ष अमेरिकी डॉलर्सचा ब्रँड व्हॅल्यू ओलांडणारा जगातील पहिला क्रिकेट संघ ठरला आहे. जागतिक गुंतवणूक बँक ‘हौलिहान लोकी’च्या २०२६ च्या ब्रँड व्हॅल्युएशन रिपोर्टनुसार, आरसीबीचा ब्रँड व्हॅल्यू २०२५ मधील २६९ दशलक्ष डॉलर्सवरून २०२६ मध्ये ३१२ दशलक्ष डॉलर्सपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत आरसीबीच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये १६% वाढ होऊन ती अंदाजे २,९७९ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

क्रिकेट वर्तुळात खळबळ! आंतरराष्ट्रीय अनुभवाचा ‘झिरो’ ठप्पा? तरीही ‘हा’ खेळाडू Team India च्या कोचपदी

आरसीबीने गाठली 300 मिलियन डॉलर ब्रँड व्हॅल्यू

आरसीबी ३०० दशलक्ष डॉलर्सचा टप्पा ओलांडणारा हा पहिला आयपीएल संघ ठरला आहे. विशेष म्हणजे, यावर्षी ब्लूस्टोन, बोल्ट व्हेंचर्स, आदित्य बिर्ला ग्रुप आणि टाइम्स ऑफ इंडिया ग्रुप यांच्या संयुक्त गटाने आरसीबीला अंदाजे १.७८ अब्ज डॉलर्स म्हणजेच अंदाजे १७,००० कोटीच्या मूल्यांकनावर विकत घेतले. जी आयपीएलच्या इतिहासात कोणत्याही संघासाठी आतापर्यंत दिलेली सर्वाधिक किंमत आहे. याशिवाय, राजस्थान रॉयल्सला अंदाजे १५,७५० कोटी रुपयांच्या प्रचंड किमतीला विकत घेण्यात आले.

अहवालानुसार, इंडियन प्रीमियर लीग (IPL) चे एकूण व्यावसायिक मूल्य वार्षिक ११.४ टक्क्यांनी वाढून २०.६ अब्ज डॉलर्सवर पोहोचले आहे. आयपीएलने सलग दुसऱ्या वर्षी दुहेरी अंकी वाढ नोंदवली आहे. लीगचे स्वतंत्र ब्रँड मूल्य देखील १०.३ टक्क्यांनी वाढून ४.३ अब्ज डॉलर्सवर पोहोचले आहे. २०२३ पासून आयपीएलच्या ब्रँड मूल्यात १.१ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त वाढ झाली आहे.

मुंबई, केकेआर आणि चेन्नईही रेसमध्ये

ब्रँड व्हॅल्यूच्या बाबतीत मुंबई, केकेआर आणि चेन्नई हे संघही पहिल्या चारमध्ये आहेत . मुंबई इंडियन्स २५२० (264 million USD) कोटी रुपयांसह दुसऱ्या स्थानावर असून, त्याखाली कोलकाता नाइट रायडर्स २३३९ (245 million USD) कोटी रुपये आणि चेन्नई सुपर किंग्स २३३० कोटी (244 million USD) रुपयांसह अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत.

उर्वरित संघांची स्थिती

लीगमधील इतर संघांच्या ब्रँड मूल्यातही लक्षणीय वाढ झाली आहे. सनरायझर्स हैदराबाद अंदाजे १,६०४ ( 168 million USD) कोटी सह पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. त्यांच्यापाठोपाठ राजस्थान रॉयल्स अंदाजे १,५३७ (161 million USD) कोटी रुपये, पंजाब किंग्स अंदाजे १,५०८ ( 158 million USD) कोटी रुपये, गुजरात टायटन्स अंदाजे १,४९९ (157 million USD) कोटी रुपये, दिल्ली कॅपिटल्स १,४८९ ( 156 million USD) कोटी रुपये आणि लखनौ सुपर जायंट्स अंदाजे १,१६४ ( 122 million USD) कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.

डिजिटल प्लॅटफॉर्मवरही विक्रमी वाढ दिसली

रिपोर्टमध्ये जिओस्टारच्या आकडेवारीचा हवाला देत म्हटले आहे की, आयपीएल २०२६ चा हंगाम १.०६ अब्ज स्क्रीन्सपर्यंत पोहोचला. गेल्या वर्षीच्या तुलनेत एकूण प्रेक्षकसंख्येत ७ टक्क्यांनी वाढ झाली. कनेक्टेड टीव्ही हा सर्वात वेगाने वाढणारा प्लॅटफॉर्म होता, ज्याच्या पोहोचमध्ये २६ टक्क्यांनी वाढ झाली. परंतु, पारंपरिक टीव्हीच्या रेटिंगमध्ये १८.८ टक्क्यांनी घट झाली.

‘किंग’ Kohli ला पछाडत ‘प्रिन्स’चा जलवा! Shubman Gill बनला वनडेचा ‘बादशाह’ ; ICC रँकिंगमध्ये नंबर-१ चा ताज

Web Title: Rcb becomes first 300 million dollar cricket franchise brand value

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 06:29 PM

Topics:  

  • IPL 2026
  • RCB
  • Royal Challengers Bengaluru
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

‘किंग’ Kohli ला पछाडत ‘प्रिन्स’चा जलवा! Shubman Gill बनला वनडेचा ‘बादशाह’ ;  ICC रँकिंगमध्ये नंबर-१ चा ताज
1

‘किंग’ Kohli ला पछाडत ‘प्रिन्स’चा जलवा! Shubman Gill बनला वनडेचा ‘बादशाह’ ; ICC रँकिंगमध्ये नंबर-१ चा ताज

Virushka Property: लंडननंतर अनुष्का-विराटची भारतात दणक्यात एन्ट्री? रिअल इस्टेटमध्ये मोठी गुंतवणूक,  कुठे खरेदी केली प्रॉपर्टी?
2

Virushka Property: लंडननंतर अनुष्का-विराटची भारतात दणक्यात एन्ट्री? रिअल इस्टेटमध्ये मोठी गुंतवणूक, कुठे खरेदी केली प्रॉपर्टी?

नव्या युगाची सुरुवात! वैभव सूर्यवंशी ते रोहित-विराट; 7 दिवसांत सचिन तेंडुलकरचे 7 विक्रम मोडले
3

नव्या युगाची सुरुवात! वैभव सूर्यवंशी ते रोहित-विराट; 7 दिवसांत सचिन तेंडुलकरचे 7 विक्रम मोडले

हँडशेक वादावर ट्रॅव्हिस हेडचा खुलासा; म्हणाला, ‘Virat सोबत पॅच-अपची गरज…’
4

हँडशेक वादावर ट्रॅव्हिस हेडचा खुलासा; म्हणाला, ‘Virat सोबत पॅच-अपची गरज…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.