Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

RCB vs SRH : आरसीबीच्या सलामी सामन्यातील विजयानंतर विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना! म्हणाला – ‘मी 120% देणार आहे…’

आरसीबीने आपल्या घरच्या मैदानावर, एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर, सनरायझर्स हैदराबादला ६ गडी राखून पराभूत करत विजेत्याला साजेशी सुरुवात केली. पहिल्या विजयानंतर विराट कोहलीने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Mar 29, 2026 | 10:10 AM
फोटो सौजन्य - Royal Challengers Bengaluru सोशल मिडिया

फोटो सौजन्य - Royal Challengers Bengaluru सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:

देवदत्त पडिक्कल आणि विराट कोहली यांच्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर, गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB) संघाने आयपीएलच्या १९व्या हंगामाची विजयी सुरुवात केली. स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात, आरसीबीने आपल्या घरच्या मैदानावर, एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर, सनरायझर्स हैदराबादला ६ गडी राखून पराभूत करत विजेत्याला साजेशी सुरुवात केली. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने २० षटकांत नऊ गडी गमावून २०१ धावा केल्या. 

प्रत्युत्तरात, बंगळूरुने चार गडी राखून आणि २६ चेंडू शिल्लक असताना लक्ष्य गाठले. या पाठलागात आरसीबीचा स्टार खेळाडू विराट कोहलीने आपल्या खेळाचे पूर्ण प्रदर्शन केले.  सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात विराट कोहलीने हे सिद्ध केले की, सिंह काही काळ शांत असला तरी तो शिकार करायला कधीच विसरत नाही. त्याने या खेळीत पाच उत्तुंग षटकार आणि तितकेच चौकार ठोकले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कोहली गेल्या वर्षीच्या आयपीएल फायनलनंतर आपला पहिला टी२० सामना खेळत होता.

विराट कोहलीने मैदानावरून अनुष्का शर्माला दिला फ्लाइंग किस; सामन्यानंतरचा या जोडप्याचा हा गोड क्षण कॅमेऱ्यात कैद! Video Viral

या विश्रांतीमुळे विराट कोहलीला कसा फायदा होतो?

१० महिन्यांच्या विश्रांतीनंतरही, त्याच्या फलंदाजीत गंज चढल्याचा किंचितही मागमूस दिसला नाही. सामन्यानंतर, कोहलीने आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचे आणि “मानसिक ताजेपणाचे” श्रेय वारंवार घेतलेल्या विश्रांतीला दिले. इतके दिवस टी-२० क्रिकेट न खेळल्यामुळे तयारी अपुरी पडेल अशी भीती वाटली का, असे सामन्यानंतर कोहलीला विचारले असता, त्याने स्पष्टपणे उत्तर दिले. गेल्या १५ वर्षांपासूनच्या आमच्या वेळापत्रकामुळे, तयारीच्या अभावापेक्षा मला मानसिक थकवा (बर्नआउट) येण्याची शक्यता जास्त असते.

या छोट्या विश्रांतीमुळे मी मानसिकदृष्ट्या ताजेतवाने राहतो आणि खेळाबद्दल उत्साही राहतो. ३७ वर्षीय कोहलीने हे स्पष्ट केले आहे की, तो केवळ प्रसिद्धीसाठी मैदानात उतरत नाही.  त्याच्यासाठी संघात स्थान मिळवण्यापेक्षा चांगली कामगिरी करणे अधिक महत्त्वाचे आहे. त्याने सांगितले की, पडद्यामागे कठोर परिश्रम सुरूच असतात. विश्रांतीनंतर तो पूर्वीपेक्षा अधिक जिद्दीने परतला आहे. जेव्हाही मी परत येतो, तेव्हा मी १२०% तयारीने येतो. मी केवळ संघात जागा भरण्यासाठी खेळत नाही, तर संघाच्या विजयात योगदान देण्यासाठी खेळतो.

Focus. Fire. Hunger. 🔥#TATAIPL 2026 could be something special for @imVkohli 😎👊🏻 Watch him next #TATAIPL 👉 #RCBvCSK | SUN, 5th APR, 6:30 PM pic.twitter.com/hoGuzkprDN — Star Sports (@StarSportsIndia) March 28, 2026

अधिक विश्रांतीमुळे मला मानसिकदृष्ट्या ताजेतवाने वाटण्यास मदत झाली आहे. जर तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या ताजेतवाने राहून खेळलात, तर तुम्ही संघासाठी योगदान देऊ शकता, आणि प्रत्येक खेळाडूची हीच इच्छा असते. कोहलीने हेही सांगितले की, जरी तो महिन्यांपासून टी-२० सामने खेळला नसला तरी, नुकत्याच झालेल्या एकदिवसीय मालिकेतील त्याच्या फलंदाजीमुळे त्याला लय टिकवून ठेवण्यास मदत झाली. त्याने आपल्या शैलीबाहेरचे कोणतेही फटके न खेळता, केवळ आपली तंदुरुस्ती आणि मूलभूत तंत्रावर भरवसा ठेवला.

तसेच, देवदत्त पडिक्कलच्या २६ चेंडूंतील ६१ धावांच्या खेळीला शानदार संबोधताना किंग कोहली म्हणाला की, मला पॉवरप्लेमध्ये आक्रमकपणे खेळायचे होते, पण जेव्हा मी त्याला असे खेळताना पाहिले, तेव्हा मी त्याला अधिक स्ट्राईक देण्याचा प्रयत्न केला.

Web Title: Rcb vs srh virat kohli expresses his feelings after rcb opening match win said i will give 120 percentage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 10:10 AM

Topics:  

  • Anushka Sharma
  • cricket
  • IPL 2026
  • RCB vs SRH
  • Sports
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

Gopinath Munde Sports Comple: दहा वर्षांतच गोपीनाथ मुंडे क्रीडा संकुल पाडणार? २५ कोटींच्या खर्चावर प्रश्नचिन्ह
1

Gopinath Munde Sports Comple: दहा वर्षांतच गोपीनाथ मुंडे क्रीडा संकुल पाडणार? २५ कोटींच्या खर्चावर प्रश्नचिन्ह

Cricket News: ४० वर्षांनंतर जम्मू-काश्मीरमध्ये क्रिकेटचा जल्लोष! श्रीनगरमध्ये रंगणार इराणी कपचा थरार
2

Cricket News: ४० वर्षांनंतर जम्मू-काश्मीरमध्ये क्रिकेटचा जल्लोष! श्रीनगरमध्ये रंगणार इराणी कपचा थरार

Indian Cricket Fitness: भारतीय क्रिकेटपटू फिटनेससाठी ‘या’ औषधांचा करतायत वापर? GLP-1 च्या वापरावरून नवा वाद, BCCI घेणार का दखल?
3

Indian Cricket Fitness: भारतीय क्रिकेटपटू फिटनेससाठी ‘या’ औषधांचा करतायत वापर? GLP-1 च्या वापरावरून नवा वाद, BCCI घेणार का दखल?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.