आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहलीने केकेआरचा युवा स्टार रिंकू सिंगला त्याची बॅट भेट दिली. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर केकेआरने आरसीबीचा 7 गडी राखून पराभव केला. घरच्या मैदानावर दारूण पराभव होऊनही विराट कोहलीने चाहत्यांची मने जिंकली. या सामन्यात 83 धावांची नाबाद खेळी करणाऱ्या कोहलीने सामन्यानंतर रिंकू सिंगला आपली बॅट भेट दिली.
आरसीबीने आपल्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये केकेआरविरुद्धच्या पराभवानंतर रिंकू सिंग ड्रेसिंग रूममध्ये पोहोचला होता. सामन्यानंतर विराट कोहलीने त्याला त्याची बॅट भेट दिली. यादरम्यान रिंकू आणि विराटने एकमेकांना मिठी मारली. चाहत्यांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. कोलकाता नाईट रायडर्सनेही त्यांच्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये रिंकू आणि विराट कोहली दिसत आहेत. या छायाचित्रात कोहली रिंकूला गिफ्ट देत आहे. यावर केकेआर फ्रँचायझीने कॅप्शनमध्ये लिहिले की, हे बाँड पाहून आम्हाला खूप छान वाटत आहे.
The bond we love to see! ?❤️
?: @RCBTweets pic.twitter.com/LacYaiSVPd
— KolkataKnightRiders (@KKRiders) March 30, 2024
आरसीबीचा केकेआरने 7 गडी राखून केला पराभव
या सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी गमावून 182 धावा केल्या. विराट कोहलीने 59 चेंडूत नाबाद 83 धावा केल्या. प्रत्युत्तरात केकेआरने 16.5 षटकांत 3 गडी गमावून लक्ष्य गाठले. व्यंकटेशने 50 धावा केल्या तर श्रेयस अय्यरने 39 धावांची नाबाद खेळी केली. रिंकू सिंगने नाबाद 5 धावा केल्या. अशाप्रकारे केकेआरने आरसीबीचा ७ विकेटने पराभव करत सामना जिंकला.