ऋषभ पंतचा व्हिडिओ व्हायरल (फोटो- ट्विटर)
श्रीलंका एलेव्हनविरुद्ध भारतीय संघ सध्या वॉर्म अप सामना खेळत आहे. श्रीलंकेने दीलल्या 363 रन्सचा पाठलाग करण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरला. देवदत्त पडीकलने शतकी खेळी केली. मात्र ऋषभ पंत अपयशी ठरला आहे. दुसऱ्या दिवशी ऋषभ पंत मैदानात खेळण्यासाठी आला. ऋषभ पंत आला तेव्हा भारताचा स्कोअर तीन विकेट गमावून 168 रन्स केल्या. त्यानंतर ऋषभ पंत ने 4 बॉलचा सामना केला. मात्र तो मोठा फटका मारण्याच्या नादात तो आउट झाला. त्याचा व्हिडिओ समोर आला आहे. ऋषभ पंतचा हा खराब फॉर्म भारत संघासाठी चिंतेचा विषय ठरला आहे.
Pant Went Quickly for Dugout for Buying land in Uttarkhand Immediately😭😭😭 pic.twitter.com/8OBGioz3cO — BEAST (@BEASTKLR) August 8, 2026
भारतीय संघाकडून श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या वॉर्म अप सामन्यात देवदत्त पडीकलने शानदार शतक लगावले आहे. देवडात पडीकलने या सामन्यात आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे. तसेच दुखापतीमुळे साई सुदर्शन सिरिजमधून बाहेर गेला आहे. त्यामुळे शतकी खेळी केल्याने आणि तसेच देवदत्त पडीकलचे स्थान भारतीय संघात पक्के समजले जात आहे. देवदत्त पडीकलबद्दल बोलायचे झाल्यास त्याने भारतासाठी आतापर्यंत दोन कसोटी सामने आणि 2 टी 20 सामने खेळले आहेत. 2024 मध्ये धर्मशाला येथील इंग्लंडविरुद्ध डेब्यू केले होते.
IND Vs SL: पडीकलचा ‘देवदत्त’ अवतार! श्रीलंकेविरुद्ध ठोकले खणखणीत शतक, जयस्वाल ‘यशस्वी’ नाहीच
बुमराहनंतर ‘हा’ खेळाडूही टेस्ट सीरीजमधून बाहेर
भारत आणि श्रीलंका यांच्यात १५ ऑगस्टपासून दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाईल. या दौऱ्यापूर्वी भारताला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. डावखुरा फलंदाज साई सुदर्शन श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. साईच्या उजव्या पायाला स्ट्रेस फ्रॅक्चर झाले आहे. तो सध्या बंगळूरु येथील सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये आहे. या दौऱ्यासाठी भारताच्या १५ सदस्यीय संघात त्याचा समावेश करण्यात आला होता. मात्र, त्याचा सहभाग तंदुरुस्तीवर आधारित होता, पण त्याआधी बरा होऊ शकला नाही.






