IPL 2025: Hitman Sharma has an unwanted record; He has secured the first position in 'that' embarrassing list..
IPL 2025 : आयपीएल 2025 च्या हंगामाचा थरार सुरू झाला आहे. आयपीएलचा हा 18 वा हंगाम आहे. या हंगामातील तिसरा सामना गेल्या रविवारी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळवण्यात आला होता. या सामन्यात सीएसकेने एमआयला पराभूत केले होते. अशातच रोहित शर्माबाबत एका नकोशा विक्रमाबाबत माहिती समोर आलिया आहे. आयपीएलमध्ये कारकिर्दीतील सर्वाधिक डक्स: मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज हिटमॅन रोहित शर्माच्या नावे जमा झाले आहेत. या सामन्यात चेन्नईचा कर्णधार रुतुराज गायकवाडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मुंबईने इन्डियन्सने चेन्नई सुपर किंग्सला 156 धावांचे लक्ष्य दिले होते. चेन्नई संघाने मुंबई इंडियन्सने दिलेले हे लक्ष्य 19.1 षटकांत पूर्ण करून विजय नोंदवला.
रोहित शर्मासाठी आयपीएल 2025 च्या 18 व्या हंगामाच्या मोहिमेची सुरुवात खूपच निराशाजनक झाली आहे. रोहित शर्मा एकही धाव न काढता तंबूमध्ये परतला. रविवारी चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात शर्माला भोपळाही फोडता आला नाही. त्याला खलील अहमदने शून्यावर बाद केले. सामन्याच्या पहिल्याच ओव्हरमध्ये रोहितकडून खलील अहमदचा चेंडू लेग साइडच्या दिशेने फ्लिक करण्याच्या प्रयत्नानात मिडविकेटवर उभ्या असलेल्या शिवम दुबेला कॅच देऊन बसला. रोहित शर्मा आऊट होताच तो एका लाजिरवाण्या विक्रमाच्या यादीत जाऊन बसला. असा विक्रम कोणत्याही फलंदाजाला नकोसा वाटेल.
हेही वाचा : IPL 2025 : CSK संघात रिंग मास्टर कोण? थालाने तोडली चुप्पी..; म्हणाला ‘मी फक्त सल्ला..’
सीएसकेच्या विरोधात खेळताना शून्यावर आऊट होण्याची रोहित शर्माची आयपीएल कारकिर्दीतील 18 वी वेळ ठरली. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक वेळा शून्यावर बाद झालेल्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा आता संयुक्तपणे अव्वल स्थानावर पोहचला आहे. रोहितशिवाय ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल आणि भारताचा माजी स्टार खेळाडू दिनेश कार्तिक हे देखील 18 वेळा शून्यावर तंबूत परतले आहेत. या यादीत पीयूष चावला, सुनील नरेन यांचा देखील समावेश आहे.
IPL 2025 : पहा Video : धोनीचा जलवा कायम, मैदानात एंट्री होताच नीता अंबानींना झाकावे लागले कान..
फलंदाजाचे नाव सामने शून्यावर बाद होण्याची संख्या
मुंबई इंडियन्सला आयपीएल 2025 च्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध 4 विकेट्सनी पराभव पत्करावा लागला. मुंबईने प्रथम फलंदाजी करत 155 धावा केल्या होत्या. चेन्नईने हे लक्ष सहज पूर्ण केले आहे. या पराभवासह मुंबईची लीगमधील सलामीची लढत गमावण्याची परंपरा कायम राहिली आहे. हा सलग 13 वा हंगाम आहे की, मुंबईला आयपीएलमधील सलामीचा सामना गमवावा लागला आहे.