Basit Ali On Ravichandran Ashwin : भारतीय फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन निवृत्तीपासून चर्चेत आहे. गाबा येथे खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या तिसऱ्या कसोटीनंतर अश्विनने निवृत्ती जाहीर केली. आता भारतीय फिरकीपटूच्या निवृत्तीनंतर सीमेपलीकडून म्हणजेच पाकिस्तानकडून धक्कादायक विधान आले आहे, ज्यामध्ये अश्विन मॅचविनर नसल्याचे म्हटले आहे.
माजी फलंदाज बासित अलींची प्रतिक्रिया
पाकिस्तानचा माजी फलंदाज बासित अलीने अश्विनच्या निवृत्तीवर बोलताना म्हटले की, अश्विन हा सामना विजेता नसून तो मालिका विजेता असल्याचे त्याने सांगितले. पाकिस्तानचे माजी फलंदाज म्हणाला की, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी मालिकेनंतर अश्विनने निवृत्तीची घोषणा केली पाहिजे होती.
अश्विनने निवृत्ती कधी घ्यायला हवी होती
युट्युब चॅनलवर बोलताना अश्विन म्हणाला, “तुम्हाला माहीत आहे का अश्विनने निवृत्ती कधी घ्यायला हवी होती? एकतर जेव्हा सुंदरला न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्ट मॅचसाठी बोलावण्यात आलं होतं, त्या सीरिजनंतर. किंवा या पाच टेस्ट मॅचनंतर नंतर रोहित शर्मा आणि गौतम गंभीरने घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे त्याला पटवून द्यायला हवे होते की तुमची दोन कसोटी सामन्यांमध्ये गरज आहे आणि सिडनीला खरी गरज आहे.
बासित अली पुढे म्हणाले, अश्विन मॅच विनर आहे का? नाही, अश्विन मॅच विनर नाही, अश्विन मालिका विजेता आहे. त्याने मालिका जिंकली आहे. जर कोणी टी-२० मध्ये एक डाव खेळला, तर मॅच विनर आहे असे म्हणतात. जो टूर्नामेंट जिंकतो तो आला.” खेळाडू वेगळे आहेत आणि मालिका जिंकणारा खेळाडू वेगळा आहे, विशेषत: भारतात 15 चेंडूत 35 धावा करून सामना जिंकणे ही वेगळी गोष्ट आहे. पाकिस्तानचा माजी फलंदाज पुढे म्हणाला, “टॉप क्रिकेट म्हणजे लाल चेंडूचे क्रिकेट. हरभजन झाले, अनिल कुंबळे झाले, अश्विन झाले, हे मालिका विजेते होते.”