Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rohit Sharma अन् इम्पॅक्ट प्लेयरचा नेमका विषय काय? मुंबई इंडियन्सच्या कोचने दिले ‘हे’ उत्तर; म्हणाले…

Mahela Jayawardene On Rohit Sharma Fitness: मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी रोहित शर्माच्या फिटनेसबाबात मोठी अपडेट शेअर केली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 23, 2026 | 08:18 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • रोहित Impact Player म्हणून का खेळतोय?
  • मुंबई इंडियन्सच्या कोचने केला खुलासा
  • रोहितच्या फिटनेसवर मोठी अपडेट
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि स्रोटार फलंदाज रोहित शर्मा सध्या आयपीएल २०२६ मध्ये इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळत आहे. यामुळे त्याच्या फिटनेसबद्दल प्रश्न निर्माण झाले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरविरुद्धच्या सामन्यादरम्यान रोहितला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. त्यानंतर तो संघाबाहेर होता. मात्र, कमबॅक केल्यापासून सलामीवीर फलंदाज इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळत आहे. रोहितच्या दुखापतीनंतर, त्याच्या उपलब्धतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. जून महिन्यात अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी रोहितची संघात निवड करण्यात आली आहे. पण त्याआधी त्याला फिटनेस टेस्ट पास करावी लागेल. बोर्डाने स्पष्टपणे सांगितले आहे की, रोहित पूर्णपणे फिट असेल तरच या मालिकेत सहभागी होऊ शकेल. पण आता, मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी रोहितच्या फिटनेसबद्दल एक मोठी अपडेट दिली आहे.

क्रिकेटमध्ये बदलाचे वारे! ICC घेणार ‘हे’ मोठे निर्णय; सामन्याच्या मध्यात बदलणार चेंडूचा रंग, काय असणार नवे नियम?

रोहित शर्माच्या दुखापतीवर जयवर्धनेचे वक्तव्य

मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केले. ते म्हणाले, ‘माझ्या आणि आमच्या मेडिकल टीमच्या मते, रोहित शंभर टक्के फिट आहे. हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीनंतर जेव्हा तो पहिला सामना खेळत होता तेव्हा आम्ही थोडी सावधगिरी बाळगली होती. आता फक्त टीमच्या कॉम्बिनेशनमुळे त्याला ‘इम्पॅक्ट प्लेयर’ म्हणून खेळवले जात आहे. रोहित टीम प्लेयर आहे आणि त्याला या गोष्टी पूर्णपणे समजतात.’ जयवर्धने यांच्या वक्तव्यावरुन रोहित फिट असल्याचं स्पष्ट होत आहे.

रोहित फिटनेसची BCCI ला चिंता

अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी रोहित शर्माला बीसीसीआयची फिटनेस टेस्ट पास करावी लागेल. मीडिया वृत्तानुसार, बीसीसीआयला रोहितच्या फिटनेसची चिंता आहे. रोहित दुखापतीने ग्रस्त असताना ३ आठवड्यांपर्यंत  बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये (CoE)  रिपोर्ट करण्यात आलं नव्हतं. यामुळे हाय- परफॉर्मेन्स खेळांमध्ये त्याचे शरीर ताण सहन करु शकेल की नाही याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.  त्यामुळे, रोहितच्या फिटनेसबाबतचा अंतिम निर्णय बीसीसीआयचाच असेल.

रोहितने आयपीएल २०२६ मध्ये खेळले फक्त ८ सामने

दुखापतीमुळे रोहित शर्माने या आयपीएल हंगामात फक्त ८ सामने खेळले आहेत. या काळात त्याने १६०.७९ च्या स्ट्राइक रेटने २८३ धावा केल्या असून त्यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच, मुंबई इंडियन्स संघ प्लेऑफच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडला आहे. संघाने १३ सामन्यांमध्ये फक्त ४ सामने जिंकले आहेत. त्यामुळे, रोहित शेवटच्या साखळी सामन्यात एक मोठी खेळी करण्याच्या प्रयत्नात असेल.

Rajat Patidar: रजत ‘रॉकेट’ पाटीदार! IPL चा नवा सिक्सर किंग; ख्रिस गेलही पडला फिका

Web Title: Rohit sharma fitness update impact player mahela jayawardene ipl 2026 afghanistan odi series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2026 | 07:13 PM

Topics:  

  • IPL 2026
  • mumbai indians
  • Rohit Sharma

संबंधित बातम्या

Ipl 2027 : ‘थलायवा’ धोनीच्या संघानं भाकरी फिरवली; झहीर खान चेन्नई सुपर किंग्जच्या मुख्य प्रशिक्षकपदी
1

Ipl 2027 : ‘थलायवा’ धोनीच्या संघानं भाकरी फिरवली; झहीर खान चेन्नई सुपर किंग्जच्या मुख्य प्रशिक्षकपदी

Rohit Sharma: रोहित शर्माचा टीव्ही डेब्यू ठरला हिट; ‘फॅमिली फुल हाऊस’ पाहून प्रेक्षक खूश, शोचं केलं कौतुक
2

Rohit Sharma: रोहित शर्माचा टीव्ही डेब्यू ठरला हिट; ‘फॅमिली फुल हाऊस’ पाहून प्रेक्षक खूश, शोचं केलं कौतुक

BCCI ने Ajit Agarkar चा केला गेम की स्वतःच सोडलं Chief Selector पद? समोर आली मोठी माहिती
3

BCCI ने Ajit Agarkar चा केला गेम की स्वतःच सोडलं Chief Selector पद? समोर आली मोठी माहिती

KKR ने टाकला डाव, Abhishek Nayar ने थेट दिली ऑफर, Rohit Sharma ने एका शब्दात केला गेम ओव्हर! VIDEO तुफान व्हायरल
4

KKR ने टाकला डाव, Abhishek Nayar ने थेट दिली ऑफर, Rohit Sharma ने एका शब्दात केला गेम ओव्हर! VIDEO तुफान व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.