Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

 IND vs NZ Final : रोहित शर्माच्या यशस्वी कर्णधारपदावर डाग; अंतिम सामन्यात रचला ‘हा’ नकोसा विक्रम.. 

चॅम्पियन्स ट्रॉफीचा महामुकाबला सुरू आहे. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने एक नकोसा विक्रम आपल्या नावावर केला आहे. रोहित शर्माने सलग नाणेफेक गमावण्याचा विक्रम नोंदवला आहे. 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Mar 09, 2025 | 03:19 PM
IND vs NZ Final: Rohit Sharma's successful captaincy is tarnished; 'This' unwanted record was created in the final match..

IND vs NZ Final: Rohit Sharma's successful captaincy is tarnished; 'This' unwanted record was created in the final match..

Follow Us
Close
Follow Us:

IND vs NZ Final :  चॅम्पियन्स ट्रॉफीचा महामुकाबला सुरू झाला आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाता आहे. भारत विजेतपद आपल्या नावे करून न्यूझीलंडचा बदला घेण्याच्या इराद्याने मैदानात उतरला आहे. परंतु या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने एक नकोसा विक्रम आपल्या नावावर केला आहे. अंतिम सामना सुरू होण्यापूर्वीच रोहित शर्माचे कर्णधारपदावर एक डाग पडला असून  रोहित शर्माने सलग नाणेफेक गमावण्याचा विक्रम नोंदवला आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना सुरू होण्यापूर्वीच भारतीय कर्णधार रोहित शर्माने एक नकोसा विक्रम आपल्या नावार केला आहे. नाणेफेक हरल्याबरोबर रोहित शर्माच्या नावावर हा कलंक लागला आहे. कर्णधार रोहित शर्माने सलग एकूण 12 वेळा नाणेफेक गमावण्याचा विक्रम केला आहे. नोव्हेंबर 2023 पासून रोहित शर्मासाठी नाणेफेकीचा कौल अशुभ राहिला आहे. भारताने आतापर्यंत सलग 15 वेळा नाणेफेक गमावली आहे, जी एकदिवसीय सामन्यांमधली सर्वात जास्त वेळा अशी नाणेफेक गमवण्याची संख्या आहे. ज्याची सुरुवात ही या दोन संघांमध्ये अहमदाबादमध्ये 2023च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या फायनलपासून झाली आहे.

हेही वाचा : IND vs NZ Final : चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये 5 हजार कोटी डावावर; अंडरवर्ल्ड बेटिंग मार्केटची ‘या’ संघाला विजयी पसंती..

रोहितने गमवाली सलग 12 वेळा नाणेफेक..

कर्णधार रोहितने गेल्या सामन्यात नेदरलँडचा कर्णधार पीटर बोरेनच्या विक्रमाशी बरोबरी साधली होती. बोरेनने मार्च 2011 ते ऑगस्ट 2013 दरम्यान एकदिवसीय सामन्यांमध्ये सलग 11 वेळा नाणेफेक गमावली होती. आता रोहित शर्माने वेस्ट इंडिजचा महान खेळाडू ब्रायन लाराच्या नकोशा विक्रमाशी बरोबरी साधली आहे. ऑक्टोबर 1998 ते मे 1999 या कालावधीत कॅरेबियन संघाचे कर्णधारपद सांभाळत असताना डावखुऱ्या फलंदाजाने सलग 12 वेळा नाणेफेक गमावली होती. नाणेफेक हरण्यात लारा दुर्दैवी ठरला होता.

कर्णधाराचा ओडीआयतील सर्वाधिक सलग नाणेफेक गामावण्याचा विक्रम

  1. 12 रोहित शर्मा (नोव्हेंबर 2023 – मार्च 2025) *
  2. 12 ब्रायन लारा (ऑक्टोबर 1998 – मे 1999)
  3. 11 पीटर बोरेन (मार्च 2011 – ऑगस्ट 2013)

हेही वाचा : किंग कोहली खेळणार आज करिअरचा 550 वा सामना, चाहत्यांना फायनलच्या सामन्यात मोठ्या कामगिरीची अपेक्षा

नाणेफेक जिंकून न्यूझीलंडची प्रथम फलंदाजी..

चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाता आहे. भारत आणि न्यूझीलंड हे दोन संघ आमनेसामने उभे ठाकले आहेत.  दोन्ही संघ विजेतेपद मिळवण्याच्या इराद्याने मैदानात उतरले आहेत. या सामन्यात न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाकडे गोलंदाजीचे आव्हान असणार आहे. दुबईत दुपारी 2:30 पासून या सामन्याला सुरवात झाली आहे. न्यूझीलंडने 1 विकेट गमावून  59 धावा केल्या आहेत. विल यंग 23 चेंडूत 15 रन काढून वरुण चक्रवर्तीचा शिकार ठरला आहे. राचीन रविद्र आणि केन केन विल्यमसन खेळत आहेत.

भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन

रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, विराट कोहली , श्रेयस अय्यर , केएल राहुल (विकेटकिपर), हार्दिक पंड्या , अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि वरुण चक्रवर्ती.

न्यूझीलंडचा संघाची प्लेइंग इलेव्हन

विल यंग, ​​रचिन रवींद्र, केन विल्यमसन, टॉम लॅथम (विकेटकिपर), डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सँटनर (कॅप्टन), काइल जेमिसन, विल्यम ओ’रोर्क आणि नाथन स्मिथ.

 

Web Title: Rohit sharma has set a record of losing consecutive tosses icc champions trophy 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2025 | 03:19 PM

Topics:  

  • bcci
  • Captain Rohit Sharma
  • Champions Trophy 2025
  • ICC
  • ICC Champions Trophy 2025
  • IND vs NZ
  • kane williamson
  • virat kohali

संबंधित बातम्या

USA Cricket : यूएसए क्रिकेटचा धक्कादायक निर्णय! आयसीसीकडून निलंबित झाल्यानंतर केला दिवाळखोरीसाठी अर्ज
1

USA Cricket : यूएसए क्रिकेटचा धक्कादायक निर्णय! आयसीसीकडून निलंबित झाल्यानंतर केला दिवाळखोरीसाठी अर्ज

अ‍ॅशले गार्डनरने रचला इतिहास! Women’s ODI World Cup मध्ये ‘हा’ पराक्रम करणारी ठरली क्रिकेट जगातील पहिलीच खेळाडू 
2

अ‍ॅशले गार्डनरने रचला इतिहास! Women’s ODI World Cup मध्ये ‘हा’ पराक्रम करणारी ठरली क्रिकेट जगातील पहिलीच खेळाडू 

BCCI हटवू शकते Mohsin Naqvi यांना पदावरुन, या नियमामुळे पीसीबी अध्यक्षांचा माज उतरणार?
3

BCCI हटवू शकते Mohsin Naqvi यांना पदावरुन, या नियमामुळे पीसीबी अध्यक्षांचा माज उतरणार?

मोहसीन नक्वी यांचे ट्रॉफी हिसकावून घेणे हा पाकिस्तानचा दहशती खेळ; परत करणेच ठरेल बरे
4

मोहसीन नक्वी यांचे ट्रॉफी हिसकावून घेणे हा पाकिस्तानचा दहशती खेळ; परत करणेच ठरेल बरे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.