IPL 2025: Rohit Sharma's flop show continues in IPL 2025
IPL 2025 : IPL 2025 च्या 18 व्या हंगामातील 9 वा सामना काल (दि. 29 मार्च) मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात पार पडला. गुजरातमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा 36 धावांनी पराभव केला. मुंबई इंडियन्सच्या संघाला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यांमध्ये मुंबई इंडियनची फलंदाजीसह गोलंदाजीत देखील निराशा केली. त्यामुळे संघाला या हंगामातील दुसरा पराभव पत्करावा लागला. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या विजयासह गुजरात टायटन्सने आयपीएल 2025 मधील पहिला विजय नावावर केला आहे.
या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि हाच निर्णय त्यांच्या अंगलट आल्याचे दिसून आले. गुजरात प्रथम फलंदाजी करत मुंबईसमोर 196 धावांचे लक्ष्य दिले होते. गुजरातने दिलेल्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या मुंबई इंडियन्स संघाची सुरुवात खूपच खराब झाली. आयपीएल 2025 च्या पहिल्या सामन्यानंतर दुसऱ्या सामन्यात देखील रोहित शर्माची कामगिरी खूपच खराब राहिली आहे.
हेही वाचा : MI vs GT : जसप्रीत बुमराह विना मुंबई इंडियन्सचा दुसरा पराभव, गुजरात टायटन्सने संघाला 36 धावांनी केलं पराभूत
रोहित शर्मा सध्या मुंबई इंडियन्स संघाचा वरिष्ठ फलंदाज म्हणून संघात खेळत आहे. पण आतापर्यंत रोहित शर्मा आयपीएल 2025 मध्ये आपली छाप पडू शकला नाही. मुंबई इंडियन्स संघाचा दुसरा सामना गुजरात टायटन्सविरुद्ध पार पडला. या दोन्ही सामन्यात रोहितची बॅट पूर्णपणे शांत राहिलेली दिसून आली. पहिल्या सामन्यात चेन्नईविरुद्ध रोहितने केवळ 4 चेंडूंचा सामना केला आणि शून्य धावांवर खलील अहमदचा शिकार ठरला. यानंतर दुसऱ्या सामन्यात त्याला 8 धावांवर मोहम्मद सिराजने बाद केले.
हेही वाचा : MI vs GT : प्रसिद्ध कृष्णाचा पहिल्याच चेंडू अन् सूर्यकुमार यादव जमिनीवर कोसळला! पहा Video
साई सुदर्शन सध्या चांगलाच फॉर्ममध्ये दिसत आहे. अहमदाबाद येथे खेळवण्यात आलेल्या मुंबईविरुद्धच्या सामन्यात त्याने धडाकेबाज अर्धशतक लगावत जीटीला सावरले. त्याने आपले अर्धशतक केवळ 33 चेंडूत पूर्ण केले. एकीकडे कर्णधार शुभमन गिल आणि जोस बटलर यांनी छोट्या खेळी साकारल्या. पण साई सुदर्शन शेवटच्या षटकापर्यंत मैदानातच दटून उभा राहिला. अखेरीस साई सुदर्शन 18 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मात्र अनुभवी गोलंदाज बोल्टच्या चेंडूवर एलबीडब्ल्यू आऊट झाला. या सामन्यात सुदर्शनने 41 चेंडूचा सामना करत 63 धावा केल्या. तर कर्णधार शुभमन गिल 27 चेंडूत 38 धावांची खेळी केली.
मुंबई इंडियन्सकडून तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव वगळता कुणाला मैदानावर टिकाव धरता आलेला नाही. त्यामुळे मुंबई इन्डियन्सला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. गुजरातने मुंबईला 36 धावांनी धूळ चारली.